Monday, 13 July 2026

पंढरपूरच्या यावेळच्या सायकल दिंडीत विक्रमी 7000 जण सहभागी ! डोंबिवलीकर 100 जण सहभागी !!

पंढरपूरच्या यावेळच्या सायकल दिंडीत विक्रमी 7000 जण सहभागी ! डोंबिवलीकर 100 जण सहभागी !!

           पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी वारी निमित्ताने होत असलेल्या सायकल वारी रिंगण संमेलन सोहण्यात यावेळी अंदाजे विक्रमी 7000 जण राज्यभरातून सहभागी झाल्याचे समजले आहे. त्यात डोंबिवलीहून 100 जण या सायकल वारी दिंडी साठी गेले होते. सायकलने 50 जण स्री पुरुष त्यात तरुणांपासून 72 वर्षे वृद्धापर्यंत गेले होते तर 50 जण बसने गेले होते. सायकल सखी ग्रुप, डोंबिवली सायकल ग्रुप, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप यांच्या वतीने हे सर्वजण डोंबिवलीहून पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी गेले होते. यासर्वांनी पंढरपूर येथे पोहचल्यावर प्रथम विठुरायाचे दर्शन घेऊन नंतर तेथील सायकल रिंगण सोहळ्यासह सर्व कार्यक्रमाला हजेरी लावली. सदर सायकल रिंगण सोहळ्यात भाग घेणाऱ्या ग्रुपला आयोजकांतर्फे विठुरायाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

          सदर ही पंढरपूर मधील सायकल वारी ही पारंपरिक वारी सोबत आधुनिक पद्धतीने साजरी होत असलेली वारी पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि भक्तीचा अनोखा संगम ठरल्याने एक वेगळीच रंगत प्राप्त झाली होती. रविवार दिनांक 12 जुलै रोजी पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर हा रिंगण सोहळा झाला होता. यावेळी विविध कार्यक्रमाने सादर झालेल्या या रिंगण सोहळ्याचा सर्वांनी आनंद घेतला. डोंबिवलीहून गेलेले हे सर्वजण रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास परतले असून त्या सर्वांचा सत्कार आणि महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम हा सायकल सखी ग्रुप, एमआयडीसी निवासी तर्फे आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सायकल वारीसाठी गेलेले वरिष्ठ नागरिक मुकुंद कुलकर्णी 72 वर्षे, शंभू नारायण सिंग 72 वर्षे, श्रीमती नयना आगरकर 64 वर्षे, प्रशांत विसपुते 63 वर्षे, श्रीमती वर्षा महाडिक 59 वर्षे आणि इतरांचे विशेष कौतुक सर्व थरातून होत आहे.

वृत्तांकन - राजू नलावडे, डोंबिवली 

No comments:

Post a Comment

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !! ** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील ...