Monday, 13 July 2026

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करा !!

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करा !!

** महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अंबरनाथ शहर रेल्वे अध्यक्ष दिपक तेली यांची मागणी

*अंबरनाथ, विशाल कुरकुटे :

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि चोरी व इतर गुन्ह्यांच्या घटना लक्षात घेऊन अंबरनाथ रेल्वे स्थानकावर स्वतंत्र शासकीय रेल्वे पोलीस अर्थात जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अंबरनाथ शहर रेल्वे स्टेशन अध्यक्ष दीपक तेली यांनी केली आहे.

*लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा*  
दीपक तेली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबरनाथ हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक आहे. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वे परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र जीआरपी पोलीस ठाणे आवश्यक आहे.

*तातडीची मदत मिळत नाही*  
सध्या कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास प्रवाशांना त्वरित पोलीस मदत मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने अंबरनाथ रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करून आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अंबरनाथमधील लाखो प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही दीपक तेली यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !! ** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील ...