Sunday, 12 July 2026

मुंब्रा विभागात ४० हजार बोगस मतदारांचा आरोप !!

मुंब्रा विभागात ४० हजार बोगस मतदारांचा आरोप !!

** एसआयआर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे किरीट सोमय्या यांचे आवाहन

कल्याण, संदीप शेंडगे : मुंब्रा विधानसभा क्षेत्रात सुमारे ४० हजार बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सध्या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम सुरू असून, पात्र नागरिकांनी तातडीने एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यांची नावेही मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

कल्याण येथे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एसआयआर फॉर्म कसा भरायचा, नागरिकांना त्याबाबत कसे मार्गदर्शन करायचे आणि मतदार पडताळणीची प्रक्रिया प्रभावीपणे कशी राबवायची याविषयी किरीट सोमय्या यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विदर्भ, नागपूर आणि मराठवाडा विभागात एसआयआर प्रक्रिया समाधानकारक वेगाने सुरू आहे. मात्र कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ठाणे आणि मुंबई या भागांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या भागातील नागरिकांनी वेळ न दवडता आवश्यक कागदपत्रांसह एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, आमदार सुलभा गायकवाड, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !! ** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील ...