रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !!
घाटकोपर, (केतन भोज) : सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपर (पश्चिम) येथील रामनगर अ ट्रान्झिट कॅम्प परिसरात रविवारी वडाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.रामनगर 'अ' हा परिसर मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.झाड कोसळण्याच्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.मात्र,सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मुके आणि करण इंगवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.तसेच त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागाला घटनेची माहिती देत झाड हटविण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.या घटनेमुळे परिसरातील रहदारी व वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment