मुरबाड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम
फिरत्या वाहनावर लाऊडस्पीकर लाऊन उपाययोजनाची माहिती
जनजागृतीसाठी विशेष टीमची नियुक्ती
कल्याण (संजय कांबळे) : फिरत्या वाहनावर लाऊडस्पीकर लाऊन कोरोनाi विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना संदर्भातील गीतं, उपाययोजनात्मक संदेश, प्रत्येक्ष घरोघरी गल्लीबोळात जाऊन लोकांना शासना सांगत असलेल्या सूचना पाळण्याचे विनम्र आवाहन करत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून पंचायत समिती मुरबाड, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत संपूर्ण मुरबाड तालुक्यात व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.
फिरत्या वाहनाला लाऊडस्पीकर लाऊन कोरोना विषाणूंचा प्रसार होऊन नये म्हणून नागरिकांनी कसा प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती देण्यात येत आहे. आज मुरबाड पंचायत समिती येथून जनजागृतीसाठी निघालेल्या वाहनाला उप सभापती अनिल देसले यांनी हिरवा झेंडा दाखवला.यावेळी मुरबाड गट विकास अधिकारी रमेश अवचार, पंचायत समिती सदस्य श्रीकांत धुमाळ, दिपक पवार, माजी उपसभापती रामभाऊ दळवी, डॉ.श्रीधर बनसोडे,विस्तार अधिकारी जी.टी.सुरुशे आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील,उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुरबाड पंचायत समितीने आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. उपमुख्यकायैकारी अधिकारी चंद्रकांत पवार,मिनल बाणे संपर्कात राहून मार्गदर्शन करत आहेत.
यासाठी विशेष अधिकारी कर्मचारी आणि तज्ञ मंडळीची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये ग्रा.प. विस्तार अधिकारी,पं.स. पेसा समनव्यक, प्रल्हाद लोकडे, प्रयोगशील शिक्षक योगेंद्र बांगर, यांचा समावेश आहे. पुढील काही दिवस मुरबाड तालुक्यातील गावनिहाय जनजागृती करण्यात येणार आहे.आजच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद देऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची हमी दिली.
आजच्या घडीला मुरबाड मध्ये कोरोनाचा फैलाव पूर्णपणे आटोक्यात आलेला आहे.पुढील काळात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी मोठयव प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करून नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार किसन कथोरे, मुरबाड पंचायत समिती सभापती दत्तू वाघ, गट विकास अधिकारी रमेश अवचार व पंचायत समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहे.(फोटो आहेत)

No comments:
Post a Comment