नामांकित लोढा बिल्डरांनी ग्रामस्थांचा रस्ता खोदला, वीस ते पंचवीस गावांचा मार्ग बंद, जिप सदस्याची मुख्यमंत्र्यांनकडे तक्रार!
कल्याण (संजय कांबळे) बांधकाम व्यवसायांमध्ये देशात अग्रस्थानी असलेल्या नामांकित अशा "लोढा" बिल्डरांनी शासकीय योजनेतून बनवलेल्या वाकलण सिध्दीकरवले ते तळोजा एम आय डिसी हा रस्ता मध्येच खोदून उखडून टाकला असल्याने सुमारे 20 ते 25 गावांचा मार्ग बंद झाला आहे. या अन्याया विरोधात जिल्हा परिषद ठाणे खोणी सदस्य रमेश कृष्णा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे तक्रार केली आहे
जिल्हा परिषद खोणी गटात वाकळण ते सिद्धीकरवले ते तळोजा एम आय डिसी रस्त्याचे काम ग्रामविकास योजनेतून (2515) झाले होते. याकरिता सुमारे 25 लक्ष रुपये मंजूर झाले होते. ते सुरू होते. याच रस्त्यावर यापूर्वी सन 2017/18 या वर्षी 2515 या योजनेतून 37 लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. यामध्ये रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता यांनी ग्रामपंचायतीला या जागेच्या बाबतीत विचारना केली असता सर्व जागा या शासकीय असल्याचे सांगितले होते. त्या नुसारच हा रस्ता बनविण्यात आला होता. त्यावेळी कोणाचीही अडचण नव्हती.
आता मात्र लोढा बिल्डरला जाग आली आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता रस्ता उखडून दोन्ही गावाचा रस्ता मार्ग बंद केला. यापुर्वी देखील कल्याण तालुक्यातील वडवली व शिरढोण गावांना जोडणारा नवीन रस्ता तयार करित असताना काम सुरू असताना रस्ता खोदल्या ने अद्यापही काम बंद आहे. त्यामुळे तळोजा एम आय डिसी व कल्याण ग्रामीण भागातील 20/25 गावांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे. या रस्त्यावरून असंख्य नागरिक तळोजा एम आय डिसी मध्ये नोकरी व व्यवसायाकरिता ये जा करतात त्यामुळे या रस्त्याचा वापर मोठा आहे. सदर रस्ता खोदल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला असून नागरिक लोढा बिल्डर विरोधात जनआंदोलन उभारण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा रमेश पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी पाठवले आहे.
या सर्व प्रकारात बाबत लोढा बिल्डर यांचे मॅनेजर बाबू सिंग यांना विचारले असता ते म्हणाले ही जागा आमची 7/12 ची आहे, तशी नोंद झाली आहे.



No comments:
Post a Comment