Tuesday 26 May 2020

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश‌ नाईक !!

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश नाईक !!


कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६ हा प्रभाग अनेक समस्यांनी त्रस्त प्रभाग आहे, इथे अनेक प्रश्न जे अजूनही जसेच्या तसे आहेत.  प्रभागात बराचसा भाग हा चाळी‌त रहाणारा आहे. यात प्रामुख्याने 1)वालधुनी नदी पुराची समस्या ही वालधुनी नदीतील सातत्याने गाळ काढल्यास किवा या नदीचे रुंदीकरण व खोली करणाचे काम केल्याने पुराची तीव्रता कमी होऊ शकते.हे काम ईतक्या वर्षात होऊ शकलेले नाही. 2) सखल भागाच्या पुनर्विकासाची समस्या हा दर निवडणूकीत मुद्दा म्हणुन वापरला जातो. त्याला चालना मिळालेली नाही. 3)मोठे शहाड (कोळीवाडा) मिलिंद नगर येथिल गावठाण प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. या दरम्यान सर्व प्रमुख पक्ष्यांचे सरकार येऊन गेले आहे. 4)या प्रभागात गेल्या 2 वर्षापासुन बांधुन तयार असलेले आरोग्य केंद्र अद्यापि सुरू होऊ शकले नाही. बाकी अनेक समस्यांचे मी वेळो वेळी पाठपुरावा केल्याने निराकरण झाले आहे. 


               या प्रभागात अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते असूनही प्रभागातील समस्यांचे निराकरण न‌ झाल्याचे दिसून आल्याने प्रभागातील एक उच्चशिक्षित तरुण आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव गणेश नाईक यांनी त्यांचे मार्गदर्शक परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सहकारी विनोद शिरवाडकर, श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे, इ. यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक समस्यांना वाचा फोडून त्या वर काम केले. अशीच एक समस्या परिसरातील लाईट पोल विषयी प्रभागात असलेल्या लाईट पोलना २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या लाईट पोलांवर कमालीचा ताण आला आहे तर काही पोल धोकादायक सुध्दा झाले आहेत म्हणून संपूर्ण लाईन अंडरग्राऊंड करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे पाठपुरावा केला तसेच गणेश नाईक स्वत: आर्किटेक्ट असल्याने नकाशा सहित निवेदन दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन परिसरात काम सुरू झाले. या कामाला गती मिळून पुढील काळात हे काम पूर्ण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.                                 
आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सहसचिव गणेश नाईक, मार्गदर्शक, सहकारी सुनील उतेकर, विनोद शिरवाडकर,श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे आभार मानले व भविष्यात प्रभागात प्रत्येक समस्येसाठी आधी होतो, आहोत तसेच पुढेही कार्यरत रहाणार असे जनतेला आश्र्वासन दिले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...