'आज कल्याण डोंबिवलीत 358 रुग्णाची नोंद तर एकूण रुग्नसंख्या 4873'
2099 जणांना डिस्चार्ज तर 96 रुग्णांनी गमावला जीव !
कल्याण : दिवसागणिक कल्याण डोंबिवली महापालिकेची आकडेवारी 100 च्या पटीने वाढू लागली असून मागील 24 तासात शहरात तब्बल 358 रुग्ण सापडल्याने नागरिक आणि प्रशासन हडबडले आहे. आतापर्यत पालिका क्षेत्रात 4873 रुग्ण सापडले असून यातील 2099 जणांनी करोनावर मात केली आहे. तर मागील 24 तासात 5जण करोनामुळे दगावल्याने करोना बळीचा आकडा 96 वर पोचला आहे. तर अद्यापि 2678 रुग्ण उपचार घेत आहेत.
कल्याण डोंबिवलीत जून महिन्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून शहरातील एकही भाग करोना मुक्त राहिलेला नाही. प्रत्येक परिसरात रुग्ण सापडल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची दमछाक होत आहे
18 तारखेपासून 200 पार असलेली करोना रुग्णाची आकडेवारी गेले दोन दिवस थेट 300 पार पोचली असून आज पालिका क्षेत्रात 358 रुग्णाची नोंद झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 5 जण करोनामुळे दगावल्याने करोना बळीचा आकडा 96 वर पोचला आहे.पालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत .

No comments:
Post a Comment