आर्थिक विवंचनेला कंटाळून एका वकिलाने केली गळफास घेऊन आत्महत्या.
उल्हासनगर:- : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश तीन महिने लाँकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला.देशाची आर्थिक परिस्थिती ढासळल्या बरोबरच देशातील जनताही आर्थिक विवेंचनेत सापडली आहे.
आशातच देशातील कनिष्ठ न्यायालये बंद असल्याने अनेक वकिलांना ही आर्थिक विवंचनेची समस्याही भेडसावत आहे.या आर्थिक विवंचनेला कंटाळून एका वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार विठ्ठल कृपा अपार्टमेंन्ट बस स्टाँप जवळ,उल्हासनगर-१ येथे राहणारे अँड.उमेश खंडागळे वय-३७ वर्ष या तरुण वकिलाने सकाळी ९ च्या सुमारास गँलरीतील पाण्याच्या टाकीच्या एँन्गलला चादरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलाने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
उल्हासनगर बार कोन्सिलचे सभासद असणाऱ्या अँड.उमेश खंडागळे यांचे पश्चात त्यांची पत्नी व ३ वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.
अँड.उमेश खंडागळे यांच्या आत्महत्येचे वृत पसरताच वकिल मंडळीत आणि परिसरातील लोकांत शोककळा पसरुन हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment