निसर्ग चक्रीवादळामुळे मुरबाड तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - चेतनसिंह पवार
===================
मुरबाड ( मंगल डोंगरे )गुरूवार, दि.४ जुन २०२० रोजी मुरबाड तहसिलदार अमोल कदम यांना Email व्दारे निवदेन पाठवुन निसर्ग चक्रीवादळामुळे मुरबाड तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्याच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन घ्यावेत अशी मागणी काॅंग्रेस पक्षाचे चेतनसिंह पवार यांनी केली. मुरबाड तालुक्यातील अनेक गावांत वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे व त्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडुन जाण्याच्या तसेच घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. पाऊस चांगल्यापध्दतीने सुरू झालेला आहे त्यामुळे सदरच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे, जेणेकरुन पंचनामा झाल्यावर तात्काळ नागरिक आपली घरांची झालेली डागडुजी करुन घेतील.
आधीच लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे तसेच टोकावडे, उमरोली व मुरबाड शहरातील नागरिकांचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. आपण तातडीने लक्ष घालुन निसर्ग चक्रीवादळामुळे मुरबाड तालुक्यातील विविध गावांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसुल प्रशासनास द्यावेत तसेच या वादळग्रस्तांना तातडीने मदत देखील करणे गरजेचे असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.




No comments:
Post a Comment