मुरबाड तालुक्यातील साखरे गाव हद्दीत बिबट्याचा धुमाकुळ,,गरीब शेतकऱ्यावर प्राण घातक हल्ला !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : जगभरात कोरोनाचा कहर त्यात रोजगारा अभावी उपासमारीची पाळी, त्यातच थंडी तापाची भर हे संकट कमी की काय म्हणून काल रात्री पासून साखरे गल परिसरात बिबट्या अवतरल्याने व एका गरीब शेतकऱ्याला जखमी केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
माळशेज कल्याण हायवे लगत आंबेळे - साखरे गावच्या हद्दीतील जंगलात वन्य प्राणी हिस्त्र प्राण्यांचा वावर कायम असता. दोन वर्षांपूर्वी असाच एका शेतकऱ्याच्या घरातील सहा बकऱ्या ठार करणारा बिबटया फार्महाऊस वर कैद केला होता.
दि.१९/०९/२०२० शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास आंबेळे साखरे रस्त्यावरील एका फार्म हाऊस समोरच नागो माळी वय ५० यांच्यावर पाठीमागून बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना नागरिकांनी वनविभागाला कळविताच तात्काळ वनरक्षक अल्पना बाळकृष्ण घोलप, वनरक्षक गणेश रावते, वैजनाथ फड, ज्ञानेश्वर मुकुल, यांनी जागेवर जाऊन पाहणी केली खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना जंगलात एकटे दुकटे जाऊ नये. रात्रीच्या वेळेस वाडीवस्तीवर फटाके वाजवून पळवून लावावे. व वरील परिसरात पाऊस पडत असल्याने पाऊलखुणा घेता आल्या नसल्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून या काळूनदी परिसर जंगल पट्ट्या C.c.t.v कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक अल्पना घोलप यांनी दिली. तसेच जखमी यास सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविले असून कोविड पेंशटची वाढती संख्या पाहता त्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे .
************************
या बाबत वरिष्ठाकडे सीसीटीव्ही लावण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंजरा देखील मागविण्यात येईल नागरिकांनी काळजी घ्यावी- अल्पना घोलप
वनरक्षक - ८८८८४७५९२२


No comments:
Post a Comment