माणगांव पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी स्वयंप्रेरणेने केला सर्व पोलीस ठाणे परिसर स्वच्छ !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : '' स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे '' या स्वच्छतेच्या ब्रीदवाक्याला अनुसरून रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी सोमवार दिनांक ०७ डिसेंबर २०२० रोजी माणगांव उपविभागीय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री. किरण पाटील आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पोलीस ठाण्याच्या परिसरातील स्वच्छता स्वयंप्रेरणेने केली.
मानवी जीवनात स्वच्छतेला फार मोठे महत्त्व आहे. आपल्या शरीरा बरोबर आपले घर, आपले कार्यालय आणि त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवल्याने अनेक आजारांचे उच्चाटन होते. त्याच बरोबर परिसर स्वच्छतेच्या माध्यमातून आपण मच्छर तथा डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फार मोठी मदत होते.
जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी माणगांव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांनी आपल्या माणगांव पोलीस ठाण्याच्या परिसरातील स्वच्छता स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फुर्तीने करून संपूर्ण माणगांव पोलीस ठाण्याचा अंतर्बाह्य परिसर चकाचक करून समाजासमोर स्वयंस्वच्छतेचा एक नवा आदर्श ठेवला.
No comments:
Post a Comment