Monday, 7 December 2020

हायटेक मुरबाड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य ! **नागरीकांची बैठक व्यवस्था व अपंगांसाठी उद्ववाहक(लिफ्ट)ची गैरसोय कायम**

हायटेक मुरबाड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य ! 
**नागरीकांची बैठक व्यवस्था व अपंगांसाठी उद्ववाहक(लिफ्ट)ची गैरसोय कायम**


मुरबाड - (मंगल डोंगरे) : मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून  मुरबाडचा चेहरा बदलताना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये सुसज्ज बनविण्यात आली आहेत.त्यात हायटेक बनविलेल्या तहसीलदार कार्यालय मात्र त्या कार्यालयांची साफसफाई व  देखभाल चांगली ठेवली जात नसल्याने त्यांना गलिच्छपणा आला आहे. मुरबाड तहसीलदार कार्यालयात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. 


आमदार किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नातून एक उत्कृष्ट व स्वच्छ, सुंदर  मुरबाड शहर बनविले जात आहे. मुरबाड शहरासह  संपूर्ण तालूका राज्यात एक रोल मॉडेल तालुका व्हावा यासाठी ते धडपड करीत आहेत. त्यासाठी त्यांनी पंचायत समिती, पोलीस ठाणे, धान्य गोदाम , तहसीलदार कार्यालय, ही शासकीय कार्यालये सुंदर व नीटनेटकी बनवली आहेत. मुरबाडचे तहसील कार्यालय म्हणजे एक राजवाडाच. या कार्यालयात नागरिकांची नेहमीच वर्दळ सुरू असते. दुय्यम निबंधक कार्यालय याच इमारतीत असल्याने मालमत्ता खरेदी विक्री नोंद करण्यासाठी अन्य तालुका व जिल्ह्यातील नागरिक येत असतात. परंतू सद्यस्थितित या कार्यालयात अत्यंत घाण दिसून येत आहे. दुय्यम निबंधक कार्यालया शेजारी असलेल्या मुतारीतून प्रचंड दुर्गंधी येत आहे. पिण्याच्या पाण्याचे पाईप जागोजागी तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. वाशबेसिन च्या पाईपला प्लास्टिक गुंडाळण्यात आले आहे. नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या पाण पोईची अत्यंत बिकट अवस्था आहे. कोपरे गुटख्याच्या पिचकऱ्यांनी रंगवले आहेत. पार्किंगमध्येही प्रचंड अस्वछता दिसून येत आहे. ध्वजस्तंभा सभोवती गवत वाढले आहे. हे सगळे बघितल्यानंतर या कार्यालयाला स्वच्छ भारत अभियान लागू नाही का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आपल्या कार्यालयाकडे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येत आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बैठक व्यवस्था नसल्याने नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ताटकळत उभे रहावे लागत आहे. लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या या इमारतीची देखभाल ,स्वच्छता राखणे हे तेथिल प्रशासनाचे काम असताना अधिकारी माञ डोळे झाक करत असल्याचा येथे येणारे नागरिक करत आहेत .

** एकच सफाई कामगार असल्यामुळे साफसफाई शक्य होत नाही.**
प्रसाद पाटील, नायब तहसीलदार, मुरबाड..

No comments:

Post a Comment

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी !

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी ! मुंबई (शांताराम गुडेकर) :        ...