Saturday, 10 April 2021

अखेर वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर वरप येथील कोरोना कोविड सेंटर सुरू, अनेकांच्या प्रयत्नांना यश! ग्रामीण भागाची होणार सोय ?

अखेर वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर वरप येथील कोरोना कोविड सेंटर सुरू, अनेकांच्या प्रयत्नांना यश! ग्रामीण भागाची होणार सोय ?


कल्याण, (संजय कांबळे) : आज होणार, उद्या होणार असे करत गेली वर्षभर रखडलेले वरप येथील राधा स्वामी संत्सग कोरोना कोविड सेंटर सुरू अखेरीस आज पासून सुरू झाले असून यामुळे ग्रामीण भागातील कोरोना पेशंटची सोय होणार आहे. या यशामागे अनेकांची मेहनत, सातत्य, पाठपुरावा असून पत्रकार संजय कांबळे यांनी सतत हा विषय लावून धरल्यामुळे हे शक्य झाल्याचे कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांचे म्हणणे आहे.


मागील वर्षी कोरोनाच्या भंयकर संकटामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेष करून म्हारळ, वरप कांबा या परिसरातील कोरोना रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. अनेकांना वेळेवर बेड न मिळाल्याने त्यांचा जीव गेला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना वेगळे स्वतंत्र कोरोना कोविड सेंटर सुरू व्हायला हवे असा विचार पुढे आला. 


यातूनच वरप ग्रामपंचायत हद्दीतील राधा स्वामी संत्सग येथे हे कोविड सेंटर सुरू व्हावे असे निश्चित झाले. परंतु उल्हासनगर येथील पेंशट येथे पाठविण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर याला विरोध होऊ लागला. उल्हासनगर पालिकेचे आयुक्त, तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, खा श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री दर्जा प्रकाश पाटील, झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे, कल्याण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आदींनी या जागेची पाहणी केली होती. परंतु म्हारळ, वरप, कांबा, आणि इतर ग्रामीण भागातील रुग्णांचे काय? असा सवाल उपस्थित करून पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रातून जोरदार आवाज उठविला. त्यामुळे याचा फायदा असा झाला की ग्रामीण भागातील पेंशट साठी काही बेड राखीव ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले.
गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश कापूसकर यांच्या कडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु ग्रामीण रुग्णालय व हे कोरोना कोविड सेंटर कसे चालविणार, त्यातच स्टाफ चे काय? बेड व इतर साहित्य येऊन पडले पण इतर अनेक तांत्रिक अडचणी मुळे शेवटी हे कोविड सेंटर धुळखात पडले होते. मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्यामुळे तर याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले.
पण आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. यामुळे कोरोनाचा पार्दूभाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. कल्याण डोंबिवली व शेजारच्या ग्रामपंचायत हद्दीत भंयकर पेशंट आढळून येत आहेत. अनेकांचा जीव गेला तरी. त्यामुळे पुन्हा एकदा वरप येथील कोरोना कोविड सेंटर ची गरज लक्षात घेऊन पत्रकार संजय कांबळे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन हे कोविड सेंटर सुरू करावी अशी विनंती केली होती. तेव्हा त्यांनी येत्या दोन दिवसांत हे कोविड सेंटर सुरू होईल असे सांगितले होते. याची पाहणी देखील त्यांनी केली होती. आज अखेर वरप येथील राधा स्वामी संत्सग कोरोना कोविड सेंटर सुरू झाले आहे
सुमारे २०० बेडची क्षमता असलेल्या या सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात १०० बेड सुरू करण्यात आले आहेत. यातील १० बेड  आॅक्शिजन चे असून इतर मध्ये ज्या रुग्णांना कमी लक्षणे आहेत असे पेशंट येथे अ‍ॅडमिट करण्यात येणार आहे. जे गंभीर आहेत. त्यांना  ठाणे सिव्हिल किंवा सावाज येथे पाठविण्यात येणार असून या करीता स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे
सध्या या कोविड सेंटर साठी ६वैद्यकीय अधिकारी, ७ सिस्टर, वार्डबाॅय व सुरक्षा रक्षक असे १५ कर्मचारी देण्यात आले आहेत. याचप्रमाणे येथे स्लॅबची तपासणी, आर डि पीसी टेस्ट, व इतर चाचण्या व तपासण्या होणार असून दोन कंन्टेनर उपलब्ध झाल्यास येथेच कोविड लसीकरण केंद्र देखील सुरू करण्यात येईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाल यांनी सांगितले.
यावर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रण असून कल्याण पंचायत समितीचा आरोग्य विभाग काम करणार आहे या कोरोना कोविड सेंटर मुळे म्हारळ, वरप, कांबा या गावांसह शेजारच्या ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी सोय होणार असून त्यांची परवड थांबणार आहे
*अनेकांच्या प्रयत्नांना यश -
वरप येथील कोरोना कोविड सेंटर सुरू व्हावे म्हणून पत्रकारांचा जसा सिंहाचा वाटा आहे तसाच किंबहुना अधिक पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा श्रीकांत शिंदे झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने साहेब, प्रांताधिकारी, कल्याण चे तहसीलदार दिपक आकडे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश कापूसकर, कल्याण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, म्हारळ वरप कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व कर्मचारी या सर्वांचे मोठे योगदान आहे. 

प्रतिक्रिया - दिपक आकडे (तहसीलदार - कल्याण) 
"वरप येथील कोरोना कोविड सेंटर अखेर सुरू झाले आहे महसूल विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभागासह जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांचा सततचा पाठपुरावा या सर्वांचेमुळे हे शक्य झाले आहे, यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे, 

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...