Friday, 9 April 2021

कोरोनाच्या हायब्लेडप्रेशर मध्ये वीजबिलाचा अटॅक? जनतेमध्ये कमालीचा संताप !!

कोरोनाच्या हायब्लेडप्रेशर मध्ये वीजबिलाचा अटॅक? जनतेमध्ये कमालीचा संताप !!



कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या वर्षभर हातधुऊन मागे लागलेल्या कोरोनाच्या संकटामुळे व बेभरवशाच्या काम धंदा, नोकरी, व्यापार व्यवसाय यातून पोटाची खळगी कशी भरायची अशा विवेचनात जनता असतानाच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे नागरीकांचा हायब्लेडप्रेशर वाढला असताना विज वितरण कंपनीने थकीत वीजबिल वेळेत भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे मॅसेज प्रत्येक नागरिकाला पाठवल्याने या मानवनिर्मित अटॅक विरोधात सर्व सामान्य माणसाच्या मनात संताप निर्माण झाला असून याच्या ऊद्रेकाची विजवितरण कंपनीने वाट बघू नये.
राज्यात गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, कंपन्या बंद पडल्या, छोटेमोठे व्यापारी, नाका कामगार देशोधडीला लागले. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची तर खूपच वाईट स्थिती झाली. मागील वर्षी कडक लाॅकडाऊण लागू केल्यामुळे कोरोना कसा तरी आटोक्यात आला. सगळी जनता घरी असताना विज वितरण कंपनीने मात्र भरमसाठ वीजबिल पाठवले, थकलेले हजारो, लाखो रुपये बील बघून नागरिकांना अटॅक यायची वेळ आली. अशातच थकीत बील माफ करण्याची घोषणा सत्ताधारी व विरोधक या दोंघानी केली. त्यामुळे आपले वीजबिल माफ होईल या आशेवर जनता असतानाच राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पसरली. आयत्या वेळी राजकारण्यानी वीजबील माफ करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने वीज कर्मचारी व अधिकारी जनतेवर तुटून पडले. अनेकांचे लाईट कनेक्शन तोडले. तर काहीनी कसेतरी थोडेफार पैसे भरले.
परंतु आता पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठ्याप्रमाणात पार्दूभाव पसरला आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना बेड मिळेना झाले आहे. व्हॉन्टेलेटर, आॅक्शिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस संपल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. औषधांचा काळाबाजार सुरू आहे यामुळे गोरगरिबांचा जीव जात आहे. नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानात जागा मिळेना झाली आहे. एका चितेवर १०/१२ मृतदेहांना अग्नी दिला जातो आहे. अशा बिकट परिस्थितीत जनता जीव मुठीत धरून जगत आहे. लाॅकडाऊण च्या भितीने बहुतेकांनी घरचा रस्ता धरला आहे.दिवसेदिवस कोरोनाचे पेंशट वाढत आहेत. फक्त कल्याण तालुक्याचा विचार केला तर दररोज शेकडो कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशातच तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा सर्व परिस्थिती ने नागरिक पुरता पिंजून गेला आहे. त्यामुळे जनता लाॅकडाऊण ला विरोध करत आहे. सध्याची स्थिती अंत्यत स्फोटक बनली आहे. अशातच वीज वितरण कंपनीने अनेकांना तूमचे वीज बिल त्वरित भरा अन्यथा लाईट कनेक्शन तोडण्यात येईल असे मॅसेज पाठवले आहेत. त्यामुळे हा प्रकार म्हणजे आगीत तेल ओतण्याचा आहे. असे अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेक गावांमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांरी व कर्मचाऱ्यां विरोधीत कमालीचा संताप पसरला असून त्यांनी आमच्या उद्रेकाची वाट बघू नये असा इशारा अनेकांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थोडे संयमाने घ्यावे, अतिरेक करू नये, सध्याच्या परिस्थितीचा विचार करावा बस्स.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...