Thursday, 20 May 2021

ठाणे जिल्हा परिषद क्रुती समितीने केली ध्वनी चित्रफितीतुन व लोककलेतुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती मोहीम !!

ठाणे जिल्हा परिषद क्रुती समितीने केली ध्वनी चित्रफितीतुन व लोककलेतुन  कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती  मोहीम !! 


मुरबाड, (मंगल डोंगरे) : नुकताच ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती साठी एक अभिनव युक्ती लढवली असुन लोककलेच्या  व ध्वनी चित्र फितीच्या माध्यमातून मोहीम राबविली आहे. हि संकल्पना ठाणे जिल्हा परिषदेची असुन, कोरोनाच्या पार्शवभूमीवर गर्जा प्रतिष्ठानने ही संकल्पना सत्यात उतरवून जनजागृतीसाठी  ** पोतराजाची ** ध्वनी चित्रफीत प्रदर्शित केली.
संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असताना याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ठाणेच्या माध्यमातून गर्जा प्रतिष्ठान मुरबाड या संस्थेने ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी पोतराज हि ध्वनिचित्रफीत नुकताच प्रदर्शित केली. कोरोना जनजागृती कोअर टीमने यासाठी मार्गदर्शन केले आहे. या चित्रफितीची निर्मिती गर्जा प्रतिष्ठान या संस्थेने केली आहे. तर लेखन/दिग्दर्शन : नितेश मंगल डोंगरे यांनी केले आहे. यख चित्रफितीत समीर खुटारे या मुरबाडच्या मातीतील सुप्रसिद्ध कलावंताने पोतराजाची भूमिका अगदी लीलया पेलली आहे. तर या चित्रफितीचे छायाचित्रण संदीप देशमुख, वेशभूषा : भूषण मोरे. रुपेश खाटेघरे, रंगभूषा : वैजयंता डोंगरे, निर्मिती सहाय्य : सचिन थोरात, संदीप खरे  यांनी केले आहे. या चित्रफितीचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभरातून केले जात आहे.
 **कोरोना जनजागृती साठी लोककलेतुन साकारलेल्या या अभिनव प्रयोगातुन सर्व जनतेने बोध घेवुन आपापल्या प्राणाचे रक्षण करावे.व कोरोना विरोधात सुरु असलेली लढाई जिंकावी. हा या चित्रफित प्रकाशित करण्यामागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. हि चित्रफित सर्वानी आवर्जून पहावी.व लगेचच आपल्या संपर्कातील प्रियजनांना पाठवून जनजागृती करावी. असे आवाहन ही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...