Thursday, 24 June 2021

चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक !

चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक !


भिवंडी - चोरीच्या दुचाकी विकण्यास आलेल्या दोघा जणांना भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली आहे.

भिवंडी-कल्याण महामार्गावरील रांजणोली गांव येथील बासुरी हॉटेलजवळ दोघेजण चोरीची वाहन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.त्यापैकी जुबेर अब्दुल वहाब मेमन (२६, ठाकूरपाडा, दहिसर) येथील रहिवासी आहे. तर सौद सिराज खान (२१, आदिवासी गाव, मुंब्रा ) येथील राहणार आहे. या दोघांकडून पोलिसांनी एक दुचाकी व एक रिक्षा असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

या हरविलेल्या गाड्यांप्रकरणी कोनगाव व शीळ डायघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पुढील तपास कोनगांव पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...