दलित वस्ती सुधार योजनेच्या निकषात बदल करावेत... ही मागणी शासन दरबारी मांडा - 'समता समितीचे पाटोलेंना निवेदन'.
अमळनेर : अमळनेर दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांना दलित वस्ती सुधार योजनेच्या निकषात बदल करणे संदर्भात अमळनेर येथील समता समिती तर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती सुधार योजना ही दलित समूहाचे राहणीमान उंचावण्यासाठी व दलित वस्त्याही इतर वस्त्यांप्रमाणे निर्माण व्हाव्यात. व सर्वांमध्ये समता निर्माण व्हावी यासाठी शासनाने सुरू केली.
मात्र शासनाच्या काही चुकीच्या निकषांमुळे आजही काही दलित वस्त्या या लाभापासून वंचित आहेत. व या वस्त्यांचा पाहिजे तसा विकासही झालेला नाही “काही ठिकाणी अनुसूचित जाती समूहातील बांधवाच एक कुटुंबही राहत असेल त्या ठिकाणी देखील काम देता येईल." किवा तो निधी त्या ठिकाणी खर्च करता येईल." अश्या पद्धतीचा एक निकष यात आहे. याचा फायदा घेऊन ग्रामपंचायत असो वा नगर परिषद किवा महानगर पालिका यांमध्ये काही राजकीय लोक तो निधि इतर ठिकाणी वापरून घेत असतात. व आपली राजकीय पोळी भाजून घेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार देखील करत असतात. निधि हा संबंधितांना इतर ठिकाणी खर्च करायचा असतो म्हणून त्या एका कुटुंबाच्या नावाने हा निधि त्या ठिकाणी वापरला जात असतो. प्रमुख म्हणजे दलित वस्तीला निधि दिला जातो मात्र त्या वस्तीला तो निधि मिळतच नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून शासनालाही एक कुटुंबं व दलित वस्ती याचा फरक कळतो का नाही ? हा एक मोठा प्रश्न आहे. कोंग्रेस पक्षाने आज पर्यंत दलित तसेच शोषित पिढीत समुहाच्या हितासाठी अनेक कार्य केली आहेत. म्हणून दलित समुहाच्या हिताचे हे देखील एक मोठे कार्य आहे. याने अनेक वस्त्या विकसित होणार आहेत. त्यासाठी शासन निर्णयात बदल करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आमच्या मार्फत शासन दरबारी हा विषय मांडावा अशी विनंती निवेदनामार्फत केली गेली आहे. समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पटोले यांना निवेदन सुपूर्द केले.


बरोबर आहे
ReplyDeleteयाबाबतीत मे उच्च न्यायालयाने अधिकारी यांचे चौकशी लावली आहे
बराच कारभार अंधाधुंधी आहे