Sunday, 1 August 2021

कल्याण मधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे एक हात मदतीचा... सुमारे 1000 पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.. ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्यच-"आमदार विश्वनाथ भोईर" यांचे प्रतिपादन..

कल्याण मधील पूरग्रस्तांना शिवसनेतर्फे एक हात मदतीचा... सुमारे 1000 पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्यच-"आमदार विश्वनाथ भोईर" यांचे प्रतिपादन..


टिटवाळा, उमेश जाधव -: जुलै महिन्यात कल्याण शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने कल्याण तालुक्यातील मांडा-टिटवाळा, अटाळी, वडवली, घोलपनगर, भवानी चौक, गोविंदवाडी, रेतीबंदर येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पूरुपरिस्थिती निर्माण झाली होती. लोकांच्या घरा- घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील सामान खास करून अन्नधान्याचे ही नुकसान झाल्याने गोरगरीब जनतेसमोर मोठी  समस्या निर्माण झाली होती. 


अशा वेळी आपले कर्तव्य म्हणून कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने या अडचणीच्या समयी पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यात यावा. या उद्देशाने त्यांना अन्नधान्य तसेच  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाची रवीवारी टिटवाळा येथून सुरूवात करण्यात आली.


कल्याण पश्चिमचे "आमदार तथा शहर प्रमुख विश्वनाथ भोईर" यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला त्यांच्या उपस्थितीत रविवारी मांडा-टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करून सुरुवात करण्यात आली. मांडा-टिटवाळा येथील सुमारे १५० गरजूंना मदत करण्यात आली. तसेच घोलपनगर व भवानी चौक येथील ४५० जणांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने तर अटाळी-वडवली येथील ४५०  पूरग्रस्तांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले.  रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरातील सुमारे २५० पूरग्रस्तांनाही शहर शाखेच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.


मुसळधार पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याचे पंचनामे सुरू आहेत. अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असून काही थोडेच बाकी राहिले आहेत. त्यामुळे शासनाची जी काही मदत असेल ती पूरग्रस्तांना मिळेलच परंतू शिवसेना हा समाजाभिमुख पक्ष आल्याने आमचे ही काही कर्तव्य आहे. याचं भावनेने थेट पूरग्रस्तांना मदत मिळावी याच हेतूने ही मदत नव्हे तर कर्तव्य केल्याची भावना यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. यावेळी कल्याण विधानसभा संघटक रवी कपोते, जेष्ठ शिवसैनिक नरेश पाटील, शाखा ज्ञानेश्वर मढवी, रिक्षा युनियन अध्यक्ष बाळा भोईर, उपविभाग प्रमुख मांडा पश्चिम रेवनाथ पाटील, प्रशांत मोहिते, अल्पसंख्याक अध्यक्ष जक्की खलीफा, शिवसैनिक प्रल्हाद पाटील, गट प्रमुख गजानन पाटील, शाखा प्रमुख स्नेहल गोमाने, निता भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  गजानन पाटील, शाखा प्रमुख स्नेहल गोमाने, निता भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...