Friday, 17 December 2021

कल्याण पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षास उपसभापती भरतशेठ भोईर यांची भेट, सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन !!

कल्याण पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षास उपसभापती भरतशेठ भोईर यांची भेट, सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन !!                                  


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या इमारतीच्या हद्दीत दिव्यांग बांधवासाठी कक्ष देण्यात आला असून या कक्षास नुकतिच कल्याण पंचायत समितीचे उपसभापती भरतशेठ भोईर यांनी भेट दिली, यावेळी कक्षास हवे ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिव्यांग बांधवाना दिले. 


ठाणे जिल्हायातील बहुतांश पंचायत समितीमध्ये दिंव्याग बांधवासाठी कक्ष उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, परंतू कल्याण पंचायत समितीमध्ये ते दिलेले नव्हते, आधार अपंग संस्थेचे अध्यक्ष भगवान सुरोशे व त्यांच्या साथीदांरानी प्रयत्न केल्याने नुकताच कल्याण पंचायत समितीमध्ये त्यांना दिव्यांग कक्ष मिळाला आहे 


त्यामुळे नुकतेच उपसभापती पदी बिनविरोध निवडून आलेले भरतशेठ भोईर यांनी या कक्षास भेट दिली, यावेळी आधार संस्थेचे अध्यक्ष भगवान सुरोशे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, तसेच पत्रकार संजय कांबळे यांचेही पुष्पगुच्छ देऊन गौरविले, यावेळी झेडपी सदस्या रेश्मा मगर, कल्याण पंचायत समिती सद्स्या रेश्मा भोईर, संस्थेचे दिनेश जाधव व इतर बांधव उपस्थित होते. यावेळी भरतशेठ भोईर यांनी दिव्यांग बांधवासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत, सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर या कक्षाचा तालुक्यातील दिव्यांग बांधवाचे प्रश्न, अडचणी, समस्या सोडविन्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भगवान सुरोशे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...