Wednesday, 26 January 2022

कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन ; 'विभागीय आयुक्त विलास पाटील' यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न !!

कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन ; 'विभागीय आयुक्त विलास पाटील' यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न !!


नवी मुंबई, बातमीदार, दि.२६  :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात साजरा झाला. कोकण विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना विभागीय आयुक्तांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  


या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर, अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे, पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (पुर्नवसन) श्री. पंकज देवरे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीश भालेराव, उपायुक्त (नियोजन) श्री.संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, डॉ. बी.एन. सोनवणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निंबाजी गीते यांनी केले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...