प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस लाईन कल्याण येथे रक्तदान शिबीर संपन्न !!
"३५ रक्तदात्यांनी केले उस्फूर्तपणे रक्तदान"
कल्याण, संदीप शेंडगे : प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण येथील सावित्रीबाई फुले सभागृह पोलीस लाईन येथे मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकण विभागात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात विभागांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आले.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना, पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सहकार्याने पोलीस लाईन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस कर्मचारी, कार्यकर्ते, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत ३५ नागरिकांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस बॉईज संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती आर्किटेक्ट गणेश नाईक सुनील उतेकर दिनेश साळवे भारत गायकवाड सतीश मोरे पंकज डोईफोडे यासह जिजाऊ सामाजिक संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित जाधव संदीप शेंडगे कुशल मोरे साहिल मगर रिजवान सय्यद यांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले.




No comments:
Post a Comment