Saturday, 26 March 2022

पोषण पंधरवडा अंतर्गत दहीद बु. येथे सायकल रॅली !!

पोषण पंधरवडा अंतर्गत दहीद बु. येथे सायकल रॅली !!


बुलडाणा, बातमीदार, दि. २५ : तालुक्यातील दहीद बु येथे अंगणवाडी केंद्रातमार्फत पोषण पंधरवडा निमित्ताने गावातील मुल मुलींकारिता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोषण अभियाना अंतर्गत पोषण पंधरवडा दिनांक २१ मार्च ते ४ एप्रिल अंतर्गत राबविण्यात येत आहे. त्यानुसार दहीद बु येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत गावातील विद्यार्थी, अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी तसेच किशोरवयीन मुलींनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदविला.

    सायकल चालविल्यामुळे बालकांचा व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊन सायकल चालविण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. सायकलिंग साठी कुठल्याही इंधनाची आवश्यकता नसल्याने परिणामी हवेचे प्रदूषण होत नाही. सायकलमुळे कुठलेही रस्ते खराब होत नसल्याने एकप्रकारे राष्ट्रीय संपतीची काटकसरच होते. अशाप्रकारे सर्वच वयोगटातील मुलां- मुलींसाठी सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. आजची बालके ही देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे बालक स्वस्थ तर देश सशक्त हा संदेश पोषण पंधरवडयातील आयोजित सायकल रॅलीतुन ग्रामीण भागातील जनतेला देण्यात आला आहे.

   सायकल रॅलीचे आयोजनासाठी पर्यवेक्षिका श्रीमती आशा खरे, दहीद बू येथील अंगणवाडी सेविका पदमा राऊत, मीना राऊत, जिजा जाधव, नंदा जाधव, अंगणवाडी मदतनीस वृषाली राऊत, मनीषा गायकवाड, सुमन यंगड, चंद्रप्रभा धंदर यांनी प्रयत्न केले. सदर सायकल रॅलीला बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...