Saturday, 19 March 2022

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ, डोंबिवली शहर अध्यक्षापदी संगीता पाटील यांची निवड !!

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ, डोंबिवली शहर अध्यक्षापदी संगीता पाटील यांची निवड !!


डोंबिवली, हेमंत रोकडे, दि. १९ :
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या डोंबिवली शहराध्यक्षा पदी अभिनव विद्यालय डोंबिवली ईस्ट च्या श्रीमती संगीता रविंद्र पाटील यांची एक मताने निवड.
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून तमाम कलाविषयक आणि कला शिक्षकांच्या हितार्थ प्रश्न, समस्या सोडवून संविधानिक, लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणारा कला शिक्षक महासंघ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कला शिक्षक महासंघाचा नावलौकिक आहे. 


श्रीमती संगीता रविंद्र पाटील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कलाविषयक आणि कलाशिक्षक समस्या, प्रश्न संविधानिक आणि लोकशाही मार्गाने अग्रक्रमाने मांडून त्या सोडविण्यासाठी काम केले आहे. तसेच शाळेमध्ये अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून कलाविषय जिवंत ठेवला याची राज्य कला शिक्षक महासंघाने दखल घेऊन निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ वाढीसाठी प्रयत्न करेन असे मनोगत संगीता पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, रामचंद्र इकारे, प्रदेश सहचिटणीस सुहास पाटील, कोषाध्यक्ष रमेश महाजन, मुंबई विभागीय अध्यक्ष मोहन माने, मुंबई विभाग महिला अध्यक्षा सौ.भारती जाधव ,वाशिम जिल्हा सचिव गोपाल गावंडे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख नीता राऊत, ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकरे, जिल्हा सचिव संजय काशीद यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

2 comments:

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...