Saturday, 2 April 2022

समता विद्या मंदिरात उभारली सुसंस्काराची गुढी !!

समता विद्या मंदिरात उभारली सुसंस्काराची गुढी !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
       समता विद्या मंदिर साकीनाका, मुंबई या शाळेतील मुला- मुलींनी पारंपारिक वेश परिधान करून सुसंस्काराची गुढी उभारली. संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर व विद्यार्थी यांनी भारतीय संस्कृतीचे व संस्काराचे मोल जाणून त्याला उजाळा देण्यासाठी तसेच मुला-मुलींमध्ये निर्भयता, आत्मविश्‍वास,आणि परस्पर सहकार्य जोपासले जावे यासाठी ही सुसंस्काराची उभारली गुढी. शाळेतील इयत्ता पहिली ते नववीतील मुला-मुलींनी लेझीम ढोल ताशांच्या गजरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला. यावेळी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मातृ -पितृ ऋण, देशभक्ती, समाजऋण, सर्वधर्मसमभाव पर्यावरण रक्षण, आणि स्त्री -पुरुष समानता इत्यादी मूल्यांचे सगळ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. असा संदेश यावेळी दिला गेला. विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम ,सुजाण व आदर्श नागरिक घडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून समता विद्या मंदिर  शाळेत अथकपणे सुरू आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी टीम समताने खूप मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...