Saturday, 2 April 2022

लोनॲप वरून ऑनलाइन कर्ज घेताय सावधान !! "कर्जाची रक्कम भरण्यासाठी धमकीचे फोन"

लोनॲप वरून ऑनलाइन कर्ज घेताय सावधान !!

"कर्जाची रक्कम भरण्यासाठी धमकीचे फोन"


कल्याण, संदीप शेंडगे : मोबाईल आणि इंटरनेट वरून लोन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे इन्स्टंट आणि त्वरित ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज घेताना नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. 
       टिटवाळा येथील ग्राहकाला इन्स्टंट मोबाईल व इंटरनेट द्वारे ऑनलाईन कर्जाच्या पैशासाठी अज्ञात इसमाकडून वारंवार शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी मिळत आहे.
         तात्काळ पैसे मिळतात म्हणून अनेक जण असे ॲप डाऊनलोड करतात ॲप  वर आधार कार्ड पॅन कार्ड व बँकेचे सर्व डिटेल पाठवितात तुम्ही तुमची सर्व डिटेल पाठविल्यानंतर तुमच्या खात्यात तात्काळ दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजारापर्यंत कर्ज दिले जाते. तुम्ही कुठलेही लोन घेतलेले नसताना केवळ अशा कंपन्यांचे लोन ॲप जरी डाउनलोड केलेत तरी आपोआप तुमची परवानगी न घेताच लोनची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. जर तुमचे  ३००० रुपये कर्ज मंजूर झाले असेल तर खात्यात फक्त  १८०० रु. जमा होतात १२०० रुपये विविध प्रोसेसिंग फी व इतर चार्जेस च्या नावाने कापून घेतले जातात. शिवाय ७ दिवसांच्या आत तुम्हांला ३००० रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा करावी लागते सात दिवसाच्या आत पैसे जमा न केल्यास भरण्यासाठी वारंवार फोन येतात.
         तुम्ही पैसे भरण्यास विलंब लावला किंवा काही कारणास्तव भरू शकले नाही तर अश्लील पद्धतीने शिव्या देतात , तुमचा फोटो एडीट करून घाणेरड्या पद्धतीने सोशल मिडयावर पोस्ट केला जातो , तसेच तुमच्या ओळखीतल्या लोकांच्या मोबाईलवर त्यांच्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर जाऊन त्यांना मानसिक  त्रास दिला जातो. प्रचंड अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली जाते. व्हाट्सअप मेसेज वरून फोटो एडिट करून तुम्ही बलात्कारी आहात बलात्कार केला आहे असे फोटो व्हायरल करतात. त्यामुळे कुठल्याही असुरक्षित लोन ॲपला डाउनलोड करू नका. 
        संपूर्ण मुंबईसह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ॲपच्या माध्यमातून फसविले जात आहे. अनेक जण त्रास नको म्हणून त्यांची भरमसाठ व्याज आकारलेली रक्कम भरून टाकतात.
अशा बेकायदेशीर त्वरित कर्ज देणाऱ्या  कंपन्यांपासून नागरिकांनी सावध व्हावे आपली फसवणूक झाली असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवावी असे आवाहन मुंबई डेटलाइन तर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...