हिंदू नववर्षानिमित्त शाखा क्रमांक १५ व १७ आयोजित शोभायात्रेला उस्फुर्त प्रतिसाद !!
मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
हिंदू नववर्षानिमित्त शाखा क्रमांक १५ व १७ आयोजित शोभायात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सर्व उपशाखाप्रमुखांनी व युवा सैनिकांनी मेहनत घेऊन कार्यकर्त्यांची फौज उभी केली होती. चिकूवाडी रिक्षा स्टँडचे रिक्षाचालकांचा मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी झाले होते. उपशाखाप्रमुख मनोहर खानविलकर यांच्या विभागात शोभायात्रेचे उत्तम स्वागत व पाहुणचार झाला.
शेवटी उपविभाग प्रमुख माननीय श्री.दामोदर म्हात्रे व बोरवलीचे माजी आमदार हेमेंद्र भाई मेहता यांच्या भाषणाने सांगता झाली. या शोभा यात्रेस माननीय आमदार विलास पोतनीस साहेब, महिला विभाग संघटक सुजाता ताई शिंगाडे, विधानसभा संघटक परेश भाई सोनी, हेमा ताई पुजारी, उपविभाग संघटक वंदनाताई खाडे व मान्यवर उपस्थित होते.श्री सुनील पाटील शाखा प्रमुख आणि सचिन म्हात्रे शाखा प्रमुख यांनी श्री दामोदर म्हात्रे उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे उत्तम आयोजन केले होते. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.




No comments:
Post a Comment