कल्याण -मुरबाड परिसरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक शैलीची भुरळ ?
कल्याण, (संजय कांबळे) : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अजूनही शांत संयमी भाषण केले आहे. परंतु दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबा प्रमाणे या बंडखोर गद्दाराच्या विरोधात अत्यंत आक्रमणे मेळावे घ्यायला सुरुवात केली असून ही आक्रमक शैली कल्याण मुरबाड परिसरातील युवकांना प्रभावित होत आहे. त्यामुळे या तालुक्यातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
शिवसेनेच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या लोकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुठल्या कुठे नेऊन ठेवले, वाँचमन, रिक्षाचालक, भाजीविक्रेते, सायकल चोर अशा लोकांना आमदार, खासदार, मंत्री केले, असे आरोप खासदार संजय राऊत यांनी केले, याचा दाखला देण्यासाठी त्यांनी बंडखोर गुलाबराव पाटील यांचे भाषण ट्विट केले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटातील जवळपास सर्व आमदार व मंत्री शिंदे गटात सामील झाले. परंतु इतके होऊनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठेही भडकावू भाषण केले नाही, तरीही अनेक ठिकाणी बंडखोरांचे कार्यालय तोडफोड, जोडो मारो अंदोलन, पुतळे जाळण्याचे प्रकार, प्रेतयात्रा, निषेध, आदी अंदोलन शिवसैनिकांनी केले ,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दु:ख दिल्याने या बंडखोरा विरोधात तूफान संताप शिवसैनिकांनमध्ये निर्माण होत असताना ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संयम बाळगला होता.
परंतु युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मात्र अधिक आक्रमक झाले आहे, त्यांनी अनेक मेळावे घेऊन बंडखोरांना तूफान फटकारले आहे, त्यांना आव्हाने दिली आहेत, हिंम्मत असेल तर राजीनामा द्या,व निवडणुकीत उभे रहा, तूम्हाला तूमच्या मतदारसंघात येवून पाडणारच,या गद्दाराना विधासभेची पायरी चढून देणार नाही अशी शपतच त्यांनी घेतली, त्यांच्या या आक्रमकतेमुळे अनेक शिवसैनिकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली असल्याचे सांगत आहेत. आदित्य ठाकरे यांची आक्रमक शैली तरुणाई मध्ये अधिक लोकप्रिय होत असून मुंबई येथील युवासेनेच्या मेळाव्यात कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर आदी परिसरातून अनेक तरुण सामिल झाले होते.यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत, त्यांच्या समर्थनात कल्याण मुरबाड परिसरात बँनर झळकले आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आदित्य ठाकरे पुढे येत आहे. व लोकप्रिय देखील ठरत आहेत.
No comments:
Post a Comment