महाराष्ट्र सदनात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी !
नवी दिल्ली, बातमीदार, दि. 26 : समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर कार्य करणारे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज उभय महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात तसेच कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


No comments:
Post a Comment