दोन वर्षांच्या खंडानंतर अमरनाथ यात्रेला गुरुवारी सुरुवात, 10 हजार 700 भाविक रवाना !
भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
दोन वर्षांच्या खंडानंतर अमरनाथ यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी दक्षिण काश्मीर येथील अमरनाथ गुहा मंदिरात पवित्र शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी जम्मूहून ५७०० भाविकांचा जथ्था रवाना झाला. हा जथ्था गुरुवारी पहाटे २३० वाहनांतून भगवतीनगर येथील शिबिरातून रवाना झाला.
४३ दिवस ही यात्रा चालणार आहे. तिचा समारोप ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला होईल. अधिकारी म्हणाले, पहलगाम व बालटाल या जथ्थ्यामध्ये १०,७०० भाविक आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या मदतीने भाविकांच्या मदतीसाठी बालटाल व चंदनबाडीमध्ये ५० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. केंद्र सरकार मेडिकल टीम पाठवणार आहे.
८७ डॉक्टर्ससह १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी केंद्राकडे केली, केंद्राने १७६ चा कर्मचारी पाठवले.११ राज्ये-केंद्र शासित प्रदेशांतूनही जम्मू-काश्मीर प्रशासनाने १५४ डॉक्टर्स व २८३ आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी होती.

No comments:
Post a Comment