औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने मराठी - उर्दू माध्यम शाळेतील एकूण 14 शिक्षकांना कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या शिक्षक विजेत्यांना ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद येथील भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद संशोधन केंद्रातील सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन करीत गौरविण्यात आलेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पैठणचे माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, मनपा उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड, उपशिक्षणाधिकारी सुफी लईक अहेमद, डॉ. सय्यद नईम, माजी नगरसेवक बाबूभाई, जगदीश बेदवे, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अब्दुल रहीम , अमोल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment