पालघर जिल्हातील महिलांच्या सुरक्षितेबाबत कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण विशाखा समिती स्थापन करण्याबाबत शिवसेना (शिंदे गटाच्या) शहर संघटक रूचिता नाईक यांच्या मागणीला आले यश !
'केला होता सतत सहा महिने सतत पाठपुरावा'
वसई, प्रतिनिधी : वसई तालुका व संपुर्ण पालघर जिल्हामध्ये दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत होते, अजूनपर्यंत महिलांच्या सुरक्षितेबाबत विशाखा समिती गठीत करण्यात आली नव्हती महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत 1997 साली शासन निर्णय असताना देखिल अद्याप पर्यंत काही ठिकाणी तक्रार निवारण विशाखा समिती स्थापन करण्यात आली नाही.
वसई तालुका व पालघर जिल्हात प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे महिलांवरील अत्याचार छेडछाड, बलात्कार असे दुर्दैवी प्रकार घडत होते, अशा कलंकित घटनेला आळा बसावा यासाठी जिल्हातील शाळा, महाविद्यालय, सर्व सरकारी निमसरकारी कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करावे अशी मागणी रूचिता नाईक यांनी केली जेणे करून महिलांवरील अत्याचार होणे थांबेल.
याबाबत जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, गट शिक्षणाधिकारी , तहसिलदार, यांना वसई तालुका व संपुर्ण पालघर जिल्हा मध्ये महिलांच्या सुरक्षितेबाबत विशाखा समिती स्थापन करण्याबाबत *रूचिता नाईक* यांनी *महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर* यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली होती सतत पाठपुरावा करत महिला आयोगाने जिल्हाधिकारी यांना संपुर्ण पालघर जिल्हा मध्ये विशाखा समिती बंधनकारक करण्याबाबत आदेश काढण्याची सुचना दिली, व आज संपुर्ण पालघर जिल्हात विशाखा समिती स्थापन करण्याबाबत कलम 26 (1) अन्वये समिती स्थापन न केल्यास नियुक्तांवर /50.000 दंडाची तरतूद केली आहे.
यापुढे पालघर जिल्हात महिलांवरील बलात्कार, अत्याचार, अतिप्रसंग, छेडछाड होणे बंद होणार हे आमच्या महिलांचा सुरक्षितेबाबत आज आम्हाला खरा न्याय मिळाला असे मत *रूचिता अमित नाईक*
*महिला आघाडी शहर संघटक ; बाळासाहेबांची शिवसेना* यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment