Saturday, 3 December 2022

महापुरुषांचे पूर्णाकृती स्मारक उभे करण्याबाबत पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांचे आदेश !

महापुरुषांचे पूर्णाकृती स्मारक उभे करण्याबाबत पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांचे आदेश !

      जळगाव, अखलाख देशमुख, दि ३ :  धरणगाव शहरात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची बैठक पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांनी बोलावली होती.त्या बैठकीत विविध विकास कामाबाबत चर्चा झाली त्याचबरोबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुर्णाकृती स्मारक उभे करण्यात यावे अशी चर्चा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केली त्यावरून मंत्री महोदयांनी तात्काळ मुख्याधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकर मार्गी लावा असे आदेश दिले.त्याप्रसंगी अँड.संजयभाऊ महाजन, शिरिषआप्पा बयास,पी.एम.पाटील सर,माधुरीताई अत्तरदे, सौ.अंजली विसावे, पप्पू भावे, कैलास माळी सर, वासुदेव चौधरी, विजय महाजन, ललित येवले, कडुअप्पा बयास, भालचंद्र माळी, विलास महाजन, गुलाबराव मराठे, अहमद पठाण,ज्ञनंदकिशोर पाटील, भूषण धनगर, अजय चव्हाण, श्रीमती उज्वला पारेराव इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !! कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६) कल्याण डोंबिवली...