Tuesday, 28 March 2023

रायते, कल्याण येथील रायते ग्रामस्थ मंडळाचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन !

रायते, कल्याण येथील रायते ग्रामस्थ मंडळाचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन !

कल्याण, नारायण सुरोशी : रायते, कल्याण येथील रायते ग्रामस्थ मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे हनुमान मंदिरात चैत्र शुद्ध नवमी ३० मार्च ते चैत्र शुद्ध प्रतिपदा ७ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या हरिनाम सप्ताहात सायकांळी ५.३० ते ६.३० या वेळेत ३० मार्च ते ५ एप्रिल या काळात प्रवचन आयोजित केले आहे यात ह.भ.प.श्री वामन महाराज चिराटे (कल्याण),. ह.भ.प.श्री दिनेश महाराज तारमाळे (उशिद), ह.भ.प.श्री भालचंद्र महाराज सरनोबत (मांडा), ह.भ.प.श्री ताकदिर महाराज सुतार (सांगोडे), ह.भ.प.श्री धानाजी महाराज बोंबले (पोटगाव), ह.भ.प.श्री उमेश महाराज पावशे (पावशेपाडा), ह.भ.प.श्री महादू महाराज झाटे (पोई) तर रात्रौ ९ ते ११ या वेळेत ३० मार्च ते ६ एप्रिल या काळात ह.भ.प.श्रई विकास महाराज बोराडे (आळंदी), ह.भ.प.श्री आरतीताई खाटेघरे (खाटेघर, मुरबाड), ह.भ.प.श्री उत्तरेश्वर महाराज जाधव (माजलगाव, बीड), ह.भ.प.श्री महेंद्र महाराज भोईर (पहारे), ह.भ.प.श्री भारतीताई गाडेकर (वैजापूर), ह.भ.प.श्री विश्वनाथ महाराज वारिंगे (पालेगाव, अंबरनाथ), ह.भ.प.श्री योगेश‌ महाराज घरत (आळंदी), ह.भ.प.श्री माधव महाराज खापरे (म्हारळ) तसेच रात्रौ ११ नंतर हरिजागर हनुमान प्रासादिक भजन मंडळ, रायते व पालखी सोहळा यांच्याकडून करण्यात येईल, ७ एप्रिल ला काल्याचे कीर्तन विक्रांत महाराज पोडेकर (आळंदी) यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आभार व महाप्रसाद आयोजित केला असून दरवर्षी प्रमाणे हजारो भाविक या हरिनाम सप्ताहास उपस्थित राहतील असे आयोजक रायते ग्रामस्थ मंडळ, रायते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. दिपिका आग्रे तर सरचिटणीस पदी प्रतीक्षा कालप-निवाते यांची निवड..!

कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. दिपिका आग्रे तर सरचिटणीस पदी प्रतीक्षा कालप-निवाते यांची निवड..! प्रतिनिधी- निलेश कोकमकर  (...