कल्याण ग्रामीण भागात कोकण मराठी साहित्य परिषद शाखा !
कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा सुरू करण्याची उद्घोषणा को.म.सा.प.चे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी केली.
ग्रामीण भागात लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे या अनुषंगाने जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखेची सुरुवात करण्यात आली. जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे संपन्न झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी नवनिर्वाचित नियोजित को.म.सा.प. शाखा जाहीर करून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या शाखेने अनेकविध साहित्यिक उपक्रम करावेत असे आवाहन करून को.म.सा.प.चे युवा साहित्य संमेलन गोवेली येथे घेण्याची जबाबदारी रविंद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्याचे जाहीर केले. या प्रसंगी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, साहित्यिक विद्याधर ठाणेकर, जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, लेखक गिरीश कंटे, डॉ. विलास वेखंडे, कवी अनिल सुरोशी कल्याण, मुरबाड भागातील साहित्यिक रसिक आदी मान्यवर उपस्थित होते .
No comments:
Post a Comment