Saturday, 25 March 2023

जॉय संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान !

जॉय संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :

           जॉय सामाजिक संस्था मुंबई या संस्थेला नुकताच समाजात करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल उत्कृष्ट संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

प्रेरणा फॉउंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील विविध संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कल्याण येथील प्र.के. अत्रे नाट्यगृहात प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्षा दीप्ती गावकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.जॉयच्या वतीने असूंता डिसोझा,मीना भूतकर,भुषण मूळये आदी मान्यवरांनी हा पुरस्कार स्वीकारला.यापूर्वीही जॉय संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी जॉय संस्थेचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !! कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६) कल्याण डोंबिवली...