काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्याच्या कृतीच्या भारतिय कमुनिस्ट पक्षातर्फे निषेध !
चोपडा, प्रतिनिधी.. देशातील गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती यांना भेटू इच्छिणाऱ्या विरोधी पक्षांच्या शिष्यमंडळातील सभासदांना अटक करण्याच्या कारवाईचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करीत आहे.
या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार श्री संतोष कुमार देखील होते. ज्या पद्धतीने व घाई घाईने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यामुळे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य व संविधानात्मक संस्थांच्या अस्तित्वाबाबतचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अडाणी यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी संसदीय समिती ची स्थापना करा हि मागणी भाजप आरएसएस सरकारने संसदेला अनावश्यक मानत ठामपणे फेटाळून लावली. अशा परिस्थितीत चिंताजनक परिस्थितीत देशातील लोकशाही धर्मनिरुद्ध धर्मनिरपेक्षता आभार मानणाऱ्या संस्था व पक्ष यांनी एकजूतिने लढा करून भाजपा आरएसएसचे सरकार सत्तेवरून काढून टाकले पाहिजे, भाजप आरएसएसच्या या लोकशाही विरोधी कटकारस्थानांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करत आहे व सर्व लोकशाही धर्म निरपेक्ष शक्तींना एकजूट करण्याचे आवाहन करणारे पत्रक जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते का अमृत महाजन कां लक्ष्मण शिंदे ज्ञानेश्वर पाटील छोटू पाटील, वाल्मीक मैराळे ,जे डी ठाकरे, काळू कोळी, राजेंद्र झा आदींनी केले आहे..
No comments:
Post a Comment