पंचाहत्तर कुटुंबाना व्हाॅटर व्हील चे वाटप !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली तसेच Innovice Aspire Infratech Solustions PVT. LTD.यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरवाडी या गावामध्ये तब्बल 75 कुटुंबाना ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटण्यात आले. या उपक्रमासाठी भा.ज.पा.आदिवासी आघाडी पालघर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष मिलिंदजी भाऊ झोले तसेच त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्यां पालघर जिल्हा कुसुमताई झोले यांच्या अतोनात प्रयत्नाने व त्यांच्या विनंतीस मान देऊन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली तसेच Innovice Aspire Infratech Solustions PVT. LTD.या तिघांचा जोड होऊन हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या डोंगरवाडी या गावांमध्ये पार पडला.
यावेळी भाजपाचे कार्यकर्ते, गंगाराम फसाळे तसेच शेलमपाडा गावच्या पोलीस पाटील, दिपालीताई पेहरे भाजपाचे कार्यकर्ते मिलिंदजी भांगरे व अंकुश पाडेकर तसेच डोंगरवाडी या गावच्या आशा कार्यकर्ता प्रमिला निखडे व रविना निखडे आणि गावातील इतर मान्यवर उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment