Sunday, 25 June 2023

नालासोपारा पश्चिम मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उध्दघाटन !!

नालासोपारा पश्चिम मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उध्दघाटन !! 

*शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश*

वसई, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम मध्ये शिवसेना पक्षाचे उपशहरप्रमुख आनंद नगरकर यांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उध्दघाटन तसेच शेकडो कार्यकर्त्यान चा पक्ष प्रवेश जिल्हा संपर्कप्रमुख आ. रविंद्र फाटक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेला समाजकार्याचा वसा कायमपणे जपला जाईल. आगामी काळात नव्याने निर्माण होणाऱ्या आणि पुनर्बांधणी होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, जनसंपर्क कार्यालय, शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास शिवसेना उपनेते  जिल्हा संपर्क प्रमुख आ रविंद्र फाटक साहेबांनी  व्यक्त केला. 

शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करीत आगामी काळात शिवसेना पक्षाची ताकद वाढविण्याचा आणि समाजकार्याचा निर्धार केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर, लोकसभा समन्वयक नविन दुबे, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष शाहरूख भाई, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंग, उपजिल्हाप्रमुख धनंजय मोहिते, उपतालुकाप्रमुख अजित खांबे, जिल्हा सचिव अतुल पाटील, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक शहरप्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख गणेश मुनगेकर, विभागप्रमुख दानिश करारी, विभागप्रमुख जितेंद्र ठाकुर, महिला विभाग संघटक सुजाता जाधव विभागप्रमुख किरण काळे, उपविभाग प्रमुख सचिन परब व कार्यकर्ते उपस्थित होते....

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...