शिवसेना (कल्याण पश्चिम) तर्फे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विशाखा विश्वनाथ यांचा सत्कार !!
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण येथील साहित्यिक विशाखा विश्वनाथ साहित्य विश्वातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला हि गोष्ट ऐतिहासिक कल्याण शहरासाठी अंत्यंत अभिमानाची असल्याने आज शिवसेना कल्याण पश्चिम तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना पक्षाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरप्रमुख रवी पाटील यांनी साहित्य विश्वातील मानाचा "साहित्य अकादमी पुरस्कार" हा आपल्या शहरातील विशाखा विश्वनाथ यांना प्राप्त झाला हि अभिमानाची गोष्ट असून त्यांचा गौरव करण्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केला असे सांगितले. यावेळी उपस्थित आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशाखा विश्वनाथ यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment