Tuesday, 3 October 2023

सर्वाधिक महसूल गोळा करून देणा-या कल्याण च्या सहा दुय्यम निबंधक कार्यालयाचा वीजबिल थकवल्याने वीज पुरवठा खंडित?

सर्वाधिक महसूल गोळा करून देणा-या कल्याण च्या सहा दुय्यम निबंधक कार्यालयाचा वीजबिल थकवल्याने वीज पुरवठा खंडित?

कल्याण, (संजय कांबळे) घरे खरेदी विक्री, जमीनीचे रजिस्ट्रेशन आदी व्दारे शासनाला सर्वाधिक पैसा गोळा करून देणा-या कल्याणच्या रजिस्ट्रेशन कार्यलयाचा वीज पुरवठा खंडित केला गेला दोन महिन्यांचे विज बिल थकवल्याने महावितरणने ही कारवाई केली.

कल्याण पश्चिमेला चिकनघर येथे सहा दुय्यम निबंधक २ चे रजिस्ट्रेशन कार्यालय आहे. परिसरातील मोठ्या प्रमाणात लोक खरेदी विक्री, रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे येतात. दररोज लाखोंचा महसूल या विभागातून शासनाकडे जमा होतो, या कार्यालयात कर्मचारी कोण व दलाच्या कोण हेच कळत नाही. प्रत्येकाने आप आपली माणसं बांधून ठेवल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जाताना दिसतात. अशा या पैसा गोळा करून देणा-या रजिस्ट्रेशन कार्यालयाचे दोन महिन्यांचे वीजबिल सुमारे ९ हजार ४०० रुपये थकले होते. त्यामुळ महावितरणने कल्याण पश्चिमेकडील चिकनघर येथील रजिस्ट्रेशन कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. शनिवारी रात्री महावितरण ही कारवाई केली. सकाळच्या सुमारास रजिस्ट्रेशन कार्यालयातर्फे वीज बिल भरणा करण्यात आल्यानंतर वीस पुरवठा सुरळीत करण्यात आलाय.

दरम्यान हे रजिस्ट्रेशन कार्यालयात कल्याण डोंबिवली परिसरातील घरांचे जमिनीचे रजिस्ट्रेशन होते. शनिवारी ही कारवाई करण्यात आली शनिवार ते सोमवारी कार्यालय बंद होतं त्यामुळे काही गैरसोय झाली नाही मात्र आज कार्यालय उघडले, त्यामुळे गर्दी वाढली होती अशात लाईट कट केल्याने  नागरिकांची, कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली...

आज सकाळच्या सुमालाच रजिस्ट्रेशन करायला तर्फे थकीत बिलाचा भरणा करण्यात आलं व दहा वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाचा पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे शासनाला लाखो रुपयांचा महसूल जमा करून देणा-या रजिस्ट्रेशन कार्यालयाने केवळ ९ हजार ४०० रुपये थकबाकी ठेवावी व त्याकरिता त्यांची लाईट कापावी हे न पटण्यासारखे वाटते का !

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...