Monday, 2 October 2023

वाशी नवी मुंबई येथील मराठी साहित्य मंदिर येथे ब्युटी सेमिनार व फँशन शो चे आयोजन !!

वाशी नवी मुंबई येथील मराठी साहित्य मंदिर येथे ब्युटी सेमिनार व फँशन शो चे आयोजन !! 

*बाई पण भारी फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी व जागतिक किर्तीचे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट संजय प्रभाकर यांची उपस्थिती*

कल्याण, (संजय कांबळे) : येत्या ९ आँक्टोंबर रोजी मराठा साहित्य मंदिर, वाशी नवी मुंबई येथील सेक्टर४ मध्ये एकदिवसीय ब्युटी सेमिनार व फँशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या, बाई पण भारी, या चित्रपटाच्या मुख्य कलाकार अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी या उपस्थित राहणार असून याशिवाय द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजचे विनर नवीन प्रभाकर हेही उपस्थित राहून लाईव्ह डेमो व मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे इच्छुक ब्युटीशियन नी याचा लाभ घ्यावा असे अवाहन वर्षा काळे यांनी केले आहे. 

नऊ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एक दिवशीय ब्युटी सेमिनार आणि फॅशन शो मध्ये बाई पण भारी तील मुख्य कलाकार सुकन्या कुलकर्णी आणि द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज चे विनर श्री नवीन प्रभाकर पहचान कौन हे पाहुणे म्हणून घेत आहेत. 

या शोमध्ये सर्व ब्युटीशियनसना स्किनचं व मेडिकल नॉलेज मिळावा म्हणून मेडी फेशियल कसा करावा हा प्रकार प्रथमच दाखवला जाणार आहे. त्यानंतर नाम प्रसिद्ध जागतिक  स्तरावरील सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट संजय प्रभाकर हे वेस्टन मेकअप टेक्निक्स दाखवणार आहेत.संजय प्रभाकर यांनी या आधी बिगबी अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकर, धकधक गर्ल माधुरी दीक्षित आदींचा मेकअप केला असून ते जागतिक किर्तीचे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. 

ब्रायडल हेअर लाईफ डेमो दाखवणार आहेत प्रसिद्ध हेअर डिझायनर सारस पाटील. त्यानंतर महिलांसाठी खास आकर्षण असलेला फॅशन शो सुरुवात होईल. तसेच नेल आर्ट मेहंदी आणि ब्रायडल मेकअपचे फॅशन शो देखील आयोजित केलेले आहेत. 

या सर्व कार्यक्रमानंतर शेवटी सेलिब्रिटी च्या हातून सर्वांना मानचिन्ह व सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास बाई पण भारी या चित्रपटाच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांच्या उपस्थिती मुळे महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...