Monday 19 February 2024

ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारीला कोकण विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन !!

ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारीला कोकण विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन !!

*नमो महारोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी*
 
ठाणे , प्रतिनिधी - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक २४ व २५ फेब्रुवारी 2024  रोजी "नमो महारोजगार" कोकण विभागीय मेळाव्याचे आयोजन आयलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात आले असून नमो महारोजगार मेळाव्यासाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना, उद्योजक, विविध स्टार्टअपचे स्टॉल, स्वयंरोजगार  करणाऱ्यांसाठी  विविध महामंडळे, कौशल्य व करिअर मार्गदर्शन  करणाऱ्या संस्था,  सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे व रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदांनुसार ऑनलाईन अप्लाय करावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी.

रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र याठिकाणी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व नमो महारोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे. तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. 

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...