Friday 1 March 2024

बारामतीत शासकीय दौऱ्यावर येणाऱ्या मा.मुख्य मंत्री व उप मुख्य मंत्र्यांना मा.शरद पवारांना कडून अतिथ्य भोजनाचे निमंत्रण !!

बारामतीत शासकीय दौऱ्यावर येणाऱ्या मा.मुख्य मंत्री व उप मुख्य मंत्र्यांना मा.शरद पवारांना कडून अतिथ्य भोजनाचे निमंत्रण !!

** अखेर दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेत मा.शरद पवारांचे नाव.

भिवंडी, (कोपर), दिं,१, अरुण पाटील :
          बारामती दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी अतिथ्य भोजनाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांची आणखी एक गुगली राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. 
           शरद पवार यांनी यासंबंधी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात, शनिवारी आपण बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच यादिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.
            आपण मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण या पूर्वीच दिले आहे. मंत्रि मंडळातील मेळाव्यानंतर सहकाऱ्यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत मा.शरद पवार यांच्याकडून फडणवीस व अजित पवार यांनाही देण्यात आली आहे.
            मात्र जुलै २०२३ मध्ये मा.शारद पावरांन  विरोधात जाणारे मा.अजित पवार या सस्नेह भोजनाला जाणार की नाही ते महत्त्वाचे ठरणार आहे. बारामतीत आयोजित  शनिवारी दिलेली महारोजगार मेळावा  कार्यक्रम पत्रिकेत मा. शरद पवार यांचे नाव नमूद नव्हतं त्या नंतर सरकारवर टीका करण्यात येत होती .ते राज्याचे खासदार असून ते राज्य सभेचे प्रतिनिधित्व करतात.या कार्यक्रमाला राज्यातील लोक प्रतिनिधींना निमंत्रण नाही असा त्याच अर्थ होतो,असे मा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.त्या नंतर सरकारने सारवासारव करत दुसरी नवीन निमंत्रण पत्रिका काढून त्यात  मा.शरद पवार यांचे नाव टाकले आहे.
             बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. त्यात आता शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये स्वागत करण्यास आनंद होईल आणि गोविंदबागेत आतिथ्य भोजनाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या नव्या गुगलीमुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे निमंत्रण स्वीकारतील कि नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

एम. बी. लॉ. असोसिएट तर्फे 'ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस "कमलधाम वृद्धाश्रमात साजरा**

एम. बी. लॉ. असोसिएट तर्फे 'ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस "कमलधाम वृद्धाश्रमात साजरा**  ...