Sunday, 2 June 2024

दहावीत १०० टक्के मिळवणाऱ्या आणि पहिल्याच प्रयत्नात यु.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा केला गौरव..!

दहावीत १०० टक्के मिळवणाऱ्या आणि पहिल्याच प्रयत्नात यु.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा केला गौरव..!

कल्याण, सचिन बुटाला : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के मिळवलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच यू.पी.एस.सी. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी गौरव केला. 

शालेय जीवनात दहावीच्या परीक्षेला तर उमेदीच्या काळात यु.पी.एस.सी. परीक्षेला अनन्य साधारण महत्व आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मोहने भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एकीने दहावीच्या परीक्षेत तर दुसरीने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. कु.सृष्टी काळे हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण प्राप्त केले. तर कु.श्वेता डोंगरे या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात यु.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. ही गोड बातमी समजताच आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांच्या घरी जाऊन या विद्यार्थिनींची भेट घेतली व त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदारांसह विभाग प्रमुख राम तरे, शाखाप्रमुख रोहन कोट, राजा पाटील, विजय परियार, युवासेना शहर प्रमुख दिनेश निकम तसेच शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन ! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील उरण ग...