Tuesday, 31 December 2024

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा, इंदवी तुळपुळे यांचे प्रशंसोद्गार !

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा, इंदवी तुळपुळे यांचे प्रशंसोद्गार !

ठाणे, दि. ३०,

ठाण्यारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि गावांतूनही असे उपक्रम झाले पाहिजेत; तिथेही मुलांमध्ये अभिव्यक्तीची प्रेरणा वाढवली पाहिजे, असे विचार मुरबाड येथे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अनेक वर्ष कार्य करणाऱ्या श्रमिक मुक्ति संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांनी नाट्यजल्लोष कार्यक्रम बघून व्यक्त केले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सुप्रिया मतकरी विनोद म्हणाल्या, वंचित समाजातील मुलामुलींच्या अभिव्यक्तीला मुक्त वाव देणारा वंचितांचा रंगमंच हा माझ्या बाबांनी म्हणजेच श्रेष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून उभा राहिला पण त्याला पुढे ११ वर्ष, मतकरी सरांच्या मागे सुद्धा, सतत साकारण्याचे काम समता विचार प्रसारक संस्थेने नेटाने केलं, हे खरंच कौतुकास्पद आहे.

या वेळी ‘बालरंग’ या संस्थेचे संस्थापक सुप्रसिद्ध नाट्यकर्मी श्रीनिवास नार्वेकर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून म्हटले की वंचित समाजातूनच आतापर्यंत श्रेष्ठ कलाकार रंगमंचाला प्राप्त झाले आहेत; अशा उपक्रमामधून अनेकांना संधी उपलब्ध होईल. सुप्रसिद्ध अभिनेते दीपक कदम या वेळेस मुलांचे कौतुक करण्यास आवर्जून हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाट्यजल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी केले.

विविध कलाविष्कारांद्वारे मुलांची अभिव्यक्ती

नाटिका, नृत्य, कथाकथन, मुशायरा अशा रंगारंग कार्यक्रमांच्या सादरीकरणाने वंचितांच्या रंगमंचावर नाट्यजल्लोषचे ११ वे पर्व काल संपन्न झाले. दर वर्षी प्रमाणे ठाण्यातील अनेक वस्तीतील मुलांनी विविध कलाविष्कारा द्वारे वेगवेगळ्या विषयांबाबत आपले विचार व्यक्त केले. रमाबाई आंबेडकर गटाने ‘मुलगी शिकलीच पाहिजे’ या विषयावर नाटिका सादर केली. धर्मवीर नगर गटाने ‘संघर्ष स्त्रियांचा’ हा विषय अतिशय सुविहित नाटिकेद्वारे सादर केला. मनोरमा नगर विभागाने ‘समता’ हा विषय पथनाट्यातून सादर केला. किसन नगर  गटाने चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनकार्यावर नाटिका सादर केली. दिशा अहिरे हिने मी सावित्रीबाई बोलते हा एकपात्री प्रयोग सादर केला. राबोडी येथील मुलींनी त्यांच्या शिक्षिका रेहान चिपळूणकर यांच्या साथीने मुशायरा पेश केला. घणसोली येथील वी नीड यू सोसायटी च्या मुलींनी खेळ मांडला.. या गाण्यावर नृत्य सादर केले. मनोरमा नगर येथील मुलींनी लाठी - काठी आणि तलवार बाजीची प्रात्यक्षिके सादर केली. कळवा विभागातील मुलींनी नृत्य सादर केली. ज्ञानसाधना महाविद्यालयातील NSS गटाने HIV विषयी जागृतता निर्माण करणारे पथनाट्य सादर केले. 

प्रेममय साने गुरुजी

संस्थेचे संस्थापक संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया, लतिका सु. मो. यांच्या पुढाकाराने ‘प्रेममय साने गुरुजी’ या कार्यक्रमात नीलिमा सबनीस, मोनाली, पल्लवी, सृष्टी दळवीआणि श्रद्धा गायकवाड यांनी साने गुरुजींच्या कथा कथन केल्या. त्यावेळी राबोडी फ्रेंड सर्कल या शाळेतील मुला मुलींनी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म … ही प्रार्थना ‘ धर्म तो एकही सच्चा, जगत को प्यार देव वो…’ हिंदीतून सादर केली. संस्थेच्या हितचिंतक सीमा साळुंखे यांनी मुलांबरोबर श्यामची आई हा चित्रपट बघतानाचा अनुभव सांगितला.

उत्तम लेखन व अभिनयाबद्दल विशेष बक्षिसे

या कार्यक्रमात ज्या मुलामुलींनी चांगला अभिनय वा लेखन केले त्यांना सुप्रिया मतकरी विनोद यांच्या कडून विशेष बक्षिसे देण्यात आली. त्यात, सम्यक साळवे, तेजस्वी जाधव, ईशा शेलार, अथर्व कदम, दीक्षा अहिरे, गुडिया बिंद, शेख झोया आरिफ, अरिंजय येरवदे, पल्लवी लंके, करण औताडे यांचा समावेश आहे. कार्यक्रमास जयंत कुलकर्णी, भारती पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम, उपाध्यक्ष सुनील दिवेकर, कार्यकारी सचिव अजय भोसले यांनी विशेष मेहनत घेतली.

विनीत, 
मीनल उत्तुरकर 
समता विचार प्रसारक संस्था  
9833113414

ववर्ष - नव्या सुरुवातीची सोनेरी संधी- संत राजिन्दर सिंह जी महाराज

ववर्ष - नव्या सुरुवातीची सोनेरी संधी
- संत राजिन्दर सिंह जी महाराज

आपण सर्वजण हे चांगल्या प्रकारे जाणून आहोत की, संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. ही एक अशी ही वेळ असते जेव्हा आपण आपल्या जीवनातील सामान्य कामकाजाला काही काळ थांबवून, आपले लक्ष त्या कार्यांकडे करतो, ज्यामुळे आपणांस आनंद मिळतो. ही अशी वेळ असते जेव्हा आपण गतवर्षाला मागे सोडतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने करतो.

जर आपण आपल्या मागील वर्षावर एक नजर टाकली असता, आपणांस असे दिसून येईल की, व्यतीत केलेल्या वर्षांमध्ये अशा अनेक वेळा आपल्या जीवनात ईश्वरीय कृपेचा आपण अनुभव केला असेल. ठीक याच्या विपरीत आपल्या जीवनात अनेक वेळा असे सुद्धा प्रसंग येतात की, जेव्हा आपण कठीण आणि दुःखी-कष्टी परिस्थितीतून सुद्धा जातो. अशावेळी आपल्याला या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे की, प्रत्येक गुलाबाला काटे सुद्धा असतात, त्यांची ही भूमिका आहे आणि त्यांचेही स्वतःचे असे महत्त्व आहे. ठीक अशाच प्रकारे आपल्याही जीवनात सुख आणि दुःख दोन्हीही येतात, जर आपण या बाबींवर विचार केला तर आपणांस असे दिसून येईल की, आपण प्रत्येक परिस्थितीत शांत व सुखी राहू शकतो.

नववर्ष फक्त भौतिक आनंदच साजरा करण्याची वेळ नसून, ही आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याची सोनेरी संधी सुद्धा आहे. आपण असे पाहतो की नवीन वर्षारंभी बरेचसे लोक चुकीच्या सवयी सोडून चांगल्या सवयी धारण करण्याचा सुद्धा संकल्प करतात. हा एक असा प्रसंग आहे जेव्हा ते स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. काही लोक धूम्रपान न करण्याचा प्रण घेतात, जेव्हा की बरेचसे लोक असेही असतात की जे मांसाहार सोडून शाकाहारी जीवन जगण्याचा संकल्प करतात, काही लोक असेही असतात जे क्रोध न करण्याचा, सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा आणि इतरांची मदत करण्याची प्रतिज्ञा घेतात. बरेच विद्यार्थी असे असतात की जे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला अभ्यास अधिकाधिक करण्याचा संकल्प करतात. लक्षपूर्वक पाहिले असता, प्रत्येक जण आपापल्या स्तरावर आपल्या जीवनात काही चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

नववर्षाच्या याप्रसंगी खूप कमी लोक असे असतात की जे अशी प्रार्थना करतात की, नववर्षात आपण अधिकाधिक अध्यात्मिक विकास करूया. जर आपण सुद्धा नववर्षी आध्यात्मिक रूपाने प्रगती करू इच्छित असु तर, यासाठी आपल्या दिनचर्येला लक्षपूर्वक पहावे लागेल. अशा मध्ये आपला हाच प्रयत्न असावा की आपण असे कोणतेच कार्य करू नये जे आपणांस या उद्देशापासून दूर करेल. अध्यात्मिक रूपाने प्रगती करण्याकरिता आपणांस ध्यानाभ्यासाला धारण करावे लागेल. याकरिता आपणास वर्तमान काळातील एखाद्या पूर्ण संतांकडून ध्यानाभ्यास करण्याची पद्धती शिकावी लागेल. आपण आपल्या दिनचर्येमध्ये ध्यानाभ्यास शामिल करतो, तेव्हां आपणांस आपल्या अंतरी प्रभुच्या ज्योति आणि श्रुति चा अनुभव होतो. या शिवाय आपल्याला असाही अनुभव येतो की, प्रभुची जी ज्योत मला प्राणशक्ती देत आहे, तीच इतरांमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर आपणास या बाबीवर पक्का विश्वास होतो की, आपण सर्वजण एकाच पिता-परमेश्वराची संतान आहोत.
 येणाऱ्या या नवीन वर्षी आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण जो प्रयत्न करू तो कितीही थोडा जरी असेल, आपण जे पाऊल उचलू ते जरी कितीही छोटे का असेना ते आपल्याला आपल्या ध्येयाजवळ घेऊन जाईल. नववर्षी आपला असा प्रयत्न असावा की, आपला भूतकाळ जरी कसाही असेल, परंतु आपले भविष्य कलंक रहित राहील. आपण आपले विचार सदैव सकारात्मक ठेवूया याकरिता अध्यात्मिक मार्गच आपल्याला मदतगार होऊ शकतो.

चला तर! आपण सुद्धा नववर्षी अध्यात्मिक प्रगती करण्याचा संकल्प करूया, कारण की आपल्या अंध्यात्मिक प्रकृती वरच आपली शारीरिक व मानसिक प्रकृती निर्भर आहे. जर आपण अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रण केला तर, आपण असे पाहू की याने केवळ आपले अंध्यात्मिकच नाही तर शारीरिक व मानसिक प्रकृती सुद्धा ठीक होईल. नववर्षाच्या प्रसंगी आपण आपल्या चुकांकडे लक्ष न देता, एका आशावादी अंतःकरणाने एका नवीन वर्षांची सुरुवात करूया. आपणा सर्वांना जीवनातील सफलते करिता खूप खूप शुभेच्छा!

*शेतकरी - कष्टकऱ्यांसाठी झटणारा खरा संघर्ष योद्धा : जयराम दादा भोईर*

*शेतकरी - कष्टकऱ्यांसाठी झटणारा खरा संघर्ष योद्धा : जयराम दादा भोईर*

जयराम भोईर यांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिव दुःख झालं. ठाणे पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्यांसाठी झटणारा खरा संघर्ष योद्धा आपल्यातून गेल्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. वाडा तालुक्यातील निंबवली या गावातील शेतकरी कुटुंबातील असणारे जयराम भोईर यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत नेहमीच पुढाकार घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. साधारण 1990 नंतर इथला शेतकरी वर्ग विविध समस्यांनी पिचला गेला होता. त्यांच्यावर टाकल्या गेलेल्या वेठबिगाराच्या केसेस असतील, शेती उत्पादनांना मिळणारा तुटपुंजा भाव असेल, विविध शासकीय प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील यासारख्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच प्रसंगी संघर्ष ही उभा केला. ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध पक्ष - संघटनांमध्ये विखुरलेले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पुढारी, लोकप्रतिनिधी यांना एकाच ठिकाणी आणून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे जयराम भोईर होत. 

शेतकऱ्यांचे विविध समस्या सोडवत असतानाच बोरिवली नॅशनल पार्क सारख्या ठिकाणी आदिवासी वस्तीतील बांधवांच्या समस्यांसाठीही त्यांनी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा संघर्ष केला. असा त्यांच्या कामाचा लेखाजोखा प्रचंड आहे. 

वास्तविक जयराम भोईर यांचे गाव निंबवली हे वाडा तालुक्यात येत असले तरी त्यांच्या दृष्टीने तानसा नदी पलीकडे असणारे भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी - वज्रेश्वरी हा परिसर त्यांच्यासाठी अगदी हाकेच्या अंतरावरचा आहे. मात्र 25 - 30 वर्षांपूर्वी येथील तानसा नदीवर पूल नसल्याने या ठिकाणी जाण्यासाठी निंबवली परिसरातील ग्रामस्थांना केळठण - डाकीवली - अंबाडी मार्गे वज्रेश्वरी - गणेशपुरी असा अठरा-वीस किलोमीटरचा प्रवास करून जावं लागत होतं. ही समस्या लक्षात घेऊन जयराम भोईर यांनी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करून निंबवली - गणेशपुरीला जोडणारा तानसा नदीवर पूल तयार करून घेतला, यासाठी तत्कालीन स्थानिक आमदार विष्णूजी सवरा यांचेही मोलाचे योगदान या पुलासाठी लाभलं. त्यानंतर केळठण - अकलोली या गावाला जोडणारा तानसा नदीवरील पूलही काही वर्षानंतर तयार करण्यात आला. अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी जयराम भोईर यांनी सातत्याने आपलं योगदान दिलेलं आहे, याची आठवण आज त्यांच्या निधनानिमित्त करणं कर्मप्राप्त आहे.

स्वर्गीय जयराम भोईर यांच्या जाण्याने आपण ठाणे पालघर जिल्ह्यातील एका संघर्ष योध्याला व संवेदनशील कार्यकर्त्याला मुकलो आपण आहोत, मी अखिल भारतीय कुर्मी (कुणबी) महासभा महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाडा तालुका, कोकण पत्रकार संघ यांच्यावतीने स्व. जयराम भोईर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

*जयेश शेलार - पाटील*
*महासचिव* : अखिल भारतीय कुर्मी (कुणबी) महासभा महाराष्ट्र, 
*अध्यक्ष* : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाडा तालुका, 
*अध्यक्ष* : कोकण पत्रकार संघ 
मो. 7620256750

ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे यांच्या वतीने दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा संपन्न.

ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे यांच्या वतीने दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा संपन्न.

मुंबई - निलेश कोकमकर 

       चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा गावातील ग्रामस्थांनी आणि मुबंई- पुणे सारख्या शहरातील होतकरू तरुणांनी स्थापन केलेल्या ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे ह्या मंडळा मार्फत दरवर्षी अनेक शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक काम निःस्वार्थीपणे  करण्यात येते. त्याच बरोबर दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत गावातील रहिवाशी - तरुण - तरुणी यांना एकत्रित करण्यास प्रयत्न करत आहे. प्रतिवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यातीलच एक उपक्रम म्हणजेच दिनदर्शिका- २०२५चा प्रकाशन सोहळा दादर येथे मान्यवर, ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे सदस्य, जाहिरातदार, हितचिंतक आणि देणगीदार यांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला..

   दिनदर्शिका प्रकाशन युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रुग्ण सामाजिक संस्थेंचे अध्यक्ष मा. अमोल सावंत साहेब, सचिन धुरी ,  प्रकाश वरेकर, प्रविण जड्याळ, निलेश कोकमकर (पत्रकार समाजसेवक), विवेक आगरे, बारकू बेंडल, काशिनाथ घोरपडे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.. यावेळी मंडळाचे अध्यक्ष - उदय कदम, सचिव - रणजित वरवटकर, उपाध्यक्ष - नागेश खरात, खजिनदार- संकेत आगरे, विजय शिगवण, सदस्य - विकास कदम, अनिल भुवड, प्रथमेश कदम,गजानन तांबडे, मंगेश तांबे, महेश आखाडे, संचित गोरे, सुभाष आखाडे, हर्षद खरात, सूरज आगरे,वैभव खरात, वैभव गुरव उपस्थित होते.

   मंडळाच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शाळेला भेट वस्तू, गावच्या शिमेवर प्रवेश द्वार उभारणी, महिला दिना निमित्त गावातील महिला यांना भेटवस्तू देणे असे गावाच्या हिताचे अनेक  उपक्रम राबवण्यात येतात.. ह्या दिनदर्शिकेमध्ये गावच्या वाडीप्रमाणे असणाऱ्या कार्यक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे महत्वाचे नंबर यांची  नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील रहिवाशी यांना उपयोगी ठरणारी परिपूर्ण ही दिनदर्शिका आहे ह्यांची पूर्ण माहिती देऊन आणि उपस्थितांचे आभार मंडळाचे सचिव रणजित वरवटकर मानून सोहळ्याची सांगता साली

Monday, 30 December 2024

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर !

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर !

     ठाणे, दि. ३० - सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रक शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

     या परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, तसेच विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात हे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. (परिपत्रक बातमीसोबत जोडण्यात आले आहे.)
     हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२२७१५४०२१७४०७ असा आहे.

२५ व्या वर्धापनदिनानिमित्त कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ प्रकाशन सोहळा थाटामाटात संपन्न !

२५ व्या वर्धापनदिनानिमित्त कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ प्रकाशन सोहळा थाटामाटात संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे शाखेच्या २५ व्या  वर्धापनदिनानिमित्त भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ चे प्रकाशन सोहळा विक्रोळी पार्क साईट शिवाजी मैदान, विक्रोळी (प.) मुंबई -७९ येथे बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम, कुणबी मध्यवर्ती संघ सरचिटणीस कृष्णा वणे, कुणबी युवा अध्यक्ष तथा संघ सहसचिव माधव कांबळे यांच्या हस्ते पार पडला.

         रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३-३० वा. राम नगर शिवसेना शाखा क्रमांक १२७ येथून मिरवणूक सुरु होऊन ती अमृत नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिला लेझीम, खालू बाजा, अनेक वाद्यवृंद संच, आणि विविध महापुरुष, शेतकरी, संत यांच्या भूमिका सादरीकरण करत पुढे बँक ऑफ इंडीया मार्गे सुजाता हॉटेल आशिर्वाद सोसायटी जवळून संदेश विद्यालय ते विद्यादीप शाळेकडून खाली साईबाबा मंदीर असे करून श्री छत्रपती शिवाजी महाराज  मैदान येथे समारोप साठी सायंकाळी ६-३० वा पोहचली. या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष तथा ईशान्य मुंबई उपाध्यक्ष बळीराज सेनाचे सोनू शिवगण, शाखा सचिव तथा सचिव विधानसभा घाटकोपर बळीराज सेना सचिन शिवगण, शाखा खजिनदार उपसचिव विधानसभा घाटकोपर बळीराज सेना चंद्रकांत भोज, शाखा संस्थापक तथा घाटकोपर विधानसभा अध्यक्ष बळीराज सेना आत्माराम बाईत, महिला शाखा अध्यक्षा अश्वीणी बाईत, महिला शाखा सचिव अपर्णा जागडे, प्रमुख पाहुणे म्हणून बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम, कुणबी मध्यवर्ती संघ सरचिटणीस कृष्णा वणे, कुणबी युवा अध्यक्ष तथा संघ सहसचिव माधव कांबळे, वासुदेव साळवी- बळीराज सेना सिंधुदुर्ग प्रमुख, सौ.गोंधळी, शिवसेना (उबाठा)चे संजय भालेराव, शिवसेना (शिंदे) डॉ. सुभोध भावधाणे, काँग्रेसचे राम गोविंद यादव आणि सर्व बळीराज सेना पदाधिकारी महिला पदाधिकारी, सर्व कुणबी समाजोन्नती संघ संलग्न विभागिय शाखा पदाधिकारी, सदस्य, युवक मंडळ पदाधिकारी, सदस्य, विवाह मंडळ पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. 

        सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रम सुत्रसंचालन सचिन शिवगण,    चंद्रकांत भोज यांनी केले तर प्रस्तावना सत्यवान शिंदे (बळीराज सेना सिंधुदूर्ग उपाध्यक्ष घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष) यांनी केली यावेळी प्रकाश वालम, दिलिप कातकर, चंद्रकांत गोवळकर, अमर डीके, सुरेश मांडवकर, रामानंद कणेरी, दिनेश नावले, मनिष वालम, शंकर मेणे, जनार्दन नाक्ती, अशोक नाक्ती, राजेश बने, अरविंद हरमले, वसंत राऊत, प्रताप काटकर, थोरे, निंबरे, खामकर सर्व कार्यकारीणी पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद, महिला कार्यकर्त्या पदाधिकारी, सदस्य तसेच प्रसिद्धी प्रमुख शांताराम गुडेकर, केतन भोज यांच्यासह कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृ संस्थेचे पदाधिकारी,युवक मंडळ पदाधिकारी, बळीराज सेना पदाधिकारी, कु.स.संघ शाखा विक्रोळी-घाटकोपर पदाधिकारी, सदस्य, सभासद, महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, आजी -माजी पदाधिकारी, सदस्य, वधू - वर सूचक मंडळ पदाधिकारी, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान उपस्थित सर्व मान्यवर यांचा शाल, पुष्प करंडक, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व कुणबी समाज बांधव, भगिणी, युवावर्ग सर्वांनी आपला बहुमुल्य वेळ समाज्यासाठी देऊन सहकार्य केल्याबद्दल कु.स. संघ मुंबई विभागीय शाखा  विक्रोळी - घाटकोपर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांच्यातर्फे सर्वांचे आभार व्यक्त व्यक्त करून स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावदाणे यांच्याकडून विभागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावदाणे यांच्याकडून विभागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा !

घाटकोपर, (केतन भोज) : शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ माजी नगरसेविका डॉ.भारती सुबोध बावदाने व शिवसेना विधानसभा प्रमुख डॉ.सुबोध बावदाने आयोजित वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांच्या वतीने निळकंठेश्वर मंदिर वर्षानगर आणि उपाध्यय सोसायटी वर्षांनगर, शिवदर्शन सोसायटी, शिवनेरी सोसायटी, शिवाजीनगर याठिकाणी मोफत रक्त तपासणी, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोफत औषध उपचार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उपचाराधिन आढळलेल्या रुग्णांवर मोफत ह्दयरोग व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा विभागातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. यावेळी हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शिवसेना व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कठोर परिश्रम घेतले. तसेच वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांच्याही सर्व वरिष्ठ डॉक्टर व त्यांच्या टिमचे या शिबिराला मोलाचे सहकार्य लाभले असून आयोजक डॉ.भारती बावदाने व सुबोध बावदाने यांनी सर्व डॉक्टर व त्यांच्या टिमचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Saturday, 28 December 2024

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर तर्फे वार्षिक दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन !

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर तर्फे वार्षिक दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
                    समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात.अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ  गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सल्लागार हनुमंता चव्हाण, सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

           पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबूर तर्फ मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सन्मा. श्री.श्रीनिवास मुडगेरीकरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरसीएफच्या वित्त संचालक श्रीमती. नजहत शेख मॅडम तसेच संचालक टेक्निकल सौ. रितू गोस्वामी मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक भोईर, सचिव श्री.प्रदिप गावंड तसेच मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सी.एम.डी साहेबांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सचिन साळुखे, रमेश वामन पाटील, डॉ.रजनीशकुमार, वैभव घरत, प्रकाश शेजवळ, संतोष नाईक, मंदार भोपी, सुशील मिस्त्री, रूपाली नांदिवडेकर, राजश्री कदम सचिन राखाडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती !

कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याची कक्षा महाराष्ट्रभरात व्यापक होत आहे.ही बाब लक्षात घेऊन साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, संशोधक, संघटक, चित्रपट नाट्य समीक्षक, सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १९९८-१९९९ ला मुंबई जिल्हा कार्यवाह  म्हणून योगदान देणाऱ्या शीतल करदेकर यांची नियुक्ती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी करण्यात आली आहे.
             कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय कार्यवाह माधव अकलंगे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.या नियुक्तीबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ.मनोज वराडे तसेच  केंद्रीय कार्याध्यक्ष डाॅ. प्रदीप ढवळ यांनी करदेकर यांचे अभिनंदन केले आहे. तर केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत. या जबाबदारीच्या पदाबद्दल भावना व्यक्त करताना शीतल करदेकर यांनी, मराठी भाषा व साहित्य समृध्दी, सक्षमीकरणासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले.

सायबर गुन्ह्यांविषयी नालासोपारा पोलिसांकडुन जनजागृती मोहिम !

सायबर गुन्ह्यांविषयी नालासोपारा पोलिसांकडुन जनजागृती मोहिम !

*महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या प्रयत्नाचे कौतुक....*

नालासोपारा, प्रतिनिधी :- नालासोपारातील  वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वराज अभियान धनंजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी पदाधिकारी यांच्या समवेत नालासोपारा पश्चिम पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांची भेट घेऊन नागरीकांमध्ये जनजागृती करता लेखी निवेदन दिले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी त्वरीत दखल घेत.
नालासोपारातील सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी नालासोपारात प्रथमच सायबर गुन्हे रोखण्यातबाबत जनजागृती मोहिम हाती घेत संपूर्ण नालासोपारा शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले.

दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्ती व महिला देखील कळत-नकळत बळी पडत आहेत. सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावर उपाय आहे, असे प्रतिपादन रूचिता नाईक यांनी केले व या उपक्रमाचे कौतुक करत नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांचे आभार मानले.

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धाचे आयोजन !


शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धाचे आयोजन !

ठाणे, प्रतिनिधी :  स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धा २०२५ (वर्ष १२ वे) साठी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन.

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा,आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे १२वे वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी 

१)बालव्यंगचित्रकार (वय वर्ष १५ खालील),
२)दिव्यांग स्पर्धकांसाठी विशेष गट
३)हौशी व्यंगचित्रकार - खुला गट (वय वर्ष १६ वरील)
४) स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागासाठी पहिल्या तीन शाळांसाठी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल 

सर्व स्पर्धकांनी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ४२ X ३० सेंमी ) पेपर मध्ये, तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख/वय , स्पर्धक गट, मोबाईल नंबर, आपला पूर्ण पत्ता व बालव्यंगचित्रकारांनी आपल्या शाळेचं नाव लिहून, धर्मवीर आनंद दिघे चौक , मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे दिनांक १६ जानेवारी २०२५ ते दि. २० जानेवारी २०२५ च्या दरम्यान सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत. 

परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आयोजित केले जाणार आहे आणि गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते सायंकाळी ७.०० वाजता ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल. 

टीप : 
१.परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
२. व्यंगचित्राच्या पुढील भागात स्पर्धकाचे नाव लिहिलेली व्यंगचित्र स्पर्धेसाठी पात्र नसतील.
३.राजकीय नेत्यांची किंवा राजकीय किंवा जातीय सलोखा बिघडवणाऱ्या विषयांवरील व्यंगचित्र स्पर्धेसाठी आणि प्रदर्शनासाठी पात्र नसतील
४.एकदा पाठवलेली व्यंगचित्र ही पुन्हा परत मिळणार नाहीत 
५. स्पर्धकांची व्यंगचित्र त्यांनी स्वखर्चाने आणि स्वतःच्या जबाबदारीवर पाठवलेल्या स्पीड पोस्ट अथवा कुरियर मार्फतही दिनांक २० जानेवारी पर्यंतच स्वीकारली जातील, त्यासाठी ९८३३१५८८०० या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.
६. ⁠ही व्यंगचित्रकला स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
७. ⁠स्पर्धेच्या नियमांत आयत्यावेळी बदल करण्याचे सर्व अधिकार हे शिवसेवा मित्र मंडळ. ठाणे पूर्व कडे राखीव असतील.

अधिक माहितीसाठी संपर्क ९२२४१९९९७९/९७६८६८८२९७/९८६९४१३९११/९८३३१५८८००

Friday, 27 December 2024

"चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी (अवली) तोडकरी ह्याचे "बालपण वाचवा मानवता वाचवा" यासाठी विक्रमगड येथे ३ दिवसीय लाक्षणिक उपोषण !!

"चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी (अवली) तोडकरी ह्याचे "बालपण वाचवा मानवता वाचवा" यासाठी विक्रमगड येथे ३ दिवसीय लाक्षणिक उपोषण !!

विक्रमगड, प्रतिनिधी : चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना असून, गेल्या १२ वर्षांपासून बालमजुरी, बालविवाह, बालभिकारी आणि बालशोषण यांसारख्या गंभीर समस्यांवर काम करत आहे. "बालपण वाचवा, मानवता वाचवा" या मोहिमेच्या अंतर्गत संघटनेने विविध जनजागृती उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

२४ ते २६ डिसेंबरदरम्यान विक्रमगड तालुक्यातील महादेव मंदिरासमोर या मोहिमेचे तीन दिवसीय उपोषण पार पडले. हे उपोषण संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी (अवली) तोडकरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. उद्घाटन विक्रमगड उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले, तर समारोप विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आणि कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, अशी माहिती संघटनेच्या राज्यअध्यक्षा नेहा भोसले यांनी दिली.

उपाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती उपक्रम राबवले गेले. विक्रमगडमधील कातकरी पाडा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या समस्यांवर शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून जागृती निर्माण करण्यात आली. कै. उल्हासराव प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसोबत खेळ, गाणी, तसेच "उबंटू" चित्रपट सादर करून त्यांना प्रेरणा दिली. विक्रमगडच्या मुख्य भागात घोषणाबाजीसह रॅली काढून अधिक लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमाला पाठींबा देण्यासाठी छात्रशक्ती संस्थेच्या सचिव स्मिता साळुंखे, मैत्रकुल संचालक आशिष गायकवाड, विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा ऍड. मंजिरी धुरी, पालघरचे कृषी सभापती संदीप पावडे, भाजपचे जव्हार सरचिटणीस सुधाकर गावित, नडगे मॅडम, आणि पोलिस निरीक्षक पारखे सर आदी मान्यवर उपस्थित होते, असे  राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रीय संघटक चेतन कांबळे यांनी चिरंजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि बालमजुरी, बालविवाह, व बालशोषणमुक्त भारतासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. खजिनदार प्रगती कांबळे यांनीही या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी जनतेला उद्देशून सांगितले की, "बालकांचे हक्क व त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे." त्यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला आहे.

नमन लोककला संस्था ( रजि.) आयोजित "जागर नमन लोककलेचा - सन्मान लोक कलावंतांचा" कार्यक्रमात चिपळूण येथे होणार पुरस्काराचे वितरण

काशिनाथ गोरुले, सोमा फडकले, संतोष गुरव, दिनेश साबळे यांना नमन लोककला संस्थेचा "लोककला गौरव पुरस्कार" तर नमनकार सखाराम नेवरेकर यांना "लोककला प्रेरणा पुरस्कार, श्री पाणबुडी देवी कला मंचला "लोककला विशेष गौरव" पुरस्कार  - २०२५" जाहीर !

** नमन लोककला संस्था ( रजि.) आयोजित "जागर नमन लोककलेचा - सन्मान लोक कलावंतांचा" कार्यक्रमात चिपळूण येथे होणार पुरस्काराचे वितरण

मुंबई (शांताराम गुडेकर/दिपक कारकर) :

           नुकतेेच नमन लोककला संस्थेचे २०२४-२५ चे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये गाव निगुडवाडी, ता.संगमेश्वर येथील प्रसिद्ध ढोलकीपटू श्री.काशिनाथ लक्ष्मण गोरुले यांना "लोककला गौरव पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.
            याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील श्री.सोमा फडकले यांनाही "लोककला गौरव पुरस्कार" तसेच ओझरे-देवरुख येथील श्री.संतोष गणपत गुरव व मुरादपुर-देवरुख येथील श्री.दिनेश साबळे यांना "लोककला प्रेरणा पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील या चार जणांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील नमन कलावंतांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडीचे सुपुत्र नमनकार सखाराम लक्ष्मण नेवरेकर यांना "लोककला प्रेरणा पुरस्कार - २०२५" जाहीर झाल्यामुळे कातळवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा झळकला आहे. याशिवाय मुंबईसह ठाणे, पूर्व -पश्चिम उपनगरमध्ये अनेक नाट्यगृहमध्ये कोकणातील लोककला नमन, शक्ती -तुरा प्रयोग हाऊस फुल्ल करणारे श्री पाणबुडी देवी कला मंचला लोककला विशेष गौरव पुरस्कार  - २०२५" जाहीर झाला आहे.
           लोककला गौरव पुरस्कार १० जण, लोककला प्रेरणा पुरस्कार १२ जण, तर लोककला विशेष पुरस्कार ३ दिले जाणार आहेत. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रविवार दि.५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. हे पुरस्कार मान्यवरांकडून दिले जातील. कार्यक्रमास सर्वश्री ऊदय सामंत- (ऊद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य,) आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, विनय नातू, रमेश कदम, सदानंद चव्हाण, प्रशांत यादव, प्रमोद गांधी, चंद्रकांत भोजने, दिनेश कुरतडकर, ॠषिनाथ पत्याने, शरद बोबले, अभय सहस्त्रुद्धे, दत्ताराम आयरे, प्रसिद्ध अभिनेता ओंकार भोजने इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत. यावेळी करमणुकीचा कार्यक्रम- केदारलिंग नाट्य नमन मंडळ, काटवली, देवरुख यांचे "नमनचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यासाठी नमन कलाकार, रसिक, नागरिक, मित्रपरिवार सर्वांनी ऊपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.रवींद्र मटकर यांनी केले आहे.

Thursday, 26 December 2024

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा धनादेश सुपूर्द

 
मुंबई, (केतन भोज) : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना ठाणे येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी काही दिवसांपूर्वी ऍडमिट करण्यात आले होते. हि माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ.खासदार श्रीकांत शिंदे यांना समजताच त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात विनोद कांबळी यांची भेट घेऊन डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांची मदत जाहीर केल्याचे सांगितले होते.संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ ४८ तासात संपूर्ण मदत विनोद कांबळी यांना दिली आहे. संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि डॉ.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे येथील आकृती हॉस्पिटल मध्ये डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून विनोद कांबळी यांना ५ लाखांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष विलास जोशी, फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप धवल आणि फाउंडेशनचे विश्वस्त जे.बी.भोर यांच्या हस्ते आणि हॉस्पिटलचे संचालक यांच्या उपस्थिती धनादेश विनोद कांबळी यांना देण्यात आला.यावेळी फाउंडेशनकडून कांबळी यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी करण्यात आली. सोबतच कांबळी यांच्या उपचारात कुठलीही कमी भासू नये अशी विनंती करण्यात आली आहे. रुग्णालयात भरती असलेले विनोद कांबळी यांनी भावुक होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ.खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहे. यावेळी रुग्णालायत डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष विलास जोशी, विश्वस्त प्रदीप धवल, विश्वस्त जे.बी.भोर, आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश सिंग (ठाकूर), रुग्णलयाचे डॉक्टर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक उपस्थित होते.

Wednesday, 25 December 2024

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

घाटकोपर, (केतन भोज) : शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ माजी नगरसेविका डॉ.भारती सुबोध बावदाने व शिवसेना विधानसभा प्रमुख डॉ.सुबोध बावदाने आयोजित वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांच्या वतीने निळकंठेश्वर मंदिर वर्षानगर आणि उपाध्यय सोसायटी वर्षांनगर याठिकाणी मोफत रक्त तपासणी, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोफत औषध उपचार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उपचाराधिन आढळलेल्या रुग्णांवर मोफत ह्दयरोग व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा विभागातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. यावेळी हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शिवसेना व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कठोर परिश्रम घेतले. तसेच वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांच्याही सर्व वरिष्ठ डॉक्टर व त्यांच्या टिमचे या शिबिराला मोलाचे सहकार्य लाभले असून आयोजक डॉ.भारती बावदाने व सुबोध बावदाने यांनी सर्व डॉक्टर व त्यांच्या टिमचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

ग्रंथालीच्या अक्षररांगोळी स्पर्धेत कु.कृतिका तांडेल प्रथम !!

ग्रंथालीच्या अक्षररांगोळी स्पर्धेत कु.कृतिका तांडेल प्रथम !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण - 

ग्रंथाली प्रकाशनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई ,ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी अक्षररांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. अनेक नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचे परीक्षक ख्यातनाम चित्रकार आणि लेखक विजयराज बोधनकर यांनी केले . या नावीन्यपूर्ण स्पर्धेत विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील कु. कृतिका तांडेल हिने प्रथम क्रमांक मिळविला. ह्या विद्यार्थिनीला प्रा. डॉ. महादेव दिनकर इरकर यांनी मार्गदर्शन केले होते. 

या विद्यार्थिनीचे संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर, सर्व पदाधिकारी, प्राचार्या मुग्धा लेले, उपप्राचार्या चित्रा ठाकूर, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे आणि उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या या अप्रतिम कलेचे आणि मिळालेल्या यशाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी धावून आले संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन !!

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी धावून आले संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन !!

विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लक्ष रुपयांची मदत जाहीर !

मुंबई, (केतन भोज) : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली.
      क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले. 
       राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संवेदनशील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.

निधन वृत्त - शेवंती महादेव कोलगे यांचे निधन

निधन वृत्त 
------------------

शेवंती  महादेव कोलगे यांचे निधन 

मुंबई -
              रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.कासारकोळवण  गावातील श्री कांडकरी विकास मंडळ ( मावळती वाडी ) चे सभासद श्री.विनोद महादेव कोलगे व श्री.राजाराम महादेव कोलगे यांच्या मातोश्री शेवंती महादेव कोलगे यांचे आज(२५ डिसेंबर २०२४) सकाळी ठिक ११.०० वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कुटूंबियांना दुःख पचविण्याची ताकत मिळो असे मत व्यक्त करत मु.पो.कासारकोळवण  गावातील श्री कांडकरी विकास मंडळ ( मावळती वाडी ) चे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद तसेच मुंबई मधील संघर्ष विकास समिती व कासार कोळवण गावचे अनेक रहिवाशी यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले.

आंगवली (लाखणवाडी)ची सुकन्या कु.आश्लेषा रमेश गुडेकर राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य पदकाची मानकरी !

आंगवली (लाखणवाडी)ची सुकन्या कु.आश्लेषा रमेश गुडेकर राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य पदकाची मानकरी !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.आंगवली (लाखणवाडी) येथील सुपुत्र सध्या मुंबई पूर्व उपनगर मधील भांडुप येथे राहत असलेल्या श्री.रमेश श्रीपत गुडेकर, सौ.रेश्मी र. गुडेकर यांची सुकन्या कुमारी असलेश्या रमेश गुडेकर हिने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत यश प्राप्त करून १ सुवर्ण आणि २ रौप्य अशा ३ पदकांसह सर्व स्पर्धकांमध्ये  रौप्य पदक प्राप्त केले आहे. अश्लेषाशी संपर्क साधला असता, माझे आईवडील आणि भाऊ यांचे पाठबळ, तिचे कोच निलेश गराटे सर, सोनाली नि. गराटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आणि माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली. त्यांच्यामुळेच हे यश संपादन करता आले. पुढे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन असेच यश संपादन करणार असा विश्वास तीने यानिमित्ताने व्यक्त केला. तीन महिने पूर्वी तीने वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटलीपटिंग स्पर्धामध्ये आपल्या कमी वयात मनाचा तुरा रोवून बेंच प्रेस मध्ये ब्रॉन्झ पदक पटकवात आंगवली गावचे नाव रोशन केले. यापूर्वी तीने डेडलीफ्ट मध्ये  गोल्ड, इन्टेरेस्टटे सिल्वर, ऑलव्हर ब्रॉन्झ, पार्टीसिपशन मेडल असे पाच पदके जिंकली आहेत.
          "फेडरेशन कप नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४" ही स्पर्धा पॉवरलिफ्टींग इंडिया असोसिएशनच्या वतीने दिल्ली येथे दि. १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी तिला स्पर्धेच्या ठिकाणी "रौप्य पदक" देवून इतर स्पर्धकांसह गौरविण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ती सहभागी झाली होती. या स्पर्धेत गुणवत्ता सिद्ध करताना अश्लेषाने सर्व स्पर्धकांमधून  दुसऱ्या क्रमांकाचे रौप्य पदक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा राष्ट्रीय स्थरावर प्रावीण्य  मिळविलेल्या खेळाडूंमध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे चांगले यश संपादन केल्याने तिच्यावर आंगवली (लाखणवाडी) येथील चैतन्य युवा मंडळ आंगवली लाखणवाडी या मंडळाचे सदस्य रमेश गुडेकर आणि परिवार तसेच आश्लेषा हिचे कौतुक होत असून अनेकांनी तिला अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत. तीचे प्राथमिक शिक्षण सुभाष बने यांच्या पराग विद्यालय मध्ये झाले असून ती  मुंबई मधील रुईया कॉलेजमधून पदवीधर (बी.एम.एम) झाली आहे. आत्तापर्यंत तिला गोल्ड -२७, सिल्व्हर -९, ब्राँझ-२ अशी एकूण -३८ पदके मिळालेली आहेत. यामध्ये ज्युनिअर ग्रुपमधून गोल्ड,सिल्व्हर, ब्राँझ चा समावेश आहे. नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट लेवलला ती खेळली आहे. तर सिनियर ग्रुप मधून (जुलै२०२४) पासून स्टेट लेव्हल- १ गोल्ड मेडल, नॅशनल लेव्हल ब्राँझ मेडल ची मानकरी आहे.
          भावी आयुष्यात तिने तुकाराम मुंडे यांच्यासारखे निर्भीड, एक स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी बनण्याचा तिचा मानस आहे. तो लवकरच पूर्णही होईल यात शंका नाही. कारण तिने गेल्या चार -पाच वर्षात एक डझन पेक्षा जास्त पदक या स्पर्धामध्ये मिळवली आहेत. तिचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे मत यानिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखन यांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, विद्यमान आमदार शेखर निकम, वशिस्ट मिल्क अध्यक्ष प्रशांत यादव, स्मिता लाड, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद संतोष थेराडे, उद्धव ठाकरे गट यांचे संगमेश्वर तालुका प्रमुख बंडया बोरुकर, जिल्हा प्रमुख विलास चाळके, महिला जिल्हा प्रमुख वेदा ताई फडके, माजी जिल्हा परिषद सदस्य मुग्धा ताई जागुष्टे, सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी सभापती संतोष डावल, माजी सभापती मधुकर गुरव, संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी आश्लेषा रमेश गुडेकर हिला पुढील आयुष्यासाठी चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सचिन तेंडुलकर, सानिया नेहवाल, आकांक्षा कदम यांच्या सारखे उत्कृष्ट खेळाडू बनवून तिने आपल्या गावाचे, वाडीचे, मंडळाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छा देत अभिनंदन केले.
               आपल्या कमी वयात यश संपादन केल्यान तिच्यावर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, मंडळ, समाज शाखा यांच्यातर्फे अभिनंदन केले जात आहे. सचिन तेंडुलकर, सानिया नेहवाल, आकांशा कदम यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन उत्तम खेळाडू तर तुकाराम मुंडे यांच्यासारखा निर्भीड अधिकारी यांचा आदर्श ठेवून तिने उंच भरारी घेण्याचे तिचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तिला एक आय.पी.एस अधिकारी बनायचे तिचे स्वप्न आहे. तिचे ते स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे या साठी लागेल ती मदत तिला करणासाठी आंगवली (लाखणवाडी)चे निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी सांगितले आहे. तिच्या या यशा मागे तिचे कोच निलेश गराटे, सोनाली गराटे यांनी तिला चांगले मार्गदर्शन केल्यामुळे त्याचबरोबर तिचे आई -वडील यांनी वेळो वेळो चांगले सहकार्य केल्यामुळे तिने एक डझन पेक्षा जास्त पदक  मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तिला कोणत्याही क्रीडा क्षेत्रात जी काही मदत लागेल ती मदत करू असे शशांक घडशी, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी सांगितले. लवकरच तिचा चैतन्य युवा मंडळ यांच्यावतीने सत्कार मु. पो.आंगवली (लाखणवाडी) येथे केला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप लाखन यांनी सांगितले. तिच्या या यशा मागे तिचे वडील -आई भाऊ, क्रीडा कोच निलेश गराटे, सोनाली गराटे यांची विशेष मेहनत आहे. त्याचबरोबर मंडळातील सर्व सदस्य यांचे बहुमूल्य मार्गदर्शन असल्याने तिने हे यश संपादन केले आहे असे आश्लेषा रमेश गुडेकर हिने बोलताना सांगितले. तिने आपल्या आई- वडील यांच्या बरोबर आंगवली गावाचे, लाखणवाडीचे त्याच बरोबर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुकाचे नाव जगाच्या नकाशा वर नेऊन ठेवत उंच भरारी घेतली आहे.

Monday, 23 December 2024

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे 

डोंबिवली, प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली परिसरात इमारतीत खेळणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलीशी इमारतीत राहणाऱ्या पांडे नावाच्या इसमाने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बोलताना आमदार राजेश मोरे यांनी या प्रकरणाची सखल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई  करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत 

आडीवली परिसरात एका इमारतीत रात्रीच्या सुमारास खेळत असलेल्या 9 वर्षांच्या मुलीला घरात ओढून घेत तिच्याशी लगट करणाऱ्या पांडे  याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या  या चिमुरडीच्या आई वडील आणि आजीला पांडे दांपत्याने शिवीगाळ धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला होता याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली आहे याबाबतच्या सूचना मानपाडा पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाव्दारे नागरिकांच्या समस्यांना तात्काळ मार्गदर्शन आणि प्रतिसाद !!

आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाव्दारे नागरिकांच्या समस्यांना तात्काळ मार्गदर्शन आणि प्रतिसाद !!

डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या "आमदार आपल्या भेटीला" या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली शहर शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवार, दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी, दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम डोंबिवली शहरातील मानपाडा पथावरील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत पार पडला.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार श्री. राजेश गोवर्धन मोरे यांना भेटण्यासाठी १०० हून अधिक नागरिकांनी खाजगी तसेच सामाजिक समस्या मांडल्या. यावेळी डोंबिवली शहर, नेतीवली विभाग, एमआयडीसी विभाग, दिवा शहर, १४ गाव, २७ गाव, शिळफाटा विभाग या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सदर कार्यक्रमांमध्ये आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक समस्यांमध्ये बससेवा, रखडलेली शासकीय कामे, आर्थिक मदत, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक समस्या, आणि नोकरीसंबंधी प्रश्न मांडले तर खाजगी समस्यांमध्ये आर्थिक फसवणूक, शिफारसपत्र, शासकीय योजनांचा लाभ मिळवणे यांसारख्या प्रश्नांवर चर्चा झाली.

यावेळी नागरिकांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देत आमदार श्री. राजेश मोरे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अनेक समस्यांचे निराकरण केले. पोलीस विभाग, तहसील कार्यालय, महानगरपालिका, रेशनिंग कार्यालय, शैक्षणिक विभाग यांसह विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधून नागरिकांच्या कामांना गती दिली.

या कार्यक्रमाला शिवसेना, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक/नगरसेविका, बंधू भगिनी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. नवनियुक्त आमदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली.
पहिल्याच कार्यक्रमात अनेक प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेने व संवेदनशीलतेने उपस्थित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

"आमदार आपल्या भेटीला" या कार्यक्रमामुळे नागरिकांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून, आमदार श्री. राजेश मोरे यांचे कार्यक्षेत्रात सकारात्मक योगदान दिसून येत आहे.

सौजन्य - शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखा.

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी !!

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी !!

** ३६ शांळाच्या सहभागातून आर्याचे नेत्रदीपक यश

मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक कारकर) :

           भूतलावर प्रत्येक व्यक्तीच्या अंगीकृत कलागुणांना व्यासपीठ मिळालं की, असंख्य सितारे जगासमोर येतात अशी अनेक उदाहरणे नेहमीच प्रत्येयाला येत असतात.राजीव गांधी विद्यालय,नालासोपारा ( प. ) येथे नुकत्याच पार पडलेल्या उडान फेस्टिव्हल मध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण ३६ शाळांनी सहभाग घेतला होता.या मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. गायन स्पर्धेत आर्या रामचंद्र गांगरकर ( इ.सहावी ) हिने वैयक्तिक तसेच समूह गायन अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
          संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर ही अभ्यासात अत्यंत हुशार असून शाळेय विविध उपक्रमांत ती कायम सहभागी होत असते.आर्या गांगरकर श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) ह्या मंडळाचे खजिनदार रविंद्र गांगरकर यांची ती भाची आहे. आर्याने गायलेलं गीत अगदी मोहून टाकणारे आहे. संगीत विभागाच्या शिक्षिका तृप्ती तांबे यांचे तिला अनमोल मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते उदय नेने,अभिनेत्री गायिका सायली गावंड तसेच हास्यजत्रा फेम निमिष कुळकर्णी युवा नेते सिध्दार्थ ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आर्याच्या यशाचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे 

वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्यानंतर) समाजकार्याच्या तळमळीमुळे मी अवयव दानाचे क्षेत्र हे स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
अवयवदानाच्या क्षेत्रात कार्य करायचे ठरवल्यानंतर मी माझ्यापरीने अभ्यास करून व्याख्याने व स्थानिक कार्यक्रम यामधून लोकांपुढे जाऊन हा नवीन विषय त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु नंतर लक्षात आले की या बाबतीत जनजागृती करायची असेल तर स्थानिक स्तरावरील तोटके प्रयत्न उपयोगाचे नाहीत. या विषयाला मोठ्या जनजागृतीची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे पदयात्रा या संकल्पनेचा उगम माझ्या मनात झाला. त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेत सहभागी होऊन या आमच्या संस्थेमार्फत आजपर्यंत एकूण चार पदयात्रा यशस्वी रीत्या पूर्ण केल्या. माझ्या वयाच्या ६६ व्या वर्षापासून ७० वर्षापर्यंत या चार पदयात्रां मधून जवळपास ४००० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन, एकूण पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवू शकलो. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे पायाखालून घातले. या सर्वांचा अनुभव मिश्र स्वरूपाचा असला तरी एकूण अनुभव उत्साहजनक होता हे नक्की.  त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे काही करू शकलो याचं समाधान आहेच. पण आता सत्तरी पार केली आहे. हळू हळू डोळे आणि कान सहकार्य करण्यासाठी कुरकुरत आहेत. प्रकृती चांगली असली तरी पदयात्रेचा मार्ग कितपत चालू ठेवता येईल याबाबत साशंक आहे. तरीही कार्य चालूच राहील. राहणार आहे आणि राहिले पाहिजे. पण हे प्रयत्न खूपच तोटके आहेत आणि अत्यंत तुटपुंजे आहेत याची नम्र जाणीव मला या पदयात्रांनी नक्कीच करून दिली आहे. 

अवयवदान प्रबोधनाच्या कार्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत. आता याचसाठी कार्य करायचे आहे. त्यासाठी या विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या विषयाचे प्रबोधक व कार्यकर्ते निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध स्थानिक स्तरावरील संस्थांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संख्या आणि ज्ञान याची वृद्धी करणे आवश्यक आहे. आम्ही फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे  व केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील रोटो-सोटो च्या सहकार्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम व या विषयावरील प्रबोधनपर साहित्य प्रकाशित करणे असे उपक्रम आयोजित करीत आहोत. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रारूप तयार केले गेले आहे. 

आता याच कार्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे.  वास्तविक पाहता   कोरोनाच्या प्रकोपामुळे व परिस्थितीमुळे एक धडा सर्वांनी शिकणे आवश्यक आहे. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सरकार, सर्व सरकारी यंत्रणा, सर्व मोठे उद्योग व्यवसाय, सर्व स्वयंसेवी संस्था, सर्व प्रसार माध्यमे आणि सर्व सोशल मीडिया या सर्वांमार्फत कोरोना, कोरोना आणि फक्त कोरोना, हाच विषय आणि त्याबाबतची माहिती आणि जागृती याचे सतत प्रयत्न सतत दोन वर्षे चालू आहेत. त्याच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी सर्व कायदा आणि सुव्यवस्था  यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा कार्यरत होत्या आणि तेही 24 तास.  पण एवढे असूनही असे दिसून येते की लोकांमध्ये जागृती समाधानकारक होत नाही. 

आपण बातम्यांमध्ये रोज पाहतच होतो की एवढी प्रचंड जागृती मोहीम चालू असून सुद्धा स्वतःला सुशिक्षित (?) म्हणवणारे परंतु खरे सुशिक्षण नसलेले फक्त विद्याविभूषित असे पांढरपेशे व मध्यमवर्गीय हे सुद्धा या सर्व जागृती मोहिमेपासून फारसा चांगला धडा शिकताना दिसत नव्हते. मग अशिक्षित व हातावरचे पोट असणारे यांची काय स्थिती असेल ही कल्पनाच करावी. त्याचप्रमाणे सांपत्तिक उच्च स्थितीमध्ये असणारे किंवा राजकारणी आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर,  नगराध्यक्ष अशांसारख्या काही व्यक्तीसुद्धा स्वतःच्या संबंधित अथवा वैयक्तिक समारंभाचे आयोजन व नियोजन करताना आणि त्यात सहभाग घेताना दिसत. अशा वेळेला सरकारी यंत्रणांचीही पंचाईत होते. त्यांना यावर काय कारवाई करावी हेच समजेनासे होते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची बिकट अवस्था होऊन जाते. यावरून समाजाला जागृत करणे हे किती प्रचंड अवघड आहे हे लक्षात येते. पदयात्रेच्या निमित्ताने बऱ्याच वेळा हे लक्षात आले आहे की महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा बर्‍यापैकी जागृती होऊ शकेल असे दिसते आहे. त्यामुळे एकंदरीत अवयवदानाच्या विषयासंबंधी जनजागृति व्हावयाची असेल तर किमान दोन-तीन पिढ्यांमध्ये तरी सातत्याने हे कार्य चालू असले पाहिजे. जेव्हा तरुण या कार्यात कार्यरत असताना, सामील होताना दिसतात तेव्हा पुढील पिढीत काहीतरी आशादायी घडेल अशा समजुतीला बळ मिळते. म्हणूनच तरुण आणि विद्यार्थी वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे उपयोगी ठरेल. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे तरी निश्चित या विषयाचा अभ्यास करतातच. बऱ्याच वेळेला मी असे पाहिले आहे की शालेय विद्यार्थी जेंव्हा स्पर्धेमध्ये भाग घेत असतात तेव्हा त्या विषयाच्या अभ्यासामध्ये त्यांचे आई वडील सुद्धा सामील झालेले असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमधून संपूर्ण कुटुंब या विषयाच्या अभ्यासाकडे वळवता येईल. 
तरुणांना या विषयाच्या अभ्यासाकडे वळवण्यासाठी या विषयासंबंधीच्या स्पर्धा काही संस्थांनी आयोजित केल्या होत्या. त्या मधूनही आजचे तरुण या स्पर्धेच्या निमित्ताने या विषयाचा अभ्यास करून त्याचे चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकतात हे लक्षात येते.

आजकालच्या तरुणांना या विषयाचे योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रकारे समाजामध्ये या विषयाचे प्रबोधन करता येऊ शकेल याबाबत शंका नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्ते तयार करणे हे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे. या गरजेपोटी फेडरेशनचे पुढचे पाऊल हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या जागृतीचे असल्यास अवयवदानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागृती घडवून आणता येईल असा विश्र्वास वाटतो.

जनजागृती ज्या समाजपरिवर्तनासाठी करावयाची आहे त्याची दिशा काय असली पाहिजे हे प्रथम ठरवायचे आहे. तरुणांच्या डोळ्यात असलेली भविष्याची स्वप्ने जाणून घ्यायची आहेत. ती स्वप्नं साकार करण्यासाठी त्यांच्या हातांना श्रममूल्यांची जाणीव करून देऊन त्याची जपणूक केली पाहिजे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्यांच्या मनात कार्याचं पाखरू हळू हळू फडफडवलं पाहिजे. आकाशी भरारी मारणाऱ्या त्यांच्या मनाबरोबर त्यांच्या पायांना जमिनीशी असलेलं नातं घट्ट __ 

करायला शिकवलं पाहिजे. 
जमिनीवर रोवून पाय 
आभाळ धरता आलं पाहिजे 
उंच होता आलं पाहिजे 
आभाळ खाली आणलं पाहिजे 
मनात जिद्द धरली पाहिजे

__ कोणत्याही कार्यासाठी ही जिद्द निर्माण व्हायला हवी.  त्या जिद्दीसाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण केली पाहिजे.  या जाणिवेतूनच समाजासाठी कार्य करणारी मने तयार होतील. त्यांचे कडूनच परिवर्तनाला दिशा मिळेल. परिवर्तनाची ही दिशा देण्यासाठी मग इतर समाज घटकांनीही आपापले योगदान देणे आवश्यक आहे. 

ज्यांच्याकडे वय नाही पण वेळ आहे, संचार नाही पण विचार आहे, कष्ट होत नाहीत पण दृष्टी आहे. आचारांची तळमळ आहे,  कार्याची कळकळ आहे आणि दुसऱ्याला समजून घेऊन विचार मांडता येतील अशा कार्याची जळजळ मनामध्ये धगधगत आहे असे ज्येष्ठ शोधले पाहिजेत. तरूणांचं भले बापाशी पटत नसेल पण आजोबांशी गट्टी जमते. असे तरुणांशी गट्टी जमवणारे आजोबा शोधले पाहिजेत. त्यांना कार्यरत केलं पाहिजे. कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे परंतु दिशा निश्र्चित असेल व योग्य साथ असेल तर व्याप्ती वाढवता येते. भरकटलेल्या दिशांना योग्य मार्ग मिळू शकत नाही आणि म्हणूनच निश्‍चित दिशा ठरवून पावले टाकल्यास समाजपरिवर्तन हळूहळू का होईना पण नक्की होऊ शकते.  हा मोठ मोठ्या समाजसुधारकांनी  दिलेला मंत्र आहे. त्यांच्या चरित्रां मधून आणि कृती मधून त्यांनी समाजाला हा मंत्र दिला आहे. पण तो मंत्र समजून घेण्याची पात्रता आणि इच्छा किती जणांच्यात असते हाच तोप्रश्न आहे.  स्वत:चं जीवन जगून झाल्यानंतर तरी, स्वार्थापलिकडे जाऊन विचार करण्याची तयारी किती जणांमध्ये असते ? समाज परिवर्तनाची  क्रिया सातत्याने चालू राहणे आवश्यक असते. पिढ्यानपिढ्या मधून ती झिरपत जाणे आवश्यक असते आणि मग अनेक पिढयांनंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा निश्चितच या परिवर्तनाचा अभिमान वाटू शकतो. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या कार्याला त्यांच्या तिस-या पिढीने कुठल्या कुठे नेऊन ठेवले आहे हे पाहिलं की या विधानाचा प्रत्यय येतो. आजच्या पिढीला दाखवण्यासारखं हे जिवंत उदाहरण अभिमानास्पद ठरतं. अवयवदानाच्या क्षेत्रात आपल्यालाही पिढ्यानपिढ्या चालू राहील असे कार्य उभे करायचे आहे. तरूणांना घडवण्यासाठी ज्येष्ठांची फळी उभी करायची आहे. असे अनेक प्रश्न उभे राहतील.  यापूर्वी आपण विचार केला होता तो असा की …. कॉलेज तरुण, शालेय विद्यार्थी यांच्या स्पर्धा आयोजित करणे. 

हा जसा एक भाग असावा,  त्याचप्रमाणे या विषयासंबंधी ज्येष्ठ नागरिक संघ आणि वृद्धाश्रम या ठिकाणी जर स्पर्धा आयोजित केल्या आणि चांगल्यापैकी बक्षीस ठेवलं, तर या विषयांमध्ये रस असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक शोधणं तसं फार अवघड होणार नाही. अनेक ज्येष्ठ खरं म्हणजे साठी ओलांडली म्हणून निष्क्रिय होत नाहीत. निरुपयोगी तर अजिबातच नाही, कधीच नाही. परंतु कार्याची दिशा न मिळाल्याने भरकटलेले,  आयुष्यात खूप काही केलं आता विश्रांती घ्यावी असे म्हणणारे आणि काही दिवसांनंतर त्या विश्रांतीचा कंटाळाही आलेले असे असणारच. पण समाज ज्येष्ठ नागरिक संघ आणि विशेषतः वृद्धाश्रम या निष्क्रिय लोकांच्या जागा असे समजतो. त्यांना सक्रिय करण्याचा कुणी प्रयत्नच करीत नाही. अर्थात स्वतःहून सक्रीय होणारे सन्माननीय अपवाद सोडून. या सर्व मंडळींना विविध विषयात रस असतोच. कुणी कवी असतात, कुणी विचारवंत असतात, कुणी कलावंत असतात, कुणी अभिनेते असतात. यातील काहीजणांना आयुष्यात पोटामागे धावताना आपल्या कलांना विकसित करण्याची संधी मिळालेली नसते. अशांना अशा काही संधी उपलब्ध करून दिल्या तर त्यांना ते आवडेलही. त्यांना शोधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ व वृद्धाश्रम यांच्या मधून अशा स्पर्धांच्या माध्यमातून अशा व्यक्तींपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. त्यातून तरूण पिढीला घडवणारे मार्गदर्शक कार्यकर्ते, वक्ते, कलावंत, विचारवंत हे आपल्या कार्याशी जोडून घेता येणे शक्य आहे. असा प्रयत्न का करू नये ? खरं म्हणजे वृद्धाश्रमांकडे लोक अति भावनिक दृष्टिकोनातून बघतात. काहीजण तर अडगळीची माणसे टाकण्याची जागा अशा भावनेतून त्याकडे बघतात. मी तर म्हणतो वृद्धाश्रमांमध्ये राहणं चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही. खरं म्हणजे तेच जास्त सोयीचं आणि ज्येष्ठांच्या दृष्टीने उपकारक. तसेच उपक्रम कारकही आहे. ज्येष्ठांना एकमेकांच्या संगतीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमातून चांगल्या पद्धतीने सहजीवन करता येईल. मुलांच्या घरात अडगळ म्हणून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमांमध्ये आनंदी जीवन जगणे हे केव्हाही चांगले. ज्या घरांमध्ये मुलांना अडगळ होत नसेल परंतु तेथे निष्क्रिय पणे बसून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमांमध्ये समवयस्कांच्या संगतीत आनंदात दिवस काढणे आणि सक्रीय रहाणे व अधून मधून मुलांच्या संसाराची खबरबात घेण्यासाठी त्यांचेकडे जाऊन येणे हे सगळ्यात सुखाचे आणि आनंदाचे आहे असे मला वाटते. आम्ही सुद्धा आता आमच्या फ्लॅटमध्ये दोघेच रहातो. पण आमच्याकडे सामाजिक उपक्रम आहेत. त्यामुळे आम्ही सक्रिय आहोतच. परंतु आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही वृद्धाश्रमा प्रमाणेच राहतो. व्यवसाय व इतर उपक्रम नसते तर मग वृद्धाश्रमांमध्ये रहाता आलं असतं तर तेच जास्त सुखावह वाटलं असतं. आत्तापर्यंत केलेल्या पदयात्रां मुळे सामाजिक उपक्रमांसाठी जे काही मिळवलं तो भाग सोडला तरी, वैयक्तिक आयुष्यामध्ये बरंच काही शिकता आलं. पहिलं म्हणजे आपल्या गरजा आपण कमीत कमी ठेवू शकलो तर आपण जास्तीत जास्त उपक्रमशील राहू शकतो. दुसरी गोष्ट, आयुष्यात तडजोड केल्यास जे चांगले क्षण अनुभवता येऊ शकतात ते अडून राहण्यात किंवा अनावश्यक मतांमध्ये ठाम राहण्यामध्ये मिळू शकत नाहीत. सामाजिक उपक्रमांमधून आपण समाजाच्या काही उपयोगी पडू शकतो या भावनेतून जे मानसिक समाधान मिळतं त्यामुळे शारीरिक आरोग्यही  चांगलं राहू शकतं. या पदयात्रेमध्ये खरोखरच आश्चर्य करण्यासारखं घडलं.  पदयात्रेच्या आदल्या दिवशीपर्यंत मी सर्दी खोकल्याने बेजार होतो.  घरचे काळजीतच होते. परंतु पदयात्रेच्या सुरुवातीपासून पदयात्रा संपेपर्यंत किंबहुना परत येईपर्यंत एकदासुद्धा खोकला आला नाही. सर्दीने त्रास दिला नाही. पण परत आल्यानंतर पुन्हा थोडासा सर्दी-खोकला सुरू झाला आणि त्यात कोरोनाच्या बातम्या सुरु झाल्या त्यामुळे फारसा कुठे बाहेर पडलो नाही. आणि त्यानंतर लॉकडाऊन मध्येच अडकून पडलो. त्यामुळे पदयात्रा झाल्यानंतर कुठल्या कार्यक्रमाला जाणे नाही कुणाला भेटणे नाही. म्हणजेच आपण जर खरोखरच ध्येयवादी कामाने पछाडलेले असू तर शरीरही त्याला साथ देते. म्हणून उतारवयामध्ये सतत कार्यरत असावं, कार्याने पछाडलं गेल्यास उत्तमच. गरजा कमीतकमी ठेवाव्यात परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेता आलं पाहिजे.  हे सर्व धडे नुसते शिकलो नाही तर आयुष्यात अंगीकारायला ही शिकलो. हा पदयात्रेने मला वैयक्तिक झालेला सगळ्यात मोठा फायदा आहे. ज्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात त्या करण्यात आनंद असतो. करण्यापासून त्रास आणि श्रम वाटत नाहीत आणि शरीरही साथ देतं. हा धडा जर प्रत्येकाला समजावून सांगून लागू करायचं ठरवलं तर, ज्येष्ठांकडून खूप मोठं समाजकार्य होऊ शकेल. त्यासाठी विविध उपक्रमांमधून सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. करूया काही प्रयत्न, करून बघूया.  

बघूया ना ?  देणार साथ ?

कृपया सहकार्य करा. आवाज द्या श्रोती जमा करा,  आम्ही आपल्याकडे येऊ.  

संपर्क करा. फोन करण्यापेक्षा व्हाट्सअप मेसेज करा अथवा ई मेल करा. आपले नाव पत्ता कळवा मी आपल्याशी संपर्क करेन. 

सुनील देशपांडे 
उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.
फोन :९६५७७०९६४०
इ मेल. : - organdonationfed@gmail.com

Sunday, 22 December 2024

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :
        आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वं. यंशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या पावन भूमीत दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी आणि सत्कारमुर्ती म्हणून डाँ.निळकंठ धारेश्वर महाराज तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्याहस्ते पत्रकार भीमराव धुळप यांना सन्मानित करण्यात आले. धुळप यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्याची स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट परिवाराने दखल घेऊन निवड केली होती.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डाँ.संदिप डाकवे, पत्रकार, कवी गजानन तुपे, पार्श्वगायिका कविता राम, निर्माते विठ्ठल डाकवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
        भीमराव धुळप यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून ते धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक तसेच डीडी न्यूज चे संपादक आहेत. गेली अनेक वर्ष ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना ते वैद्यकीय मदत मिळवून देत असतात त्याचबरोबर दिव्यांग बाधव, वृद्धाश्रम अनाथ आश्रम या ठिकाणी देखील त्यांचे विविध उपक्रम ते राबवत असतात आतापर्यंत त्यांना 21 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याच कार्याची दखल घेऊन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप टाकवे यांनी त्यांना राज्यस्तरीय फ्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 
       पुरस्कार मिळाल्यानंतर श्री धुळप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो आणि ते देत असताना आपलं कार्य करताना इतरांनाही आपल्या हातून काहीतरी मिळावं या उद्देशाने हे सामाजिक व शैक्षणिक कार्य माझ्या हातून घडते. परमेश्वराने मला कोणतेच व्यसन लावले नाही. आणि म्हणून जर मी व्यसन करत असतो तर त्यासाठी माझा किती खर्च झाला असता. याचा विचार करून तो खर्च मी सामाजिक कार्यासाठी विविध उपक्रम राबवत करत असतो.
       डाँ.संदिप डाकवे यांच्या स्पंदन चँरीटेबल ट्रस्टने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे.या पुरस्कार माझ्या भूमीत कराड शहरात मिळाला यांचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा पुरस्कार माझी आई कै.बाळकाबाई धुळप हिच्या चरणी अर्पण करतो असे पत्रकार भीमराव धुळप यांनी बोलताना सांगितले. धुळप यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल धारावीसह मुंबई, मुंबईपूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि कराड, कोकण मधील अनेक मंडळ, संस्था, समाज मंडळ आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, धगधगती मुंबई वृत्तपत्र, डीडी न्यूज मधील प्रतिनिधी आणि कर्मचारी यांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

२५ व्या वर्धापनदिनानिमित्त कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

२५ व्या वर्धापनदिनानिमित्त कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे शाखेच्या २५ व्या  वर्धापनदिनानिमित्त भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ चे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन विक्रोळी पार्क साईट शिवाजी मैदान, विक्रोळी (प.) मुंबई -७९ येथे रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३-३० ते ९ या वेळेत करण्यात आले आहे. सुरुवातीला दुपारी ३-३० वा.राम नगर शिवसेना शाखा क्रमांक १२७ येथून मिरवणूक सुरु होणार असून ती अमृत नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण  पुढे बँक ऑफ इंडीया मार्गे सुजाता हॉटेल आशिर्वाद सोसायटी जवळून संदेश विद्यालय ते विद्यादीप शाळेकडून खाली साईबाबा मंदीर असे करून श्री छत्रपती शिवाजी महाराज  मैदान येथे समारोप साठी सायंकाळी ५ ते ५-३० वाजेपर्यंत पोहचेल. 

            या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृ संस्थेचे पदाधिकारी, युवक मंडळ पदाधिकारी, बळीराज सेना पदाधिकारी, कु.स.संघ शाखा विक्रोळी-घाटकोपर पदाधिकारी, सदस्य, सभासद,महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, आजी -माजी पदाधिकारी, सदस्य, वधू - वर सूचक मंडळ पदाधिकारी, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित रहाणार आहेत. तरी सर्व कुणबी समाज बांधव, भगिणी, युवावर्ग सर्वांनी आपला बहुमुल्य वेळ समाज्यासाठी द्यावा आणि सहकार्य करून सहभागी व्हावे असे कु.स. संघ मुंबई विभागीय शाखा  विक्रोळी - घाटकोपर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Saturday, 21 December 2024

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान

मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे वार्ड क्रमांक 127 चे वार्ड अध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील शंभर तरुणांनी रक्तदान करत भगत यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. पश्चिम कातोडीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भटवाडी येथे पल्लवी ब्लड बँकच्या सहकार्यातून वार्ड अध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणेश भगत यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याना आदर्श रक्तदाता गौरव पत्र देत सन्मानित करण्यात आले. सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत हे शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे अनिल निर्मले , रमेश शिंदे, नुपूर सावंत, विशाखा घडशी, सूरज हनीफ, राजेश आहिरे, रवींद्र दाभाडे, तुषार साहिल, विनोद जाधव आदी उपस्थित होते.

महापुरुषांच्या स्मारकांच्या कामाला गती द्या आमदार दिलीप लांडे यांची विधानसभेत मागणी !!

महापुरुषांच्या स्मारकांच्या कामाला गती द्या आमदार दिलीप लांडे यांची विधानसभेत मागणी !!

** चांदिवलीतील विविध समस्यांवर अधिवेशनात उठवला आवाज 

मुंबई, (केतन भोज) : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमावादातून कर्नाटकात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात केंद्र सरकारने मराठी माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी करतानाच चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या कामाला गती द्यावी तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि संत ककय्या महाराज यांची स्मारके उभारण्यात यावीत, अशी विनंती राज्य सरकारला केली. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना दिलीप  लांडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.  पंतप्रधान आवास योजनेतून 4,475 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधून देण्यात येणार आहेत. पण त्याचवेळी एमएमआरडीएने 2008 - 09 मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारती राहण्यास योग्य नसल्याकडे लक्ष वेधून क्रांती नगर, संदेश नगर आणि जरीमरी या मिठी नदीच्या पात्रातील धोकादायक ठिकाणच्या प्रकल्पबाधितांना हक्काची घरे देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने ग्रामीण भागात घरगुती जोडणी देण्यात येत आहेत. पण चांदिवली मतदारसंघात अंबिका नगर, वाल्मिकी नगर, अशोक नगर, राजीव नगर या डोंगराळ भागात पाणी मिळत नसल्याने भूमिगत टाक्या देण्यात येऊन अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ही लांडे यांनी केली. नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन डोंगराळ भागातील धोकादायक वस्त्यांची पाहणी करून या लोकांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली.

मुंबईतील जयेश ट्रेनिंग अकॅडमी मध्ये पुमसे सेमिनारचे आयोजन !

मुंबईतील जयेश ट्रेनिंग अकॅडमी मध्ये पुमसे सेमिनारचे आयोजन !

मुंबई, (केतन भोज) : जयेश ट्रेनिंग अकॅडमी तर्फे प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान पवार पब्लिक स्कूल, कांदिवली येथे पुमसे सेमिनारचे आयोजन करण्यात आले. सेमिनारसाठी जागतिक मिस. इवा संदरसेन यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले. इवा संदरसन ही पुमसे या प्रकारात जगभरात 1 क्रमांकावर असून नुकत्याच हाँगकाँग येथे झालेल्या 2024 मधील जागतिक पुमसे स्पर्धे मध्ये वैयक्तिक प्रकारात रजत पदक आणि फ्री स्टाईल या प्रकारात रजत पदक पटकावले आहे, तसेच मागील 2022 या वर्षी गोयांग येथे झालेल्या जागतिक पुमसे स्पर्धे मध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक आणि फ्री स्टाईल या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. या सेमिनारचे आयोजन प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी केले. ह्या सेमिनार मध्ये प्रशिक्षक आणि खेळाडूंना पुमसे मधील आधुनिक बदल आणि उत्तम प्रतीचे प्रशिक्षण मिळाले.

घाटकोपर मधील विद्याभवन हायस्कूल मध्ये संपन्न झाली आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा !

घाटकोपर मधील विद्याभवन हायस्कूल मध्ये संपन्न झाली आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा !

मुंबई, (केतन भोज) : पुणे विद्यार्थी गृह, माजी विद्यार्थी मंडळ, मुंबई विभाग आयोजित मारूती लक्ष्मण मराठे आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा 2024-25 विद्याभवन संकुल घाटकोपरच्या सेमिनार हाॅल मध्ये दिनांक 19-12-2024 रोजी संप्पन झाली. सदर स्पर्धेत विविध शाळांचे 155 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन विदयाभवन नं.2 च्या समन्वयिका सरला नरेंद्रन यांनी केले. मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका योगिनी पोतदार व इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील हे या स्पर्धेसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाला क्रीडाशिक्षिका अस्मिता चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केतन पाटील व दिपंकर कांबळे या राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ खेळाडूनी आपला बहुमूल्य वेळ देऊन मोलाचे सहकार्य केले. सब ज्युनिअर गट मुले/मुली, ज्युनिअर गट मुले/मुली , सिनियर गट मुले/मुली या सर्व गटातून प्रत्येकी तीन तीन विजेत्यांची निवड करून विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.

मुंबईसह राज्यात पाचदिवशीय इन्स्टा हीलिंग रिट्रीट' उपचार शिबीर !

मुंबईसह राज्यात पाचदिवशीय इन्स्टा हीलिंग रिट्रीट' उपचार शिबीर !

मुंबई, (केतन भोज) : अनेक आजारांचा सामना करणाऱ्यांसाठी मुंबईसह राज्यभरात 'इंस्टा हीलिंग रिट्रीट' उपचार पद्धती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 23 ते 27 डिसेंबरदरम्यान डॉ. रवी वैरागडे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम ही उपचार पद्धती समजून सांगणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. सर्व अशक्य रोग त्यांच्या मुळापासून बरे होऊ शकतात, हे प्रमाण मानून देशभरातील रुग्णांना सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि योग्य सल्ला देण्यासाठी डॉ. रवी वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित केले आहे. यावेळी 50 वर्षे वापरातील औषधीविरुद्ध 5 दिवसांचे हे शिबीर असून त्यात रुग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या प्रचलित औषधांच्या दुष्परिणामांमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे सर्व मानसिक तणाव आणि वेदनादायक गंभीर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी नागरिकांत यावेळी जागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

डॉक्टर काका सांभाळा !

डॉक्टर काका सांभाळा ! लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याह...