Thursday, 30 January 2025

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

**शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी

**तसेच ब प्रभाग आधारकार्ड केंद्र बंद असल्याने नागरीकांना जावे लागत आहे अडचणींना सामोरे 

कल्याण, प्रतिनिधी - सर्वांच्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण कागदपत्रांमध्ये एक अशा आधारकार्ड  नवीन नोंदणी व आधारकार्ड अद्यायावत करण्याचे एक दिवसीय शिबिर स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून करण्यात आले होते नागरिकांचा प्रतिसाद व गर्दी पाहून दोन दिवसांचे करण्यात आले.
 
०- ५ वयातील नवीन आधारकार्ड, ५-१८ वयातील व १८ वर्ष वरील नागरिकांचे आधारकार्ड अद्यायावत करणे यासाठी ७४ नागरीकांनी उपस्थित दाखवली अनेक नागरिकांना वेळेअभावी निराश होऊन परत जावे लागले यासाठी पुन्हा शिबीर लावण्याची मागणी स्फूर्ती फाउंडेशन कडे केली. आधारकार्ड मुख्य सर्वर वरील कामाचा ताण यामुळे नोंदणी संथगतीने होत होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका ब प्रभाग येथील आधारकार्ड केंद्र नोंदणी मशीन नादुरुस्त असल्याने अनेक नागरीकांची गैर सोय होत असल्याचे नागरीकांनी सांगितले. UIDAI (आधारकार्ड) विभागानुसार आधारकार्ड हे नागरीकांनी दर १० वर्षांनी, तर ५ वर्षांनी, १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अपडेट करणे आवश्यक आहे, परंतु सदर विभागाकडून योग्य नियोजन नसल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे, तसेच UIDAI (आधारकार्ड) विभाग टोल फ्री नंबर 1947 नंबर वरून कोणत्याही तक्रारीसाठी फोन केला तर तक्रार निवारण होत नाही, UDAI (आधारकार्ड)चे मुख्य कार्यालय मुंबई, ठाणे येथे आहे त्यामुळे कोणी याआधी आधारकार्ड काढले नसेल, जन्मतारीख दुरुस्ती, आधारकार्ड नोंदणी केल्यानंतर ही घरपोच आधारकार्ड येत नाही, विधवा महिलांना आधारकार्ड मध्ये दुरुस्ती करताना अडचण येत आहे अशा अनेक इतर तक्रारी नागरीकांनी स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांच्या कडे केल्या, याबाबत संबंधित विभागाला पत्र देऊन पाठपुरावा करण्यात येईल अशी आश्वासन त्यांनी दिले.

या शिबिरासाठी पोस्ट ऑफिस मुख्य कार्यालय येथील मुख्य व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नागरिकांच्या अडचणी ओळखत शिबिराचे आयोजन केले यासाठी स्मृती फाऊंडेशनचे अध्यक्ष बजरंग तांगडकर यांचे आभार मानले.

Wednesday, 29 January 2025

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

पनवेल, (केतन भोज) : दैनिक युवक आधारच्या पहिल्या वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खांदेश्वर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पनवेल वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, प्रणिता फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर, दिशा महिला मंचच्या संस्थापिका नीलम दाते आंधळे, महिला बचत गटाच्या प्रमुख स्वप्ना साखरे, डॉ.शुभदा निल, सामाजिक कार्यकर्ते बबन बारगजे तसेच दैनिक युवक आधारच्या मुख्य संपादिका भारती संतोष आमले यांच्या हस्ते करण्यात आला. मागील एक वर्षापासून वृत्तपत्राच्या स्पर्धेत दैनिक युवक आधारची घोडदोड सुरू केली होती, दैनिक युवक आधार अति कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून नावारूपास आले व फक्त पनवेल मध्ये नसूनच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दैनिक युवक आधार हे वृत्तपत्र पोहोचले आहे. या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ पत्रकार दैनिक युवक चे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख प्रदीप पाटील, लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरगुडे, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे, पत्रकार सोनल नलावडे, युथ महाराष्ट्र संपादिका दिपाली पावसकर,पत्रकार आनंद पवार, भारतीय माजी सैनिक समीर दूंद्रेकर, उसर्ली ग्रामपंचायतीचे लेखनिक किरण भगत. श्री दत्तकृपा बिल्डर्स चे सुरज भगत, दैनिक युवक आधार चे रायगड प्रतिनिधी प्रमुख मनोहर भोईर, पत्रकार राणिता ठाकूर, पत्रकार सायली साळूंके, पत्रकार आरती सुरवसे, पत्रकार उमाकांत पानसरे, दैनिक युवक आधार चे कार्यकारी संपादक सुरेश भोईर, उपसंपादक विलास गायकवाड, सहसंपाद मुकुंद कांबळे, निवासी संपादक राकेश पाटील, कोकण विभाग प्रतिनिधी प्रमुख विजय दूंदरेकर, पनवेल तालुका प्रतिनिधी निजाम सय्यद, संपादक संतोष आमले आधी उपस्थित होते. दैनिक युवक आधार संपादक संतोष आमले यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे, तिची प्रभावीता आणि समाजातील महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून युवा वर्ग तसेच सामाजिक सर्व स्तरावरील बातम्यांना न्याय देण्यास कटिबद्ध राहतील अशी यावेळी त्यांनी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांनी केले. तर सूत्रसंचालन पूर्णा पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश भोईर कार्यकारी संपादक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दैनिक युवक आधारच्या प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कातळवाडी येथे माघी गणेशोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कातळवाडी येथे माघी गणेशोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

चिपळूण - ( दिपक कारकर  )

तालुक्यातील अंतिम टोकाच्या मुर्तवडे कातळवाडी येथील श्री गणेश मंदिर देवस्थान असणाऱ्या वाडीतील श्री गणेश नवतरुण मित्र मंडळ व महिला मंडळ ( गणेश गल्ली ), ( रजि. ) उपरोक्त मंडळातर्फे सालाबादप्रमाणे माघी गणेशशोत्सव साजरा होणार आहे. कातळवाडीतील भक्तीस्थान असलेलं ग्रामदैवत श्री वाघाजाई देवी मंदिर, श्री हनुमान मंदिर त्यातीलच वाडीत प्रवेश केल्यावर गणपती बाप्पाचे मुखदर्शन घडविणारे हे एक मंदिर आहे. सदर मंडळाची सन - १९९१ साली स्थापना होऊन मंडळाचे यंदाचे ३४ वे वर्षे असून, सुवर्णमहोत्सवाकडे मंडळाची वाटचाल सुरु आहे.

प्रतिवर्षे भक्तिमय वातावरण व विविध कार्यक्रमांचे भरगच्च संयोजनात मंडळातील जेष्ठ - तरुण कार्यकर्ते व महिला मंडळ हा उत्सव साजरा करत असते.ह्यावर्षी दि.३१ जानेवारी २०२५ पासून उत्सवाला प्रारंभ होत असून,दि.२ फेब्रुवारी रोजी उत्सवाची सांगता होणार आहे. ३१ जानेवारी रोजी महिलांकरिता हळदी कुंकू, विनोदी खेळ, दांडिया नृत्य,संगीत भजन, १ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्म, भव्य पालखी मिरवणूक, भजन व दि.२ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान रात्रौ १० वा. चिपळूण तालुक्यातील नावाजलेलं "जय हनुमान भजनी भारुड मंडळ, मांडकी ( खुर्द )" निर्मित भारूड कलेचा मनोरंजनपर कार्यक्रम सादर होणार आहे. सदर मंडळाच्या तरुण कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत मंडळाची नुकतीच महाराष्ट्र शासन मान्य मंडळाची नोंदणी केली आहे. आगामी काळात कला/क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवत, मंडळाचे नाव रोशन करण्याची उमीद तरुणांनी निर्माण केली आहे.

पंचक्रोशीसह सर्व गणेश भक्तांनी सहकुटूंब, मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाची भव्यता वाढविण्याचे आवाहन श्री गणेश नवतरुण मित्र मंडळ, ( गणेश गल्ली ) तसेच मंडळाच्या महिला मंडळ व कार्यकारिणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, 27 January 2025

193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा 2025 !

193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा 2025 !

डोंबिवली, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून डावखर फाउंडेशन, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म्स विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन येत्या 29 व 30 जानेवारी 2025 रोजी रिजन्सी अनंतम, विको नाका, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत आयोजित केले आहे. 

आयोजक संतोष डावखर यांच्या म्हणण्यानुसार दर वर्षी अंदाजे 30000 हुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात. या वर्षी 45 शाळा सहभागी झाल्या असून विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन पोस्टर् स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच जागतिक पातळीवरील विविध देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन सुध्दा असणार आहे. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे. तेंव्हा जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांसह या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजक श्री संतोष सोपान डावखर आणि टीम यांनी केले आहे.

शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आणि पोस्टल स्टॅम्प बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 193 देशांच्या नोट्स आणि पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच विज्ञान या विषयांमध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


सौजन्य __
श्री संतोष सोपान डावखर आणि टीम.

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त अभिवादन !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त अभिवादन !

घाटकोपर, (केतन भोज) : शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ मधील शिवसेना शाखेमध्ये शिवसेना घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख डॉ.सुबोध बावदाने आणि शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ चे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सुनिल सोडा, महिला शाखाप्रमुख सौ.पूजा पवार व अन्य महिला - पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे आनंद आश्रम येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत मासिक मॉड्युलर पाय / हात कॅलिपर्स वाटप शिबिर संपन्न !

ठाणे आनंद आश्रम येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत मासिक मॉड्युलर पाय / हात कॅलिपर्स वाटप शिबिर संपन्न !

ठाणे, (केतन भोज) : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रम अंतर्गत सोमवार दि.२७ जानेवारी रोजी ठाणे शहरातील आनंद आश्रम येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत मासिक मॉड्युलर पाय / हात, कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक/ संकल्पक मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठाणे शहरातील आनंद आश्रम येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत मासिक मॉड्युलर पाय / हात,कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येथे. गेल्या वर्षभरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जवळ जवळ १२५० दिव्यांग बांधवांना मोफत वाटप करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील विविध भागातील शेकडो दिव्यांग बांधवांनी शिबिराला हजेरी लावली होती. यात अनेकांना मॉड्युलर पाय / हात, कॅलिपर्स देऊन त्यांना वापरण्याची पद्धत उपस्थित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णांना मिळालेल्या नव संजिवणीमुळे त्यांचे जीवन सुखद आणि सोयीस्कर होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दै.सागर चे संपादक राजू जोशी, रत्नागिरी येथील उद्योजक पटवर्धन, धर्मवीर आनंद दिघे यांचे जवळचे सहकारी कमलेश चव्हाण, विलास जोशी, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर ,नगरसेवक पवन कदम ,अनिल भोर ,श्रीमती तांडेल मॅडम आदी जण यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्याध्यक्ष राम राऊत, विलास काळान यांच्या समवेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Sunday, 26 January 2025

गौरीपाडा परिसरातील पथदिव्यांच्या 'स्फूर्ती फाउंडेशन'च्या मागणीला यश !

गौरीपाडा परिसरातील पथदिव्यांच्या 'स्फूर्ती फाउंडेशन'च्या मागणीला यश !

कल्याण, प्रतिनिधी - गौरीपाडा परिसरातील नागरीकांच्या तक्रारीनुसार साई सृष्टी सोसायटी व प्रकृति आंगन सोसायटीतील प्रवेशद्वार समोर पथदिवे नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करताना नागरीक, महिला, जेष्ठ नागरिक यांना समस्यांचा सामना करावा लागत होता, पथदिव्यांसाठी मागील काही वर्षांपासून स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून (२०२३,२०२४ पत्रव्यवहार) कल्याण डोंबिवली महानगरपालिका विद्युत विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत होती, निधी अभावी मंजूरी मिळत नव्हती यासाठी स्फूर्ती फाउंडेशन घ्या माध्यमातून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा‌ करण्यात आला, त्याला नुकतेच यश आले गौरीपाडा परिसरातील साई सृष्टी सोसायटी व प्रकृति आंगन सोसायटीतील पथदिव्यांसाठी पथदिवे (स्ट्रिट लाईट) बसवुन  दि.२६ जानेवारी २०२५ रोजी  सुरू करण्यात आले.

यानिमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच विद्युत विभाग व कर्मचारी यांचे आभार स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी मानले तर या परिसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" संपन्न !

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" संपन्न !

 ** *(१८/१/२०२५  ते‌ २४/१/२०२५)*

मुंबई, डॉ. विष्णू भंडारे : सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई, राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे, ग्रामीण विकास व संस्कार शिबीर, दि. १८/१ ते २४/१/२०२५ या कालावधीत मु. रानसई, तालुका उरण (पनवेल) या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात एकूण ५६ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक सहभागी झाले होते. आमचे या गावातील हे तिसरे शिबीर होते. शिबिराचे उद्घाटन दिनांक १८/१/२०२५  रोजी सायंकाळी ५.०० वाजता सरपंच सौ. राधा पारधी व समाजसेवक श्री. राजू मुंबईकर (महाराष्ट्रभूषण) यांच्या हस्ते, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर, प्रा. पंकज सरवदे व डॉ. विष्णू भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले व शिबिराला औपचारिक सुरुवात झाली.

आमच्या विद्यार्थ्यांनी रोज सकाळी तीन तासांच्या श्रमदानातून ग्रामस्वच्छता, रस्ते डागडुजी, गवत कापणे व शून्य प्लास्टिक मोहीम यशस्वीरित्या राबवली व स्थानिक ग्रामस्थांना त्यांचे गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आवाहन केले. तसेच पथनाट्याद्वारे आणि पत्रके वाटून गावातील तिन्ही वाड्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी जनजागृती केली. विशेष म्हणजे सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी व ईतर ग्रामस्थांनी आम्हाला चांगले सहकार्य केलं, म्हणूनच मागील‌ दोन‌ वर्षाप्रमाणे यावर्षीही आम्ही आमचे शिबीर यशस्वीरित्या राबवू शकलो. तसेच गावातील शाळेत विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विषयांवर चित्रकला स्पर्धा घेतली व विजेत्या मुलांना बक्षिसे वाटली.

तसेच रोज संध्याकाळी वेगवेगळ्या सामाजिक विषयावर बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंधश्रद्धा व बुवाबाजी, व्यसनमुक्ती, तरुणांची अंतर्भूत क्षमता, साप व पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयावर निमंत्रित वक्त्यांची व्याख्याने झाली. यामध्ये देखिल आमच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
  
बुधवार, दि. २२/१/२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता आम्ही गावातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांच्या उखाणे घेण्याचा व तिळगुळ व सोबत भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये आमच्या मुलींसह सर्व महिलांनी उत्तम सहभाग नोंदवला. त्यानंतर सर्व  ग्रामस्थांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे अशा स्वरूपाचा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. ज्यामध्ये विशेषता 'स्वच्छ गाव स्वच्छ भारत' व व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्य, नृत्य व गाण्यांचा समावेश होता.

प्रा. विशाल करंजवकर व सौरभ गुप्ता यांनी मुलांच्या उत्तम आरोग्य व फिटनेससाठी  नियमित रोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेत हलका व्यायाम, कवायती व योगाचे विविध प्रकार त्यांना शिकवले. तसेच शेवटच्या दिवशी मुला मुलींच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते.

शिबिराच्या दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व प्राध्यापक डॉ. समीर ठाकूर, डॉ. शशिकांत मुंडे, डॉ. सुनील गायकवाड, प्रा. दिपक पगारे, प्रा. कुंदन कांबळे, प्रा. सुमेध माने, प्रा. निर्मला कांबळे, श्री. वैभव महाडीक यांनी शिबिराला भेट देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्थानिक समाजसेवक, श्री. राजू मुंबईकर, श्री मधुकर पारधी व सरपंच सौ. राधा पारधी यांनी केलेले सहकार्य खूपच मोलाचे ठरले. तसेच एन. एस. एस‌. कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचे माजी विद्यार्थी सौरभ‌ गुप्ता, ऋषिकेश सौंदाळकर, सागर बनसोडे, राहुल कोदुरुपाका, विजय कांबळे, आशिष जगताप इत्यादी विद्यार्थीनी सुट्टी घेऊन जमेल तसे शिबीरात सहभागी झाले व त्यांनी मनापासून सहकार्य केले.

*मुंबई प्रतिनिधी‌ - डॉ. विष्णू भंडारे*

डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२३ मध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२३ मध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

घाटकोपर ,(केतन भोज) : महाराष्ट्राच्या घराघरात फडकू दे भगवा शिवसैनिक नोंदणी करून शिवकार्य जागवा या एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रोळी पश्चिम मधील प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.यावेळी प्रभाग क्रमांक १२३ मधील असंख्य महिला-पुरुष व युवक - युवती यांनी माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख सुबोध बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिवकार्य मध्ये आपली नोंदणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत याठिकाणी शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

उल्हासनगर शहरात अवैध गुटखा विक्री जोरात !

उल्हासनगर शहरात अवैध गुटखा विक्री जोरात !

उल्हासनगर, प्रतिनिधी : राज्यात गुटखाबंदीचा निर्माण होऊन बारा वर्षे होत आली असून आजही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, बातमीदार माझा चे पत्रकार यांनी बिर्ला गेट, उल्हासनगर या परिसराचा आढावा घेतला असता त्यांना आढळून आले की मुख्य रस्त्यावरील तसेच गल्लीबोळातील पानटपऱ्यांवर गुटखा विक्री सर्रास चालू आहे. 

सीमाभागात तपासणी नाके असतानाही शेजारील राज्यांतून गुटखा शहरापर्यंत पोहोचतो कसा, हे अनुत्तरीत आहे. शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे या कायद्याचे पालन कोठेही होताना दिसत नाही. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातच थाटलेल्या टपऱ्यांमध्ये गुटख्यासह अनेक नशिल्या पदार्थांची विक्री होते. ही साखळी तोडण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे. कारवाई होत नसल्याने गुटखा, मावा विक्रीची उलाढाल कोट्यवधीच्या घरात आहे.

Saturday, 25 January 2025

ओल्या कचऱ्यापासून निर्मित कचऱ्याची सवलतीच्या दरात विक्री !

वाडा नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम !!

** ओल्या कचऱ्यापासून निर्मित कचऱ्याची सवलतीच्या दरात विक्री 

वाडा नगरपंचायत तर्फे ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खताची विक्री ही सामान्य नागरिकांसाठी दिनांक 26 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. सदर च्या सेंद्रिय खताची निर्मिती करताना कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आलेला नाही. सदर च्या खताची तपासणी ही शासकीय प्रयोगशाळेतून करण्यात आलेली असून त्यास शासनाचा "हरित महासिटी ब्रँड" प्राप्त झालेला आहे.

1. नागरिकांना हे खत सवलतीच्या दराने रुपये 10 प्रति किलो ह्या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

2. खत प्राप्त करण्यासाठी वाडा नगरपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेटुन अथवा व्हॉट्स अँप क्र. 9222770550 ह्या क्रमांकावर अथवा nagarpanchayatwada@gmail.com ह्या ईमेल आय डी वर आपली मागणी नोंदवावी. मागणी नोंदविल्यावर व देयक जमा केल्यावर दोन दिवसात खत उपलब्ध करुन देण्यात येईल.

                                     मनोज पष्टे 
                            मुख्याधिकारी तथा प्रशासक
                               वाडा नगरपंचायत, वाडा
                                     जि. पालघर

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात वंदे मातरम् सामूहिक गायनाचा स्तुत्य उपक्रम !

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात वंदे मातरम् सामूहिक गायनाचा स्तुत्य उपक्रम !

**सुमारे ४५०० विद्यार्थ्यांनी केले वंदे मातरम् चे समूहगायन

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

भारत मातेला वंदन करणारे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' १५० वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध नवमीला लिहिले गेले. ही तिथी कुष्माण्डा नवमी या नावेही ओळखली जाते. या तिथीला देवीने जसा कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना अभय दिले, त्याचप्रमाणे आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली म्हणून तत्कालीन प्रख्यात कादंबरीकार आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले. बालपणापासून आपण त्याचे एकच कडवे म्हणत आलो आहोत. मात्र चॅटर्जी यांनी त्याच काव्यात मातृभूमीच्या स्तुतीपर आणखी चार कडवी लिहिली आहेत. त्या शब्दांशी परिचय करून घेण्यासाठी सामूहिक गीत गायन करून मातृभूमीला वंदन करण्याचा विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात स्तुत्य उपक्रम केला.

वंदे  मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते जे त्यांच्या आनंद मठ (१८८२) या सर्वात प्रसिद्ध कादंबरीचा एक भाग होता जो संन्यासी बंडाच्या घटनांवर आधारित आहे. हे गीत बंगाली भाषेत आहे. 

वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये गायले होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत घोषणा केली की, भारतातील ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या वंदे मातरम या गीताचा गौरव करण्यात यावा. जन गण मन बरोबर समानतेने आणि त्याला समान दर्जा दिला पाहिजे.

ह्याच निमित्ताने नुकताच २४ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या सुमारे ४५०० विद्यार्थी आणि २५० हुन जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी नवीन विवा महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम् गीताचे प्रा. पद्मजा अभ्यंकर ह्यांच्या सोबत सामूहिक गायन केले. ह्यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या उपक्रमाला महाविद्यालयाचे ट्रस्ट अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सचिव अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी आणि प्राचार्या मुग्धा लेले, उपप्राचार्य सुभाष शिंदे, मार्गदर्शिका कल्पना राऊत ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Thursday, 23 January 2025

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या वतिने नालासोपारात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप शिबीर व लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरास नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला एकुण 400 नागरीकांची  नेत्र तपासणी करण्यात आली 30 रूग्णांना मोतीबिंदु शस्त्रक्रिया साठी भक्तीवेदांत हॉस्पिटल निर्मळ येथे पाठवण्यात आले.
रूग्णांना घेऊन जाण्यापासून ते आणण्यापर्यंत सर्व नियोजनबद्ध सोय करण्यात आली होती. मोतिबिंदु शस्त्रक्रियेनंतर सर्व नागरीकांना आपापल्या घरी सुखरूप पोहचवण्यात येणार आहे 

रूग्णांचा नातेवाईकांनी रूचिता नाईक यांचे कौतुक करताना घरातल्या माणसांसारखी मोठ्या हिमतीने व समर्पणाने कार्य करत आहे. कोणताही नातं नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने सुरु असलेली रुग्णसेवा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या हिमतीला व समर्पणाला मी सलाम करते, अशा भावना महिलांनी बोलुन दाखवली.

लहान मुलांसाठी अंगणवाडीत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांनी उत्सुर्फ प्रतिसाद देत स्पर्धेत भाग घेतला. दोन दिवसीय आधार कार्ड शिबीरास 70 नागरीकांनी लाभ घेऊन आधार कार्ड दुरूस्ती व नविन आधार कार्ड करण्यात आले. शिवसेना उपतालुकाप्रमुख अजितभाऊ खांबे यांनी शिबीरास भेट दिली.

यावेळी शिबीराचे मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उपशहरप्रमुख श्रीकांत जाधव, युवा शहरप्रमुख समीर गोलांबडे, विभागप्रमुख दानिश करारी, ओमकार मयेकर, उपशहर संघटीका सोनल ठाकुर, महिला उपशहर संघटीका भाविका चावडा, उपशहर संघटीका आशा सातपुते, विभागप्रमुख जया गुप्ता, शाखा संघटीका, हेमलता वैती, उज्ज्वला गाडगिळ उपस्थित होते.

Wednesday, 22 January 2025

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका क्रिकेट असोसिएशन यांचा गुणगौरव सोहळा सन २०२३-२४ दादर श्री शिवाजी मंदिर येथे रविवार दि.१९ जानेवारी रोजी पार पडला. या गुणगौरव सोहळ्यात (मागील वर्षी सन २०२२/२३ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान) के.सी.सी.बॉईज बेलघर संघ तळा तालुक्यातील अधिकृत नोंदणीनुसार एकूण ९४ संघांमध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धेमधील अव्वल स्थानी उत्तुंग कामगिरी करणारा पहिला क्रमांक व शिस्तबध्द संघ असे एकाच वेळी दोन पारितोषिक पटकणारा संघ ठरला असून के.सी.सी.बॉईज बेलघर संघाचे खेळाडू प्रकाश गोळे, प्रणव कदम, यश आंबार्ले हे तळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघातून खेळण्यास पात्र ठरले असून सर्वोत्कृष्ट फलंदाज दिनेश खुटिकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रयाग पाशिलकर, सर्वोत्तम ऑल राऊंडर भावेश कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. तसेच एकूण ९४ अधिकृत नोंदणी संघातून प्रथम क्रमांक के.सी.सी बॉईज संघ बेलघर, द्वितीय क्रमांक यंग बॉईज संघ रहाटाड (कोळीवाडा), तृतीय क्रमांक काळभैरव क्रिकेट संघ अडनाले, चतुर्थ क्रमांक नवहिंद क्रिकेट संघ पाचघर, पाचवा क्रमांक एम एस सी क्रिकेट संघ मांदाड हे पारितोषिक पटकाविण्यात एक ते पाच क्रमांकाचे मानकरी ठरले. या कार्यक्रम निमित्ताने तळा तालुका क्रिकेट असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, तळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक संघटनेतील पदाधिकारी, बेलघर/तळघर ग्रामस्थ, तळा तालुक्यातील बहुतांश क्रिकेट खेळाडू यांच्या व्यतिरिक्त अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. तळा तालुका क्रिकेट असोसिएशन संघटना ही सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्म समभाव अश्या प्रेरणेने विविध प्रकारे कार्यक्रम राबवित असते त्यातून हा एक क्रिकेट माध्यमातून गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

टिटवाळा येथे परेश गुजरे यांच्या जनसेवा कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उदघाटन !

टिटवाळा येथे परेश गुजरे यांच्या जनसेवा कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उदघाटन !

कल्याण, संदीप शेंडगे : भारतीय जनता पक्षाचे उधोग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे यांनी टिटवाळा परिसरातील नागरिकांकरिता सेवे करीता कार्यालय सुरु केले. या कार्यालयातुन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अर्ज मोफत मध्ये भरून नागरिकांना लाभ मिळणार आहे.

यावेळी विधान परिषद आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, बुधाराम सरनोबत, मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर, वॉर्ड अध्यक्ष किरण रोठे,अमोल केदार, जयराम भोईर, गजानन मढवी, अमित धाक्रस,यांच्या सह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.

यावेळी परेश गुजरे यांनी सांगितले की आपण जनतेच्या सेवेसाठी जनसेवा कार्यालय सुरु केले आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना गोरगरिबां पर्यंत पोहचल्या पाहिजेत. तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, हेल्थ कार्ड, बँक पासबुक, विविध प्रकारचे शासकीय दाखले अर्ज मोफत भरण्यात येतील असे सांगितले.

यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान किरण गुजरे व परेश गुजरे यांनी केला. तसेच जनसेवा कार्यालय उदघाटन समयी सहाशेहून अधिक नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.

"४२वी मातोश्री रमाबाई आंबेडकर" आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा !

"४२वी मातोश्री रमाबाई आंबेडकर" आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा !

मुंबई, डॉ. विष्णू भंडारे : सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सांस्कृतिक मंडळातर्फे *'सोशल मीडियावरील महिलांचे चित्रण'* (Dipiction of Women in Social Media) या विषयावर ४२ वी मातोश्री रमाबाई आंबेडकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मंगळवार, दि. २१/१/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये होती. सकाळी ठिक ११ वाजता उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर यांच्या हस्ते मातोश्री रमाबाई आंबेडकर व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व बूद्धाच्या मुर्तीला पुष्प वाहून स्पर्धेचे उद्घाटन झाले. 

स्पर्धेच्या सुरुवातीला डॉ. समीर ठाकूर यांनी उपस्थित स्पर्धकांना स्पर्धेचे नियम वाचून दाखवले. तसेच त्यागमूर्ती  मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या कर्तुत्वाबद्दल सर्वांना थोडक्यात मार्गदर्शन केले, तसेच गेली ४२ वर्षे अखंडपणे चालू असलेल्या या स्पर्धेबाबत थोडक्यात  माहिती दिली. सदर स्पर्धेत एसएनडीटी आणि मुंबई विद्यापीठाशी सलग्न १७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

या स्पर्धेत पहिले पारितोषिक SNDT कॉलेजच्या *कु. साक्षी राजेश वाघमारे* या विद्यार्थिनीने पटकावले, तिला फिरता चषक व रोख बक्षीस ₹२००० आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तिने मराठीत भाषण केले.

द्वितीय पारितोषिकदेखिल SNDT च्याच *कु. दिव्या दास* या विद्यार्थिनीने जिंकले, तिला रोख पारितोषिक ₹१५०० आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले, तिने इंग्रजीत भाषण केले.  हिंदी भाषेसाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक गुरूनानक कॉलेजच्या, *कु. गूरुप्रसाद यादव* या विद्यार्थ्याला रोख रु. ७५० व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

सर्व सहभागीं विद्यार्थांनी महिलांचे समाज माध्यमातील चित्रण या विषयावर त्यांची अभ्यासपूर्ण मते प्रभावीपणे व आत्मविश्वासाने मांडली.

या स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून डॉ. विष्णू भंडारे, डॉ. भावना राठोड आणि प्रा. छाया पावसकर यांनी काम पाहिले. त्यांनी उपस्थित स्पर्धकांना वकृत्व स्पर्धेत भाग घेतल्याने संवाद कौशल्य व लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलण्याचे साहस वाढते, असा अभिप्राय दिला व सदर विषय अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने फक्त ७ मिनीटात सादर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक मंडळाच्या सर्व प्राध्यापकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले महीनाभर भरपूर परिश्रम घेतले.

*मुंबई प्रतिनिधी - डॉ. विष्णू भंडारे*

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून विविध विकास कामांचा झंझावात !

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून विविध विकास कामांचा झंझावात !

** जी विकास कामे आजपर्यंत कोणीही करू शकले नाही ती विकास कामे डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ. सुबोध बावदाने यांनी पूर्ण करून दाखवली 

घाटकोपर, (केतन भोज) : विक्रोळी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२३ मध्ये माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व शिवसेना घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून प्रभागातील अनेक प्रलंबित समस्या आणि विकासकामे महापालिका व इतर ठिकाणी पाठपुरावा करून तसेच काही इतर स्वखर्चातून सोडवल्या जात आहेत. यामध्ये १२३ प्रभागातील ज्या- ज्या विभागात समस्या असतील त्या ठिकाणी लादिकरण, मंडळाच्या शेडचे काम, नाले सफाई, सार्वजनिक शौचालयाचे काही प्रश्न असतील किंवा इतर अनेक प्रश्न पूर्ण करण्याचे काम त्यासोबतच प्रभाग क्रमांक १२३ मध्ये प्रत्येक विभागात, मंडळात मोफत आरोग्य शिबिरे विविध आजारांवरील शस्त्रक्रिया नागरिकांना मोफत करून देण्याचे काम याशिवाय विभागातील स्थानिक मुला - मुलींना नोकरी मिळवून देण्याचे काम डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून पूर्ण केले जात आहेत. 

त्यामूळे प्रभाग क्रमांक १२३ मधील सर्व स्थानिक नागरिकांकडून याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत डॉ. भारती बावदाने यांना पूर्ण क्षमतेने पाठींबा देऊन यावेळी निवडून आणण्याचा निर्धार १२३ प्रभागातील सर्व नागरिकांनी केला आहे. तसेच शुभारंभ मित्र मंडळाचे खुले सभागृह ( शेड ) व लादीकरण करण्याचे काम तसेच सहकार मित्र मंडळाच्या शेड मध्ये लोखंडी जाळी, लोखंडी दरवाजा लावण्याचे काम माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या प्रयत्नाने पूर्ण करण्यात आले आहे, त्याबद्दल विभागीय जनतेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच जी विकास कामे आजपर्यंत कोणीही करू शकले नाही ती विकास कामे प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांनी करून दाखवली आहेत.

Tuesday, 21 January 2025

भटक्या कुत्र्यांचा तक्रारींना केडिएमसी कडून केराची टोपली !

भटक्या कुत्र्यांचा तक्रारींना केडिएमसी कडून केराची टोपली !

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावरामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे व कुत्रे चालण्याचा अनेक घटना‌ घडल्या असून कल्याण मध्ये एक नागरीकाचा मुत्यू  झाला आहे, तरीसुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिका व आरोग्य विभाग भटक्या कुत्र्यांचा तक्रारीबाबत गांभीर्याने व कोणतीही धडक कार्यवाही करताना दिसत नाही, शंखेश्वर प्रेसिडेन्सी टावरी पाडा येथे मागील ७-८ महीन्यात अनेक घटना घडल्या याबाबत स्फूर्ती फाउंडेशन वतीने २ वेळा निवेदन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्य कार्यालय देण्यात आले,

परंतु कोणतीही कार्यवाही चे पत्र अथवा माहिती संबंधित विभागाकडून मिळाली नाही अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांच्या कडून देण्यात आली.

Monday, 20 January 2025

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

**इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

पुणे, प्रतिनिधी : रोजगाराच्या विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्याकरीता भारत आणि इस्राईल देशाअंतर्गत करार करण्यात आहे;  त्यानुसार इस्राईल येथे ‘होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स नॉन वॉर क्षेत्रातील आरोग्य विभागात ५ हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याकरीता https://maharashtrainternational.com  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे.

उमेदवार २५ ते ४५ वयोगटातील असावा, त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असावे. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असावे. 
भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावरील लेटेस्ट जॉब या मथळ्याखाली उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग कॉलेज तसेच आरोग्य विषयात काम करणाऱ्या संस्थांनी रोजगाराच्या संधीबाबत अधिकाधिक उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

Sunday, 19 January 2025

एक बातमी आणि मी __

एक बातमी आणि मी __

गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.

अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे. 
खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल. 

देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे. 
एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही? 

दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?
खरं म्हणजे  माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी.  निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?

खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन. 

आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायल मध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर)  त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते.  युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.
सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !

—-- सुनील देशपांडे (९६५७७०९६४०)

कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी.कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !!

कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी.
कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !!

** स्मृती फाउंडेशन, कल्याण तर्फे दखल

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीची अनेक स्वप्न दाखवत आहे परंतु अजूनही रस्ते, खड्डे आणि ट्रॅफिक अशा मुलभूत सुविधांसाठी नागरीक ओरड करत आहेत. नोकरदार सकाळी २ तास आणि संध्याकाळी २ तास रेल्वे प्रवास करून‌ आल्यानंतर घरी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनवरून रोज अर्धा तास ते कधी कधी एक तास लागत असेल तर नागरीकांची काय अवस्था असेल हे प्रशासनाला‌ कधी‌ समजणार कल्याण -मुरबाड रोड, कल्याण श्री हाॅस्पिटल -बैल बाजार रोड, कल्याण पुष्पराज हाॅटेल‌ रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दूर्गाडी किल्ला रोड नियमित ट्रॅफिक जाम असते.

अनेक नागरीकांनी कल्याण -बाईचा पुतळा -मुरबाड‌रोड ट्रॅफिक समस्या बाबत तक्रार केली होती त्या अनुषंगाने स्फूर्ती फाउंडेशन‌ अध्यक्ष बजरंग तांगडकर व‌‌ महिला प्रमुख शिल्पा तांगडकर व जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांच्या वतीने वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात त्यामध्ये सॅटिस प्रकल्प काम कधी‌ पूर्ण होणार हा नागरीकांचा प्रश्न आहे जेणेकरून ट्रॅफिक मुळे नागरीकांचा गुदमरलेला जिवास श्वास घ्यायला मिळेल, वाहतूक पोलीसांची संख्या वाढवावी, बेशिस्ती वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अवजड वाहने  सकाळी व‌ संध्याकाळी पूर्णतः बंद असावी, सिग्नल यंत्रणा नियमित चालू असावी अशी मागणी केली आहे.

'लावण्य दरबार'च्या यशानंतर 'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाचे वाशी आणि भायखळा येथे आयोजन !

'लावण्य दरबार'च्या यशानंतर 'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाचे वाशी आणि भायखळा येथे आयोजन !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या 'लावण्य दरबार' या कार्यक्रमाने अल्पावधीत १५० प्रयोगांचा टप्पा ओलांडला. 'लावण्य दरबार'च्या तुफान यशानंतर 'स्मित हरी प्रॉडक्शन'ने 'पाव्हणं जरा जपून' या नवीन लावणीप्रधान कार्यक्रमाचा शुभारंभ केला. निमति, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता आशुतोष गोखले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आले होते. श्री शिवाजी मंदिरचे विश्वस्त ज्ञानेश महाराव, बजरंग चव्हाण, मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, निनाद कर्पे यांच्यासह निमति स्मिता पाटणकर, लावण्यवती कविता घडशी, किरण पाटील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना हरी पाटणकर यांची असून संगीत प्रकाश सानप यांचे आहे. नृत्य दिग्दर्शनाची धुरा संदेश पाटील यांनी सांभाळली आहे.

           "पाव्हुण जरा जपून" चा मुहूर्त झाल्यावर प्रत्येक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्मित हरी प्रॉडक्शन निर्मित लावण्य दरबार चे प्रत्येक नाट्यगृह येथे मोठया प्रमाणात तिकीट विक्री होऊन प्रयोग यशस्वी केले आहेत आणि प्रेषक वर्ग महिला व पुरुष वर्ग तयार करून अर्पूव यश मिळवून दिले. एक प्रेक्षक वर्ग महिला आणि फॅमिली सहित नाट्यगृहात येण्या साठी तयार केला आहे. पुढील चार रांगा या महिला आगाऊ बुकिंग करून चांगला प्रतिसाद देत आहेत. निर्माते स्मिता हरी पाटणकर व लावण्यवती कविता घडशी यांनी खास तयार झालेल्या जुने- नवीन तरुण, तरुणी रसिक प्रेषक जे नक्कीच नाट्यगृहात वळणार म्हणून एक नवीन तंत्र वापरून एक संकल्पना केली आहे. बुधवार दि.२२ जानेवारी २०२५ रोजी ठिक ५ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे तर रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी ठिक ४ वाजता भायखळा पूर्व येथील अण्णा भाऊ साठे या नाट्यगृहात आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा १३ एप्रिलला !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा १३ एप्रिलला !! ** गावक-यांकडून जय्यत तयारी; यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन मुंबई, (शां...