जागतिक महिला दिनानिमित्त शिल्पा तांगडकर जिवन गोरव पुरस्काराने सन्मानित !!
*कल्याण मध्ये स्फूर्ती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव ; रोटरी क्लब ऑफ डायमंडस वतीने महिला सन्मान सोहळा*
कल्याण, प्रतिनिधी - जागतिक महिला दिनानिमित्त आज राजस्थान भवन, पारनाका, कल्याण येथे रोटरी क्लब ऑफ डायमंड वतीने महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिलांचा जिवन गोरव व जिवन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे दिनेश मेहता (डिस्ट्रिक्ट गवर्नर), ज्योती मेहता (फर्स्ट लेडी डिस्ट्रिक्ट), रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस अध्यक्ष अरविंद शिंदे, सेक्रेटरी राजेश चासकर, फर्स्ट लेडी आणि प्रकल्प प्रमुख संगिता शिंदे, सहप्रकल्प प्रमुख पल्लवी चौधरी उपस्थित होते.
स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक कर भरत असतो परंतु त्यांना रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कचरा, पाणी या विविध नागरी समस्या भेडसावत असतात त्या सोडविण्यासाठी स्फूर्ती फाउंडेशन विविध विभागांना सातत्याने पत्रव्यवहार करत पाठपुरावा करत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहचल्या पाहिजे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, कल्याण मध्ये १०० अधिक विधवा व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्युटी पार्लर, शिलाई मशीन, संगणक प्रशिक्षण, मेहंदी, इंग्लिश स्पिकींग अशी व्यवसाय व नोकरी प्रशिक्षण महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी देत आहे, तसेच विविध शासकीय कागदपत्रे आधारकार्ड, मतदानकार्ड, उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड यासाठी शिबीर राबवित आहे, विविध सामाजिक उपक्रम नागरिकांच्या हितासाठी राबवत आहे या कार्याची दखल घेत आज जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस वतीने शिल्पा तांगडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment