Sunday, 31 August 2025

मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे अपर उपआयुक्तपदी नियुक्ती !!

मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे अपर उपआयुक्तपदी  नियुक्ती !!

मालेवाडी, (तालुका वाळवा, जिल्हा सांगली) : गावच्या मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची अपर उपआयुक्त (Additional Deputy Commissioner) पदी पदोन्नतीवर राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे नियुक्ती झाली आहे. नुकताच सदर पदाचा चार्ज त्यांनी घेतला आहे.
अत्यंत प्रतिकुल परस्थितीवर मात करुन त्यांनी ही गरुडझेप घेतली आहे.  मालेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीचे शिक्षण, पुढे जवळच्याच तांदुळवाडी येथील पंडीत नेहरू हायस्कूल मध्ये आठवी ते दहावीचे शिक्षण व पुढे इस्लामपूर येथील कन्या महाविद्यालयात उर्वरित शिक्षण पुर्ण केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन १९९६ मध्ये पी. एस. आय. म्हणून त्यांची एम पी एस सी कडून नियुक्ती झाली. आपल्या सेवेत सतत अ श्रेणी त्यांनी संपादन  केली आहे.त्याना त्यांचे सेवाकाळात त्यानी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा.पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह, राष्ट्रपती पदक, राष्ट्रीय गरुडझेप अवार्ड आणि इतर अनेक बक्षिसे मिळाली आहेत.

या नियुक्ती नंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या, आज मी कुठे उभी आहे हे महत्वाचे नाही, तर मी इथे कशी आणि कोठून आले आहे हे महत्वाचे आहे. ज्याने आपले ध्येय लवकरात लवकर निश्चित केले आहे आणि सातत्याने त्या ध्येय पुर्तीसाठी प्रयत्न केला तर त्याला यशाला गवसणी घालणे अशक्य नाही.आजपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मदत केली, विविध प्रसंगी साथ दिली आहे त्या सर्वांचे  त्यांनी आभार मानले.

मालेवाडी गावात ही बातमी पसरताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील माजी सरपंच व धडाडीचे कार्यकर्ते श्री रंगराव जाधव म्हणाले, मनिषाताईची वेळ घेवून लवकरच संपुर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करीत आहोत. मालेवाडी गाव शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यामुळे देशभर प्रसिद्ध आहे. या निवडीमुळे परत एकदा या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री विलासराव कोळेकर यांनीही या नियुक्ती बद्दल खुप आनंद झाल्याचे स्पष्ट केले. व भविष्यात मालेवाडी गाव अधिका-यांचे गाव कसे होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत मालेवाडी करांनी शेतीची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली व प्रगती केली.  मात्र शिक्षणामुळेच प्रगतीची दारे उघडतात. म्हणून गावातील मुलासाठी शिक्षणाची विशेष आवड निर्माण करुन प्रगतीचा मार्ग ते कसा धरतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

Saturday, 30 August 2025

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी मुला -मुलींसाठी पोलीस आणि सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षणाबाबत व्याख्यानमाला संपन्न !!

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी मुला -मुलींसाठी पोलीस आणि सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षणाबाबत व्याख्यानमाला  संपन्न !!

चोपडा, प्रतिनिधी :
      भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा व जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र, व यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुला - मुलींसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण याबाबत व्याख्यानमालेचे आयोजन 29/8/2025 रोजी करण्यात आले होते.
         याप्रसंगी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र, यांचे पदाधिकारी मा.वाल्मीक बिलसोरे, मा.एडवोकेट उमेश मराठे, अनिकेत मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर सर हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आशिष गुजराथी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. नारसिंग  वळवी यांनी केले.
      सदर व्याख्यानमालेत सुरुवातीला मा. वाल्मीक बिलसोरे सर यांनी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TARTI मार्फत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण या योजने चे उद्देश व स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगताना म्हणाले की, ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा अंतर्गत कार्य करते. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी उमेदवारांना सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाते. यासाठी 72 हजार रुपये एका उमेदवारासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी एकूण शंभर उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे असे म्हणाले तर एडवोकेट उमेश मराठे यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हणाले की, सदर आदिवासी उमेदवारांना फॉर्म भरण्यापासून ते निवड होईपर्यंत ही संस्था मार्गदर्शन करणार आहे.
       याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सव २०२५ 'निर्माल्याचे' संकलन !!

श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सव २०२५ 'निर्माल्याचे' संकलन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

                 डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व आदरणीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्याचे संकलन आणि त्यातून खतनिर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य दीड दिवसांच्या गणपती विसर्जन स्थळांवर जसे डोंबिवली पूर्व, पश्चिम, ठाकुर्ली तसेच ग्रामीण विभाग जसे की खोणि, वlकलण डlयघर, दहीसर, खिडकाळी या भागात एकूण २० हुन आधीक गणेश विसर्जन स्थळांवर हे कार्य करण्यात आले. यामध्ये १,000 हून अधिक श्री सदस्य सक्रियपणे सहभागी ज़lले. विसर्जनासाठी आणलेल्या गणेश मूर्तींसोबत असलेल्या निर्माल्याचे या ठिकाणी संकलन केले गेले. प्रतिष्ठानच्या श्री सदस्यlनी हे संकलित केलेल्या निर्माल्यl मधील दोरा, प्लास्टिक, कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या आणि फुलांच्या पाकळ्या वेगळ्या गोणीत भरल्या. येकुण १ टन हुन अधीक पाकळ्यांच संखलन करण्यात आले. 
                जमा केलेल्या पाकळ्या उंबार्ली येथे नेऊन त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. हे खत उंबारली व इतर ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या वृक्षांना पुरवले जाते. आजपर्यंत, डोंबिवली आणि ठाकुर्ली भागात प्रतिष्ठानने ५,000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केलेली आहे आणि ५ टनपेक्षा अधिक गांडूळ खत तयार केले आहे. तसेच डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी कार्य करत आहे. जसे बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, बालसंस्कार मार्गदर्शन, जल पुनर्भरण, स्वच्छता अभियान आणि विहिरी व तलावांची स्वच्छता, आरोग्य शिबीर, रक्त दान शिबिर यांचा समावेश आहे. या प्रतिष्ठानचे कार्य फक्त भारतातच नाही, तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, नॉर्वे, दुबई आणि कतारसारख्या अनेक देशांमध्येही सुरू आहे.

Friday, 29 August 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भजन स्पर्धेला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भजन स्पर्धेला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद !!

** स्पर्धेतील विजयी उमेदवारांना, मंडळांना पुढील वर्षीच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मिळणार इंट्री.

** 'मंत्री आदितीताई तटकरे' यांच्याकडून कार्यक्रमाचे कौतुक.

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उरण विधानसभा मतदार संघ मर्यादित महिला भजन स्पर्धांना उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी उरणच्या जे एन पी ए वसाहतीतील बहू उद्देशिय सभागृहात घेण्यात आलेल्या या भजन स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांची सुप्त कलाकारी देखील अनुभवायला मिळाली. त्यामध्ये अवध्या १० वर्षांच्या एका चिमुकल्या तबला वादकाने सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मागील अनेक महिने जिल्हाभरात विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुक्यात देखील या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल १३ विविध भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही स्पर्धा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालली. 

या स्पर्धेच्या ठिकाणी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे भारती समाधान कटेकर यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, जासई हायस्कूलच्या प्राध्यापिका सुलोचना सुरेश पाटील, अपूर्वा पतसंस्था अलिबागच्या अध्यक्षा ऍड. कविता प्रवीण ठाकूर उपस्थित होत्या. आपल्या भाषणात मंत्री आदितीताई म्हणाल्या की आमचा आज सर्वात जास्त नामस्मरण झाला आहे. हे खरेच भाग्याचे आहे. उरण तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देते. स्पर्धेकांना उद्देशून त्या म्हणाल्या कि या सादरकिरणातून आपण आपली परंपरा जोपासत आहोत हे खूप छान आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजासमोर कसे पोहोचतो ते खूप महत्वाचे आहे. बक्षिसे कोणाला मिळतील यापेक्षा आज सादर होत आहेत ती भजने आमच्या दृष्टीने सर्वोत्तमच आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने सर्वच मंडळे उत्तम आहेत असे त्यांनी सांगितले. या भजन स्पर्धा आयोजनात उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष परिक्षित ठाकूर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर, माजी अध्यक्ष मनोज भगत, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर,शहर उपाध्यक्ष सुमिता तुपगावकर,श्री गुरुकृपा संगीत परिवारचे अध्यक्ष सुप्रिया घरत, तुषार घरत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या निमित्ताने मंत्री आदितीताईंनी एक घोषणा केली असून यावर्षी ज्या काही सर्वच तालुक्यात तालुका स्तरीय भजन स्पर्धा झाल्या आहेत. त्यांच्यातील विजेत्यांच्या साठी आपण पुढील वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेचे स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताकृझ पुर्व यांना मिळाला असून गायिका कु. ऋतिका मुरूडकर या होत्या. द्वितिय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ दुंदरेपाडा यांना मिळाला असून गायिका सुजाता पाटणकर या होत्या. तृतिय क्रमांक ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर यांना मिळाला असून त्यांच्या गायिका हर्षदा सालेकर या होत्या तर उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. कृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुडूस अलिबाग यांना मिळाला असून त्यांच्या गायिका पुजा पाटील या होत्या. स्पर्धेत उत्कृष्ट तबलावदक म्हणून ओमकार कराळे यांना घोषित करण्यात आले तर उत्कृष्ट गायिका म्हणून पुनम आगरकर यांना गौरविण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेचे परिक्षण माऊली सावंत, ओम बोंगाडे आणि  भाग्यश्रीताई देशपांडे यांनी केले. 

उरण तालुक्यात भजन स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन केले गेल्याने समस्त भजन मंडळ, भजन प्रेमी, अध्यात्मिक भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. सुप्रिया घरत, तुषार घरत यांनी सुंदर व उत्तम असे कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केल्याने सर्व जनतेनी त्यांचे व आयोजकांचे आभार मानले आहेत.

अनुशक्तीनगरात मनसेच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

अनुशक्तीनगरात मनसेच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) : 
              अनुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेशोत्सवासाठी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित या स्पर्धेमुळे अनुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात भक्तिमय वातावरणासोबतच सामाजिक संदेशही दिला जात आहे.
            नवनिर्वाचित विभागाध्यक्ष रवींद्र शेलार आणि महिला विभागाध्यक्षा अमिता गोरेगावकर यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले असून, राज्य उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य आणि माजी विभागाध्यक्ष रवींद्र गवस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. उपविभागाध्यक्ष सचिन ससाने, विशाल कदम, राजेश पूर्वे, प्रांजल राणे कस्पटे, लक्ष्मी ताई, विद्यार्थी सेनेचे गजेंद्र कांबळे, योगेश घनदाट, रुपेश बोरकर तसेच शाखाध्यक्ष मंगेश पडवळ, संतोष पवार, मदन गाडेकर, प्रसाद सनगरे, जयेश ठाकूर, संदीप बनसोडे, रोहित शेट्टी आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

गणेशोत्सव हा जातीपातीच्या पलीकडे साजरा केला जाणारा महाराष्ट्राचा प्रमुख सण आहे. “जातीपाती मला न कळते, मला न कळे कोणाचा… एवढेच माहीत मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा” असे विचार व्यक्त करून विभागाध्यक्ष शेलार यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला.
              सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी प्रथम पारितोषिक ₹५१,०००, द्वितीय ₹२५,००० तर तृतीय ₹१५,००० ठेवण्यात आले आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी प्रथम पारितोषिक ₹११,०००, द्वितीय ₹७,००० व तृतीय ₹५,००० अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली असून सर्व सहभागींना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.या उपक्रमाचे अभिनंदन मनसे नेते अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, योगेश सावंत, कर्णबाळा दुनबळे, राजाभाऊ चौगुले, रीठा गुप्ता व स्नेहल जाधव यांनी केले आहे. पारितोषिक वितरण समारंभ घटस्थापनेच्या दिवशी पार पडणार आहे.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे ग्राहक फाउंडेशनच्या आवाहन !!

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे ग्राहक फाउंडेशनच्या आवाहन !!

        जयेश शेलार पाटील (महासचिव ग्राहक फाउंडेशन)

सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मिठाई पेढे यांसह दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते व अशा पदार्थांना मागणी ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे असे पदार्थ विकताना सुरक्षिततेची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी तसेच भेसळयुक्त पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

तर ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास त्याची त्वरित तक्रार प्रशासनाकडे करण्यात यावी, असे आवाहनही ग्राहक संरक्षण फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई पेढे व अन्य दुग्धजन्य पदार्थ यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेकदा यामध्ये भेसळ करण्यात येते.

दुधामध्ये पाणी, साखर, कॉस्मेटिक पदार्थ, डिटर्जंट्स, युरिया, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्षार, सॅलिसिलिक ऍसिड, बोरिक ऍसिड, मेलामाइन, हायड्रोजन पेरोक्साइड, फॉर्मल्डिहाइड आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळले जातात. हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून यामुळे मळमळ, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, यकृताचे आजार आणि मूत्रपिंडाचे आजार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

तर मिठाईत कृत्रिम रंग (उदा. मेटॅनिल येलो), खवा, दूध, तांदळाचे पीठ (starch), आणि अॅल्युमिनियम फॉइल (रंगीत वर्खाऐवजी) मिसळले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जास्त रंगीत, हाताला रंग लागणारी, किंवा चिकट पदार्थ असलेली मिठाई टाळावी.

अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे याबाबत ग्राहक फाउंडेशन कडून जनजागृती अभियान राबविण्यात येत असून अशा प्रकारची कोणतीही भेसळ आढळल्यास त्याची त्वरित तक्रार करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया
मिठाईतील माव्यातील भेसळ दुधातील भेसळ तसेच मिठाईतील अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे अनेक आढळून येत आहे, त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

जयेश शेलार पाटील 
महासचिव ग्राहक फाउंडेशन,
+91 76202 56750

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती !!

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती !!

ठाणे, दि.२९ :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी संजय गोविलकर यांच्याकडून या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. संजय गोविलकर  यांच्या कार्यकाळातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय धाडसी कारवाया केल्या. 
     यापूर्वी श्री.सोनवणे हे महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांच्याकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उप अधीक्षक पदावर धडाडीने काम केले आहे, ज्यामुळे त्यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमांची सखोल माहिती आहे. तसेच सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नागपूर शहर, मुंबई शहर, नाशिक शहर तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून श्री.सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल आणि लाचखोरीला रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांना बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वृत्तांत - जेष्ठ पत्रकार/ संपादक जयेश शेलार पाटील 

गणेशोत्सवात बाप्पासोबत ‘सुरक्षेचा संदेश’ – २०० मंडपांतून बालसुरक्षा जनजागृती !!

गणेशोत्सवात बाप्पासोबत ‘सुरक्षेचा संदेश’ – २०० मंडपांतून बालसुरक्षा जनजागृती !!

मुंबई, (पी.डी.पाटील) : यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त, जेव्हा रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिक, बुद्धीची देवता असलेल्या त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या घराबाहेर पडतील, तेव्हा एक अनोखा सामाजिक संदेश त्यांच्या नजरेस पडणार आहे. 
      बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी आणि अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कार्यरत असलेल्या अर्पण संस्थेने रायगड पोलीस विभाग आणि महिला व बालविकास विभाग (WCD), रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने, एक अभिनव जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, २०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणोशोत्सव मंडपांमध्ये आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर, बाल लैंगिक शोषण (CSA) प्रतिबंधावर जनजागृती करणारे फलक लावले जाणार आहेत. मुलांना बाल लैंगिक शोषणाविषयी आवश्यक ती माहिती आणि कौशल्ये प्रदान करून त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनवणे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रौढ व्यक्तींना बाल लैंगिक शोषणाविषयी जागरूक बनवून, त्यांना आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. 
बाल लैंगिक शोषण हा एक अत्यंत गंभीर अपराध असून, आपल्या देशात दर दिवशी १८७ मुलांचे लैंगिक शोषण केले जाते. विशेष म्हणजे ९७% घटनांमध्ये, मुलांचे लैंगिक शोषण हे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींकडून केले जाते (NCRB 2022). त्यामुळे या जनजागृती मोहिमेद्वारे शोषणाच्या प्रतिबंधावर विशेष भर दिला जाणार असून, मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचा (PSE) व्यापक प्रचार केला जाणार आहे.  वैयक्तिक सुरक्षा शिक्षण (PSE) मुलांना असुरक्षित घटना आणि व्यक्ती ओळखून त्यांना नकार देण्यासाठी आणि अशा परिस्थितींमध्ये मदत मागण्यासाठी सक्षम बनवते.

      या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून, गणेश मंडपांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो मुलांना आणि त्यांच्या पालकांना ‘पिंकी’ नावाच्या व्यक्तिरेखेवर आधारित एका गोष्टीमार्फत वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचे (PSE) ५ मूलभूत संदेश दिले जाणार आहेत. गणेश मंडपांमध्ये भाविकांच्या दर्शनाची रांग जिथून सुरू होईल, तिथे अगदी मध्यवर्ती भागातच, या संदेशांचे  फलक लावण्यात येतील. जेणेकरून सर्व भाविकांना हे संदेश वाचून त्यांचा अर्थ समजून घेता येईल. प्रत्येक फलकावर एक QR कोड दिला असेल, जो स्कॅन केल्यास, मुलांना आणि त्यांच्या पालकांना अर्पणच्या इ-लर्निंग प्लॅटफॉर्मला भेट देऊन, पिंकीची संपूर्ण गोष्ट वाचता येईल. यामुळे पालकांना आणि मुलांना रांगेत उभे राहून या विषयाबद्दल अधिक जाणून घेता येईल. या गोष्टीची निर्मिती अर्पण संस्था आणि Tinkle या मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या मासिकाने संयुक्तपणे केली आहे.

      रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल याप्रसंगी बोलताना म्हणाल्या "यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त विविध गणेशोत्सव मंडपांमध्ये अर्पण संस्थेतर्फे आयोजित वैयक्तिक सुरक्षा जनजागृती मोहिमेत सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पालक आणि मुलांना वैयक्तिक सुरक्षेच्या मूलभूत नियमांविषयी जागरूक केल्यास आपण बाल लैंगिक शोषणाला आळा घालू शकतो. समाजापर्यंत हा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या या उपक्रमाच्या पाठीशी आहोत."
      रायगड जिल्हा महिला व बाल विकास विभाग अधिकारी श्री. श्रीकांत हवाले याविषयी बोलताना म्हणाले - "मुलं ही आपल्या देशाचं भविष्य असून त्यांना सुरक्षित ठेवणं ही प्रत्येक प्रौढ नागरिकाची जबाबदारी आहे. बाल लैंगिक शोषणामुळे त्यांच्या मनावर कायमस्वरूपी आघात होऊ शकतो, त्यामुळे अशा घटनांना आळा घालणे अत्यावश्यक आहे. व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. अर्पण संस्थेने सुरू केलेल्या या जनजागृती मोहिमेला रायगड जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाचा संपूर्ण पाठींबा आहे. गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी विविध मंडपांमध्ये येणाऱ्या अधिकाधिक पालकांपर्यंत व मुलांपर्यंत वैयक्तिक सुरक्षेचे मूलभूत संदेश पोहोचावेत, यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत."
       या मोहिमेविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुजा तापडिया म्हणाल्या - "बाल लैंगिक शोषणमुक्त जग निर्माण करणं हे अर्पणचं मुख्य उद्दिष्ट आहे. जर आपण मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रपणे काम केलं, तरच आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण करता येईल. सर्वप्रथम आम्हाला मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण ते अर्पणच्या प्रत्येक उपक्रमामध्ये ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहतात आणि आम्हाला सर्वतोपरी मदत करतात."
      या अभियानाच्या माध्यमातून, आम्ही मुलांसोबत आलेल्या प्रौढ व्यक्तींना सतर्क बनवून आणि बाल सुरक्षेमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यासाठी त्यांना प्रेरित करून, सर्व मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी बांधील आहोत, असेही त्या म्हणाल्या. 
        गणेशोत्सवामध्ये आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे पूजन करतो. गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता असल्याने, मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक सुरक्षेशी संबंधित महत्वाची माहिती देण्याचा, यापेक्षा अधिक चांगला आणि योग्य क्षण आणखी कोणता असू शकतो? यावर्षी अर्पणची ही मोहिम मुंबई पोलीस, रायगड पोलीस विभाग आणि महिला व बालविकास विभाग रायगड, यांच्या सहयोगाने राबवली जात आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सव फक्त भक्तीपुरता मर्यादित न राहता, त्याला प्रत्येक मुलाला सुरक्षित ठेवणाऱ्या आणि त्याचे रक्षण करणाऱ्या व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. यात शंका नाही.

'समाजकार्य आणि कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न' !!

'समाजकार्य आणि कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न' !!

चोपडा (प्रतिनिधी) - 

येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युनिक अकॅडमी, जळगाव यांच्या सहकार्यातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ? या विषयावर मार्गदर्शनपर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. 

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर होते, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून युनिक अकॅडमीचे साधन व्यक्ती नारायण पाटील, युनिक अकॅडमीचे समन्वयक नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भगिनी मंडळाच्या संस्थापिका स्व.सुशिलाबेन शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ.मारोती गायकवाड यांनी केले.

आपल्या व्याख्यानातून नारायण पाटील यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व क्रमिक पुस्तके, दैनिक वर्तमानपत्र वाचन तसेच सातत्यपूर्ण अभ्यास, स्वतः नोट्स काढणे, चालू घडामोडींचा आढावा, कृषी व क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे वाचन करून स्वतः अपडेट राहिल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते असे त्यांनी पटवून दिले. 

कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अनिल बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला समाजकार्य महाविद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांच्यासह २५० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल येथे संपन्न झाला.

महेंद्रशेठ घरत यांच्या `सुखकर्ता’ वर बाप्पाचे आगमन !!

महेंद्रशेठ घरत यांच्या `सुखकर्ता’ वर बाप्पाचे आगमन !!

** 'गणराया'ने मला भरभरून दिले : महेंद्रशेठ घरत

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाचे आगमन भाविकांनी बुधवारी (ता. २७) जल्लोषात केले. तसेच गणरायाचे आगमन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या `सुखकर्ता’ बंगल्यावर झाले. सुंदर रांगोळ्या, विविध प्रकारच्या फुलांची देखणी आरास आणि वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी `सुखकर्ता’वर केले. यावेळी बुधवारी सकाळी अकरा वाजता गणरायाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर घरत परिवारातील कुटुंबीयांनी एकत्र येऊन सवाद्य आरती केली.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ``बाप्पाने मला भरभरून दिले आहे. त्याच्या ऋणातच मी आहे. गणेशाच्या आशीर्वादानेच मी नुकतीच दुसऱ्यांदा महाकठीण आणि हिंदू धर्मात पवित्र समजली जाणारी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतोय. `सुखकर्ता’ बंगल्यावर आलेला कुणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही, जे जे गरजवंत आहेत त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गणराया मला साथ दे, अशीच गणरायाचरणी माझी विनम्र प्रार्थना!’’
यावेळी सोनाली आणि मयुरेश चौधरी, कुणाल घरत, सेजल घरत आणि घरत परिवारातील सर्व कुटुंबीय उपस्थित होते. महेंद्रशेठ घरत यांच्या घरी बाप्पा २ सप्टेंबरपर्यंत आहे. गणेभक्त तोपर्यंत दर्शन घेऊ शकतात.

दरम्यान, गणरायाच्या शुभमुहूर्तावर महेंद्रशेठ घरत यांनी आपले जुणेजाणते आणि परिस्थितीत उत्तम साथ देणारे सहकारी बाळकृष्ण म्हात्रे (ओवळे गाव) यांना नवीकोरी स्कूटर भेट म्हणून दिली. तिचे पूजन महेंद्रशेठ घरत यांच्या `सुखकर्ता’वर झाले.

जयगड पोलीस ठाणे मार्फत गणपतीपुळे येथील झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये "दोन इसमांना अटक व 95% मुद्देमाल हस्तगत" करण्यात यश !!

जयगड पोलीस ठाणे मार्फत गणपतीपुळे येथील झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये "दोन इसमांना अटक व 95% मुद्देमाल हस्तगत" करण्यात यश !!

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडी या संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत.दिनांक 26/08/2025 रोजी दुपारी 12.30 वा ते दिनांक 27/08/2025 रोजी दुपारी 01.15 वाजण्याच्या मुदतीत जयगड पोलीस ठाणे हद्दीमधील केदारवाडी- गणपतीपुळे, ता. जि. रत्नागिरी येथील राहणारे श्री. विरेंद्र शांताराम गोसावी, वय 42, यांच्या राहत्या खोलीच्या बाहेरील दरवाजाला लावलेल्या कुलुपाचा कोयंडा कापून दरवाजा उघडून त्या वाटे घरात प्रवेश करून घरातील कपाटातील लॉकर कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरामधील ठेवलेले ₹2,36,200/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने घरफोडी चोरी करून अज्ञात इसमाने चोरून नेले होते म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून जयगड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 32/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (3), 331 (4), 305, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.हा गुन्हा घडल्याची माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त होताच, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने जयगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. कुलदीप पाटील यांना मार्गदर्शन केले व त्यानुसार गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवून तपास पथक तयार करून पथकातील अंमलदार यांना अज्ञात आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या.जयगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने लागलीच दोन पथके तयार करून त्यांच्या मार्फत स्थानिक पातळीवर माहिती प्राप्त केली व सी.सी.टी.व्हि फुटेज तपासण्यात आले.मिळालेल्या माहितीच्या आधारे जयगड पोलीस ठाण्याच्या पथकांमार्फत या गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसमांना 1) रोशन सुरेश जाघव वय-21 वर्षे रा. मेढे तर्फे फुणगुस, बौध्दवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी सध्या रा. गणपतीपुळे केदारवाडी, ता.जि. रत्नागिरी, 2) हैदर अजीज पठाण वय 27 वर्षे रा. झारणी रोड, नाफ्की चिकन सेंटर, जुना भाजी मार्केट, ता.जि.रत्नागिरी, सध्या रा. गणपतीपुळे, केदारवाडी, ता.जि.रत्नागिरी ताब्यात घेण्यात आले व दोन्ही आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून ₹2,21,530/- किमतीचा 95% मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश प्राप्त केले आहे.तसेच या गुन्ह्यामध्ये वरील नमूद दोन्ही आरोपी यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून यामधील आरोपी क्रमांक 2) हैदर अजीज पठाण यावर रायगड, मुंबई शहर व रत्नागिरी अश्या 3 जिल्हयांमध्ये यापूर्वी चोरी, घरफोडी सारखे एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.ही, कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पो. उप नि. श्री. विलास दीडपसे,स.पो. फौ/417अनिल गुरव, पो.हेकॉ/1240 राहुल घोरपडे, पो.हेकॉ/456 मिलिंद कदम,पो.हेकॉ/316 मंदार मोहिते,पो.हेकॉ/1374 निलेश भागवत, पो.हेकॉ/305 संतोष शिंदे,पो.हेकॉ/1446 संदेश मोंडे,म.पो.कॉ/150 सायली पुसाळकर,पो.कॉ/72 निलेश गुरव, पो.कॉ/489 पवन पांगरीकर व पो.कॉ/859 आदित्य अंकार.

Thursday, 28 August 2025

मुरबाड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात श्रीगणेशाचे आगमन !!

मुरबाड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात श्रीगणेशाचे आगमन !!

**मोठ्या भक्तिभावाने, शोडशोपचारे पुजनाने घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना**

मुरबाड (श्री.मंगल डोंगरे) : संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आज श्री गणेशाचे आगमन झाले असून, मोठ्या भक्तिभावाने, शोडशोपचारे यथाविधी घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून, गणेश भक्तांच्या आनंदाला आज उधाण आले आहे. मात्र गेल्या वर्षी निरोप देताना, अबाळव्रुद्धांनी डोळ्यातील तरंगत्या अश्रू नयनांनी पुढच्या वर्षी लवकर या, असा निरोप देऊन लवकर या अशा भावना व्यक्त केल्या होत्या. बघता बघता, वर्ष  सरले आणि आज वाजतगाजत मुरबाड शहरासह ग्रामीण भागात पुन्हा  गणपती बाप्पाचे आगमन झाले. 

यंदा मुरबाड तालुक्यात जवळपास साडेतीन हजार घरगुती गणपती बाप्पा व तीस ते पस्तीस सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली असुन, केलेल्या आरास, आणि देखाव्यातून पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, तर काही ठिकाणी समाजप्रबोधनपर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून, सार्वजनिक मंडळांनी  दक्षता घेतली आहे. तर गणेशोत्सवात कुठे ही काही अनुचित प्रकार घडु नयेत. सर्वत्र शांततेत गौरी-गणपती उत्सव साजरा व्हावा. यासाठी पोलीस निरीक्षक संदिप गिते, यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे.

उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश !!

उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : 
गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. अनेक जण मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश देखील करत आहेत. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून उरण मधील तरुणांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. मावळचे लाडके खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पनवेल मधील जनसंपर्क कार्यालयात उरण विधानसभेतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. रोहित बाळासाहेब मस्के राहणार नागाव म्हातवली, प्रणय प्रमोद वाघमारे राहणार द्रोणागिरी, मयूर दत्ता पाटील राहणार द्रोणागिरी, गणेश महादेव भिरजदार राहणार केगाव, अनिल निमंग्रे राहणार मुळेखंड यांनी नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे तसेच उरण तालूका प्रमुख दिपक ठाकूर, उरण तालूका ग्राहक संरक्षण कक्ष वीरू चाळके, भावेश भोईर व उपशाखाप्रमुख उपस्थित होते. तरुण वर्ग मोठया प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत असून यामुळे शिवसेना पक्ष अधिक मजबूत, व्यापक होण्यास मदत होत आहे. पक्ष प्रवेश मुळे संघटना व पक्षाचे आचार विचार तळागाळात पोहोचण्यास मदत होणार आहे.

जी.के.एस.महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थिनीनी हॅण्ड कबड्डी स्पर्धेत पटकवला द्वितीय क्रमांक !!

जी.के.एस.महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थिनीनी हॅण्ड कबड्डी स्पर्धेत पटकवला द्वितीय क्रमांक !!

मुंबई (शांताराम गुडेकर).:
             मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली च्या विद्यार्थीनींनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे जिल्हा हॅण्ड कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित हॅण्ड कबड्डी स्वतंत्र चषक २०२५ -२०२६ या स्पर्धेत सहभाग घेतला.सदर  स्पर्धा चॅम्पियन्स स्पोर्ट्स पार्क,पोगाव, भिवंडी, ठाणे येथे भरविण्यात आल्या होत्या. 

सदर स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट सामने खेळले. जी. के. एस महाविद्यालय च्या विद्यार्थीनी कु.सुप्रिया जाधव, जान्हवी दामले, कामिनी बोंबे, दिव्या भंडारी, जिज्ञासा पाटील , अदिती चिलवंते या विद्यार्थिनींनी हॅण्ड कबड्डी स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थीनींचे जी.के.एस. महाविद्यालयच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे तसेच मुख्याध्यापक डॉ.बी.एल. जाधव सर तसेच उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांदळे सर महाविद्यालयाच्या  क्रिडा शिक्षिका  सौ. हर्षला विक्रम विशे मॅडम व श्री.बाळाराम पांडुरंग चौधरी सर यांनी कौतुक केले.

Wednesday, 27 August 2025

शेवा कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण !!

शेवा कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : जेएनपीटी (जेएनपीए) या महत्वाच्या प्रकल्पासाठी जुना शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने जेएनपीटी (जेएनपीए) बंदरांसाठी विकल्या. जमीन संपादन करताना जुना शेवा कोळीवाडा गावातील स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत प्राधान्य, पुनर्वसन, विविध मूलभूत सेवा सुविधा पुरविण्याची हमी जेएनपीए प्रशासनाने दिले होते. मात्र ही हमी हवेतच विरले आहे. जेएनपीटी (जेएनपीए) प्रशासनाने उरण तालुक्यातील जुना शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी २५६ कुटुंबांना उरण तालुक्यातील मौजे बोरीपाखाडी उरण येथे ९१ गुंठे जमिनीत तात्पुरते संक्रमण शिबीरात गेली ४० वर्ष ठेवले आहे. मात्र कायमस्वरूपी पुनर्वसन केले नाही. व वेगवेगळ्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) विस्थापिताना वेळोवेळी अनेकदा केंद्र व राज्य सरकार विरोधात लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलने केली होती. पण राज्य व केंद्र सरकारने विस्थापितांचे संप, आंदोलन, मागण्यांची कोणतेही दखल घेतली नाही. ४० वर्षांपासून २५६ कुटुंब आजही पुनर्वसनापासून वंचित आहेत.त्यामुळे सर्वांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.


केंद्रीय शिपिंग, वॉटर व पोर्ट मंत्रालयाकडे जेएनपीएने २०२३ मध्ये शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा पाठविलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबीयांचे पुनर्वसन रखडल्याची बाब शुक्रवारी (२२) उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान निदर्शनास आली आहे. यामुळे केंद्र सरकारविरोधात विस्थांपीता मध्ये संतापाची लाट उसळली आहे.गेली ४०वर्षापासून गावातील २५६ कुटुंबीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.गेली ४० वर्षापासून शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबीयांचा केंद्र, राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे.मात्र संघर्षानंतरही विस्थांपीताना न्याय मिळालेला नाही. ४० वर्षांपासून २५६ कुटुंबाचा पुनर्वसनचा प्रश्न प्रलंबित होता. इतर मागण्याही प्रलंबितच होते.यामुळे विस्थांपीतांनी महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


सदर याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिका कर्त्यांच्या वतीने ऍड. रशीद खान व ऍड.सिद्धार्थ इंगळे यांनी बाजू मांडली तर केंद्र व जेएनपीए प्रशासनाची बाजू मांडताना ऍड.डी.पी.सिंग, अमित पाटील यांनी सांगितले की वर्ष २०२३ मध्ये केंद्रीय शिपिंग, वॉटर व पोर्ट मंत्रालयाकडे विस्थांपीतांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.आता पुढील सुनावणी ४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.पुनर्वसनाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याप्रकरणी पाठपुरावा सुरू आहे तसेच याप्रकरणी अभ्यासासाठी आणखी काही दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ४ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.चाळीस वर्षापासून जेएनपीटी (जेएनपीए) प्रशासन, केंद्रीय मंत्रालय व रायगड प्रशासन विस्थापितांची सातत्याने दिशाभूल करत आहेत, तरीही आजतागायत कोणताही निर्णायक निर्णय घेण्यात आलेला नाही.यामुळेच न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिशवर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंद‌कुमार पवार यांनी सुनावणीनंतर दिली.केंद्र आणि राज्य सरकारने जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामस्थांना वेळोवेळी पुनर्वसन करण्याचे व इतर महत्वाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन कधीही पूर्ण केले नसल्याने आता जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा ) विस्थांपीतां मध्ये  संतापाचे वातावरण पसरले आहे.

शिक्षणप्रेमी स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्या शोकसभेत नागरिकांना अश्रू अनावर !!

शिक्षणप्रेमी स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्या शोकसभेत नागरिकांना अश्रू अनावर !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
जन्माला आलो जगण्यासाठी आपण जगून दाखवूया आपल्या नंतर आपलं कोणीतरी चांगलं नाव काढेल असं काहीतरी करूया जे पेराल तेच उगवेल माणूस जसा विचार करत असतो तसा तो पुढे घडत  असतो आपण सकारात्मक विचार केला तर  आपल्या बाबतीत सकारात्मक घडत असते जर नकारात्मक विचार केला तर मग वाईट घडत असते. आपल्याला खूप थोडे आयुष्य  लाभले आहे, पण त्या आयुष्यात आपण केलेले चांगले कर्म हे चिरंतन आठवण आपली करून देत असतात हे विचार तंतोतंत लागू पडतात ते सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी स्वर्गीय अशोक ठाकूर यांना निमित्त होते जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडियम स्कूल आवरे चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी अशोक ठाकूर यांच्या शोकसभेचे स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्या शोकसभेचे आयोजन आवरे विद्यालयात करण्यात आले होते. सुरुवातीला अशोक ठाकूर यांच्या पवित्र स्मृतीस उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. अशोक ठाकूर यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक व कौटुंबिक कार्याचा आढावा शोकसभेमध्ये उपस्थित शोकाकुल जनाने केला. यात पुढे प्रामुख्याने अशोक ठाकूर यांनी आपल्या मातृभूमीत शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याच पवित्र काम केले. त्यांनी स्कुलची स्थापना करून मातृभूमित शिक्षणाची मुहूर्तमेढ सुरू केली. त्यांनी शैक्षणिक प्रवास संपुर्ण रयत शिक्षण संस्थेत केला व व्यावसायिक विद्यार्जन सुध्दा रयत शिक्षण संस्थेत केले. एकविरा या संस्थेच्या अंतर्गत नऊ दिवस नवरात्र भरवीत असत. आवरे शिव भोलेनाथ मंदिरात नवीन मंदिरासाठी नवीन कौल देऊन धार्मिक कार्यात सहभाग दर्शविला. ठाकूर सर एक थोर शिवभक्त होते सामाजिक तेची जाणीव करत आवरे खाडी  स्वतः लिलाव करून, घेऊन किंवा प्राणीमात्रासाठी कशाप्रकारे पाण्याची साठवण होईल याबद्दल त्याचा विचार करून गाळ काढून व्यवस्थित रित्या पाणपोईची व्यवस्था केली. माणुसकीचा महासागर प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात आठवण करून देईल अशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार हे दिसत आहे या पाठीमागे अशोक ठाकूर सर यांची शिस्त दिसून येते अतिशय प्रेरणादायी  विद्यार्थ्यांवर असणारे संस्कार हे बरच काही सांगुन जातात  आयुष्य हे थोडेच आहे जगणं थोडं पण आपण केलेल्या सामाजिक कार्याचा आरसा अशोक ठाकूर यांनी सर्वा समोर ठेवला आहे आयुष्य क्षणभंगुर आहे आयुष्यात कधी कोमेजून जाईल याचा पत्ता नाही कधी कुणाचा शेवट येईल ते सांगता येणार नाही कोरोना सारख्या महामारी च्या काळात अनेक शिक्षण संस्था व पालक विद्यार्थी वर्गाला वेठीस धरत असताना अशोक ठाकूर यांनी एक धाडसी निर्णय घेत सन २०२०- २०२१ या शैक्षणिक वर्षात शाळेतील ३१८ विद्यार्थ्यांची वार्षिक शैक्षणिक ही माफ केली. कोरोना कालावधीत पालक वर्गासाठी मोठा दिलासा  मिळालं स्वत: रयत सेवक असताना शिक्षिकीपेशा सांभाळून उभारलेल्या वास्तू कडे तितकेच प्रेरणे लक्ष देण्यासाठी यांसाठी त्यांनी शिक्षण सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली. शिक्षण हे कठीण परिस्थितीत शिक्षण पुर्ण केल्यानंतर अशोक ठाकूर यांनी जन्मगावी आवरे येथे रामचंद्र म्हात्रे  विद्यालय सुरु केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना विद्यार्जन केले. तसेच आवरे गावात अशोका कोचिंग क्लासेस नावाने गणित व इंग्रजी विज्ञान या विषयाचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. बारावी विज्ञान शाखेत सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथेमॅटिक्स हे आपल्या जन्मगावी आवरे व उरण येथे क्लासेस घेत असत अशी प्रतिक्रिया, मनोगत सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी शोकसभेत व्यक्त केले. शोक सभेसाठी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या शोक संदेशात अशोक  ठाकूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. अशोक ठाकूर हे कसे प्रेरणादायी होते व उत्तम होते याचे उदाहरण त्यांनी सर्वासमोर ठेवले. या प्रसंगी उपस्थित असलेले संतोष पवार यांनी शैक्षणिक मदत म्हणून संस्थेस दरमहा दोन हजार पाचशे रुपये देण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमास उपस्थित शोकाकुल मान्यवर प्रकाश पाटील, संतोष पवार, सुनील वर्तक, निलेश गावंड, धीरेंद्र ठाकूर, एस टी म्हात्रे ,भगत सर, प्रदीप वर्तक, मयूर गावंड, सुनील गावंड व विद्यालयातिल विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या शोक सभेसाठी  सूत्रसंचालन कौशिक ठाकूर यांनी केले.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वर्तक यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्यावर स्नेह व्यक्त करणारा सर्व स्तरातील हितचिंतक वर्ग उपस्थित होते. तसेच ठाकूर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, जानकीबाई जनार्दन स्कूल आवरेचे शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग व अशोक ठाकूर यांचे स्नेही उपस्थित होते शोक सभे समयी सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. अशाप्रकारे विद्येचा उपासक विद्येचा अनुयायी स्वर्गवासी अशोक ठाकूर यांची शोक सभा आवरे येथे विद्यालयात संपन्न झाली.

Tuesday, 26 August 2025

NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सौ. स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव !!

NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सौ. स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव !!

सदरचा कार्यक्रम हा नुकताच हॉटेल फोर सीजन मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. सौ. लंगडे या महाराष्ट्र नवउद्योजक केंदाच्या माध्यमातून गेली अठरा वर्षे कार्यरत असुन आतापर्यंत साडे तीन हजाराहून अधिक नव उद्योजक घडवले आहेत. यांच्या कामाची विशेष दखल घेवून त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे कडून कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते भारतज्योति उद्योगरत्न नारीगौरव सन्मान पुरस्कार 2022, राष्ट्रीय राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार 2022, आमदार विनय कोरे व नवोदिता समरजित घाटगे यांच्या हस्ते Business Conclave 2022 मध्ये Excellence Award  ने LONDON येथे पुरस्काराने सन्मानित केले आहे. पूर्ण भारत देशातील एकाच स्त्रीला सदर पुरस्कार दिला जातो. गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार 2022 आणि वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशन तर्फे इंटरनॅशनल पुरस्कार 2022, लोकशाही सन्मान पुरस्कार 2023, मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते, इंटरनॅशनल वुमन पार्लमेंटतर्फे आयकॅानिक  वुमन ॲवॅार्ड  2023 दिल्ली आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

वृत्तांत - विलासराव कोळेकर सर 

कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे मेळावा उत्साहात संपन्न !!

कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे  मेळावा उत्साहात संपन्न !!

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे) : नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खान्देश म्हणून ओळखला जातो. खान्देश हा महाराष्ट्राचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे आज खान्देशातील नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र व महाराष्ट्र बाहेर तसेच देश विदेशात नोकरी व्यवसाय धंद्या निमित्त मोठया प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. देशाच्या विकासात आजपर्यंत खान्देश मधील नागरिकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. खान्देश मधील नागरिक रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात नोकरीत धंद्या निमित्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. विविध ठिकाणी विखुरलेल्या खान्देश मधील नागरिकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन खान्देश नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचा उद्देशाने कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ ची स्थापना झाली असून विविध नागरिकांची एकमेकांना ओळख व्हावी, खान्देश मधील संस्कृती, आचार विचाराचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे रविवार दिनांक 24 /8/2025 रोजी उरण तालुक्यातील करंजा रोड वरील भारती बॅंक्वेट हॉल येथे खान्देश मधील नागरिक जे रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत अशा नागरिकांचा मेळावा स्नेहभोजन कार्यक्रम व सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साह संपन्न झाले.
सकाळी ९ ते १० सत्यनारायण पूजा, सकाळी १० ते १२ नृत्य गायन वकृत्व स्पर्धा,दुपारी १२ ते २ या वेळेत सहभोजन आदी विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. या मेळाव्याला व विविध कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लहास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाबराव जाधव, नवजिवन लोक विकास संस्थाचे अध्यक्ष किशोर पाटील, मराठा सेवा संघ कल्याण उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, हिंदी व मराठी गाण्यांचे गायक विनोद चोधरी बेलापूर, आरोग्य सेवा भिवंडीचे अध्यक्ष कैलास पाटील, खान्देश मित्र मंडळ ठाणेचे उपाध्यक्ष शांताराम पाटील, ठाणे जिल्ह्याचे उद्योजक विकास पाटील, डॉक्टर चेतन पाटील पनवेल आदी प्रतिष्ठित मान्यवरांनी या मेळाव्यास भेट दिली. त्यांनी सदर मेळावा व उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सर्व पदाधिकारी सदस्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष आनंद कुमावत, उपाध्यक्ष कैलास भामरे, खजिनदार वामन राठोड, सह खजिनदार संजय पाटील, सेक्रेटरी सचिन खैरनार, कार्याध्यक्ष डॉक्टर विजय देवरे, सह खजिनदार भरत पाटील, सह सेक्रेटरी ईश्वर माळी, सह सेक्रेटरी संदीप पाटील, सदस्य भगवान राठोड यांच्यासह सर्वच पदाधिकारी सदस्यांनी हा मेळावा व विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी नागरिकांनी विविध कार्यक्रम उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या कार्यक्रमातून खानदेश संस्कृतीचा आचार विचारांची ओळख सर्वांना झाली असून मेळावा व इतर कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन केल्याने असा उपक्रम दरवर्षी राबविण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी आयोजकांकडे केली. व चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. एकंदरीत कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ आयोजित मेळावा व इतर कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

घरफोडी चोरी करणा-या पती-पत्नी आरोपींना अटक !!

घरफोडी चोरी करणा-या पती-पत्नी आरोपींना अटक !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ते सायंकाळी ०४:०० वा. चे दरम्यान फिर्यादी राजु गुरूनाथ झुगरे वय ४४ वर्षे, रा. दादरपाडा, ता. उरण, जि. रायगड हे त्यांचे घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून घरामधील बेडरूमचे वॉर्डरूममध्ये ठेवलेले १३,७१,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेले म्हणून फिर्यादी यांनी उरण पोलीस ठाणेत दिलेल्या तक्रारीवरून गु, रजि. नं. २१३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३(५) अन्वये दिनांक ११/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त  नवी मुंबई, पोलीस सह आयुक्त,अपर पोलीस आयुक्त  (गुन्हे), पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ बेलापुर, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग नवी मुंबई यांनी नमुद गुन्हा गंभीर असल्याने गुन्हयातील चोरास पकडून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले होते.त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक  (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरिक्षक संजय राठोड, पोहवा /९६७ रूपेश पाटील, पोहवा /१७४४ शशिकांत घरत, पोहवा /१९८७ उदय भगत, पोहवा /१९५० गणेश शिंपी, पोना/२७९१ मेघनाथ पाटील, पोना / ३०७८ गंगाराम कचरे असे पथक तयार केले. सदर पथकाने तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) नवनीत मधुकर नाईक वय ४५ वर्षे २) स्मिता नवनीत नाईक वय ४१ वर्षे, सध्या रा. रूम नं. १०६ बिल्डीग नं. ०३ सृष्टी अपार्टमेन्ट, उमरोली, ता. जि. पालघर मुळ रा. ०२ विजय निवास, रेडीज चाळ, टेंभीपाडा रोड, शिवाजी नगर, भांडुप (पश्चिम) मुंबई यांना उमरोळी, पालघर, जि. पालघर येथुन ताब्यात घेतले. नमुद आरोपींकडे सखोल तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीत यांना नमुद गुन्हयात दिनांक १५/०८/२०२५ रोजी अटक करून त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करून त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेल्या मालमत्तेपैकी १४,५४,९२८/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने व इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहेत.

याव्यतिरीक्त वरील अटक आरोपीनी नवी मुंबई, रायगड, कोल्हापुर या जिल्हयात केलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत ते खालीलप्रमाणे

१) तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई गुन्हा रजि.क. १३९/२०२५ भान्यास कलम ३०५

२) खालापुर पोलीस ठाणे, रायगड गुन्हा रजि.क.५१९/२०२४ भान्यास कलम ३०५

३) शहापुर पोलीस ठाणे, कोल्हापूर गुन्हा रजि.क. ३१/२०२५ भान्यास कलम ३३१ (३),३०५

याशिवाय आरोपींचा पुर्व पुर्व इतिहास इतिहास पाहता त्यांचे विरूध्द विविध जिल्हयात एकूण २२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये त्यांनी शिक्षा भोगली आहे. सदरची कामगिरी अमित काळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ बेलापुर, किशोर गायके सहा. पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली  हनिफ मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहूल काटवाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप निरिक्षक संजय राठोड, पोहवा /९६७ रूपेश पाटील, पोहवा /१७४४ शशिकांत घरत, पोहवा /१९८७ उदय भगत, पोहवा /१९५० गणेश शिंपी, पोना/२७९१ मेघनाथ पाटील, पोना / ३०७८ गंगाराम कचरे यांनी अथक प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अशी माहिती हनिफ मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे नवी मुंबई यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर !!

ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर !!

रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला. अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे  तडफदार युवा नेते आहेत. रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिक तसेच कामगार क्षेत्रात काम करत आहेत. तरुणांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांना हि जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पदग्रहण समारंभा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अल्पसंख्यांक अध्यक्ष  अखलाक शिलोत्री, रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, जेष्ठ काँग्रेस नेते जयवंत पाटील, दिपक ठाकूर, परशुराम भोईर, महाराष्ट्र युवा इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, उरण तालुका युवा इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, प्रमोद ठाकूर, रमेश ठाकूर, सुरेश ठाकूर, मनीष ठाकूर, साई पाटील, तुळशीदास म्हात्रे, अमोल ठाकूर, वैभव ठाकूर, विशाल कवाडे. तसेच मोठ्या संखेने कॉंग्रेस कार्यकर्ते व भेंडखळ ग्रामस्थ उपस्थित होते.

वृत्तांत - (तालुका प्रतिनिधी) विठ्ठल ममताबादे, उरण

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : जनसेवेतून आनंद देणाऱ्या उरण तालुक्यातील  वशेणी गावात कार्यरत असणाऱ्या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक मोरेश्वर बागडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भागुबाई विद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा काठे, उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा म्हात्रे, नवीन शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर म्हात्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव पाटील, माजी सरपंच प्रसाद पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रीती पाटील, साई सेवक जगन्नाथ पाटील, रमेश पाटील, महेंद्र गावंड, देविदास पाटील, पुरण पाटील, बासरी वादक प्र.ना. बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. छोट्या छोट्या उपक्रमातून जनसेवेचे मूल्य जपणारे वशेणी इतिहास संपादकीय मंडळ म्हणजे देशाची सेवा करणारे मंडळ आहे.असे गौरवोदगार यावेळेस साहित्यिक व इतिहास अभ्यासक मोरेश्वर बागडे यांनी व्यक्त केले. 

या वर्धापन दिनानिमित्त वशेणी व उरण  तालुक्यातील आपापल्या परीने विविध क्षेत्रात जनसेवा करणाऱ्या दहा व्यक्तींना मंडळाकडून जनसेवा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
1) सौ. जान्हवी जितेश कडू, रा.जि.प शाळा रानसई वाडी (शैक्षणिक सेवा पुरस्कार)
2) श्री नागनाथ कुठार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा पोलीस स्टेशन (पर्यावरण सेवा पुरस्कार)
3) श्री नागेश पोशा पाटील, पुनाडे
(सामाजिक सेवा पुरस्कार)
4) श्री संदीप रामदास पाटील,
बोकडविरा (संघटन सेवा पुरस्कार)
5) श्री शशिकांत सहदेव ठाकूर, वशेणी (समालोचन सेवा पुरस्कार)
6) कुमारी आम्रपाली कमलाकर पाटील, वशेणी (दांडपट्टा कला संस्कृती जतन पुरस्कार)
7) श्री बळीराम चांगदेव म्हात्रे, वशेणी (सामाजिक सेवा पुरस्कार)
8) श्री टिळक नामदेव पाटील, वशेणी (लग्न देवकार्य सेवा पुरस्कार)
9) श्रीमती लिलाबाई जरासंध म्हात्रे, वशेणी (लग्नकार्य धवलारीन सेवा पुरस्कार)
10) श्री भरत लक्ष्मण पाटील, वशेणी (नाट्यप्रबोधन सेवा पुरस्कार) 

आज समाजाची विचारधारा बदलत आहे, तरुणांची जीवनमूल्य देखील बदलत आहेत.असा बदलता समाज दिशाहीन होऊ नये म्हणून जनसेवा करणाऱ्या लोकांचे कार्य दीपस्तंभा सारखे पुढे यायला हवे याच हेतूने वशेणी इतिहास संपादकीय मंडळ जनसेवा पुरस्काराचे आयोजन करते .असे मत यावेळी मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी मांडले. दिवसागणिक अनेक नवनवीन सामाजिक मंडळे, सांस्कृतिक मंडळे जन्माला येतात आणि एक-दोन वर्षात समाप्त सुद्धा होतात. परंतु स्थापनेपासून ते आज तगायत  सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवणारे वशेणी इतिहास संपादकीय मंडळ कौतुकास पात्र आहे असे गौरवोदगार उरण तालुक्याच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले, त्याचप्रमाणे शाळेतील मुलांना स्कूल बॅग वाटप, मरू आई व बापदेव मंदिरांना डस्टबीन वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गावंड आणि बी.जे.म्हात्रे यांनी केले.सदर कार्यक्रमास संदेश गावंड, सतीश पाटील, पुरुषोत्तम पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, हरेश्वर पाटील, कैलास पाटील, हरिश्चंद्र ठाकूर, गणेश खोत, अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात !!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात !!

** केंद्र सरकारची भूमीका होणार स्पष्ट.

** विमानतळच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना लागणार चाप.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्षे राजकारण सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावरून नेहमी आश्वासन मिळत आहे पण कार्यवाही मात्र शून्य आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणास विलंब होत असल्यामुळे प्रकाशझोत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विकास परशुराम पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. 
यात केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांना प्रतिवादी केले आहे.विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू असून, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे.विशेष म्हणजे राज्य सरकारने नामकरणाचा ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठविला आहे. मात्र, अंमलबजावणीस विलंब होत आहे.आता विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होऊनही नामकरणाचा प्रश्न जैसे थे आहे. प्रकल्पग्रस्त हवालदिल झाल्याने या लढ्याला कायदेशीर दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने विकास पाटील यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विमानतळाला दिबांचे नाव द्यायचे ठरले असेल तर त्याबाबतचा पत्रव्यवहार न्यायालयात सादर करणे अनिवार्य आहे.आता विमानतळ नामकरणाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नामकरण लढ्याला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त झाल्याने हा नामकरणाचा लढा अधिकच तीव्र झाला असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लवकर देण्यात यावे ही मागणी अधिकच तीव्र झाली आहे. विमानतळ नामकरण वरून राजकारण तापले असून याबाबत केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे लवकरच केंद्र सरकारला स्पष्ट करावे लागणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त, लोकनेते दिबा पाटील यांचे समर्थक यांच्या नजरा केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लागले आहेत.

मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारिणी जाहीर !!

मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारिणी जाहीर !! 

मुरबाड (श्री. मंगल डोंगरे) : सोमवार, दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी भिवंडी येथे झालेल्या बैठकीत मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखालील जम्बो कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी मान्यता दिली. जुलै महिना अखेरी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी चेतनसिंह पवार यांची मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी पुनर्नियुक्त केल्यानंतर त्यांनी नवीन तालुका कार्यकारणी जिल्हा काँग्रेस कमिटी कडे मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती आणि तिला आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतीत असलेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक फनाडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष महेश धानके, ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष दत्ता खाकर, नेताजी लाटे, जयवंत हरड, रजक शेख, गुरुनाथ देशमुख, सचिन धुमाळ आदि पदाधिकारी मुरबाड येथून उपस्थित होते. नवीन कार्यकारणीमध्ये एकूण ५० पदाधिकारी असून तालुक्यातील वालीवऱ्हे ते पोटगाव व रामपूर ते पाटगाव सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी जाहीर करत असून अनंत चतुर्दशी नंतर नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले. 

सदरील तालुका कार्यकारणी मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष-३, कोषाध्यक्ष-१, उपाध्यक्ष-४, सरचिटणीस-८, समन्वयक-१, संघटक-५, चिटणीस-७, कार्यकारणी सदस्य-६ आणि मंडल/विभाग प्रमुख- १५ अशा एकूण ५० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी तयार करण्यात आली. मुरबाड तालुका कार्यकारणी ही सर्व समाजातील प्रतिनिधीना तसेच ज्येष्ठ व युवा यांना योग्य स्थान देण्याचे काम तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केल्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी केले.

कार्यकारणी मध्ये वरिष्ठ तालुका उपाध्यक्षपदी - पांडुरंग शिंगोळे/ बंधू बेलवले/ भरत विशे, 
कोषाध्यक्षपदी- नेताजी लाटे, तालुका उपाध्यक्षपदी- जयवंत हरड/ गुरुनाथ देशमुख/ मोरेश्वर भोईर/ कांताराम भला,

तालुका सरचिटणीसपदी- मारुती टोहके/ गोविंद शेलवले/मार्तंड आगिवले/ रजाक शेख/ वसंत जमदरे/ सागर गायकवाड/ काळूराम गोंधली/ नरेश कुर्ले,

तालुका समन्वयकपदी- काळूराम विशे,
तालुका संघटकपदी- दामोदर भला/ हरिश्चंद्र पष्टे/ अंकुश धुमाळ/ भरत पवार/ दशरथ चौधरी 

तालुका सचिवपदी- बिपिन भावार्थ/ प्रकाश हिंदुराव/ भगवान तारमले/ संजय विशे/ दीपक आलम/ दिनकर गायकर/ दिलीप शेळके,

कार्यकारणी सदस्य - सिराज अत्तार/ नामदेव कराले/ वसंत शेलवले/ मोहन वाघ/ स्वप्निल जाधव/ हरेश वाघ, 

मंडलप्रमुखपदी - विठ्ठल ठमके असोले, गुरुनाथ वडवले देवगाव, समीर ठाकरे कुडवली, सचिन धुमाळ शिवळे, अजय शेळके सरळगाव, अमोल सूर्यराव किसळ, अनंत तिवार वैशाखारे, जयराम उघडा माळ, पांडुरंग शीद तळेगाव,  कुणाल पवार फांगुलगव्हाण, विपुल सुरोशे धसई, वसंत कराळे खोपिवली, गणेश गायकर डोंगरन्हावे, बालाराम मार्के म्हसा, निलेश आगवले शिरवली पदाधिकारी ची नेमणूक झाली.

Monday, 25 August 2025

पनवेलमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन !!

पनवेलमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
राजयोगिनी प्रकाशमणी दादीजींच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच विश्वबंधुत्व दिनाच्या पावन प्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, समाजसेवा विभाग – पनवेल व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी हुतात्मा स्मारक उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर पनवेल, सुनील झुनझारराव, अध्यक्ष-भाजपा पनवेल शहर नगरसेवक, प्रीतम म्हात्रे अध्यक्ष – जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था,ऍड. श्रीमती शुभांगी झेमसे, डॉ. गुने (गुने हॉस्पिटल), डॉ. कुनाल माखिजा (पटेल हॉस्पिटल), डॉ. शुभदा नील (नील हॉस्पिटल), डॉ. अभिषेक सिंह (रोटरी ब्लड बँक) या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या विचारातून एक मोलाचा संदेश दिला व ब्रम्हाकुमारीज संस्थेचे व आयोजकाचे खूप कौतुक केले व रक्तदान केलेल्या व्यक्तीचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले व रक्तदान याविषयी जनजागृती केली.

तसेच या शिबिरामध्ये एकूण ४५ रक्त युनिट्स संकलित करण्यात आले. समाजहितासाठी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमामध्ये रक्तदात्यांना ईश्वरीय सौगात, प्रमाणपत्र व प्रसाद देण्यात आला. तसेच मोफत शुगर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. फळांचे प्रायोजक प्रीतम म्हात्रे यांनी केले. फळांचे वितरण राजयोगिनी तारा दीदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माईन्ड स्पा यामधून लोकांनी मनाची एकाग्रता व शांती या गोष्टीची अनुभूती घेतली.तसेच रक्तदान करा – जीवन वाचवा, योगध्यान करा – जीवन घडवा हा संदेश या शिबिरातून यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आला.

जीवनदीप प्रकाशन मीडिया मॅनेजर डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ‘सुवर्णपथ’ ग्रंथाचे प्रकाशन !!

जीवनदीप प्रकाशन मीडिया मॅनेजर डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ‘सुवर्णपथ’ ग्रंथाचे प्रकाशन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) : जीवनदीप प्रकाशन मीडिया चे मॅनेजर डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ‘सुवर्णपथ – जीवनदीप ते ज्ञानदीप’ हा ग्रंथ आज एका भव्य सोहळ्यात प्रकाशित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन ऑइलचे माजी अधिकारी सुरेश केदारे, जीवनदी प्रकाशनचे प्रमुख जीत फुरिया, माजी पोलिस अधिकारी जाधव, इंटरनॅशनल स्पीकर डॉ. पवन अग्रवाल, शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील, हास्य अभिनेते जॉनी रावत व विजय कदम, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव हे होते. कार्यक्रमाचे आयोजन मंदार पनवेलकर, अनंता धरणेकर, कुमारी मानसी पोळ यांनी केले होते. 

प्रमुख पाहुणे सुरेश केदारे यांनी भाषणात डॉ. पोळ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना, “डॉ. गोरखनाथ पोळ यांनी माणसं जोडली आणि ती नातं जपत ठेवली हीच त्यांची खरी संपत्ती आहे,” असे सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जीवनदी प्रकाशनचे प्रमुख जीत फुरिया म्हणाले, “मागील २५ वर्षांपासून डॉ. पोळ हे जीवनदी प्रकाशनचा कणा आहेत. आम्ही जरी मालक असलो तरी आमच्या यशामागचे खरे श्रेय त्यांचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.इंटरनॅशनल स्पीकर डॉ. पवन अग्रवाल यांनी “मित्र कसा असावा” यावर भाष्य करत मुंबई डबेवाल्यांचे उदाहरण दिले आणि त्यांच्या प्रतीकात्मक सायकल व डब्याची भेट देऊन डॉ. पोळ यांचा सन्मान केला. लेखिका स्मिता पनवेलकर यांनी मागील २७ वर्षांचा इतिहास सांगताना “डॉ. पोळ आमच्यासाठी फक्त सहकारी नसून भाऊसमान आहेत,” असे भावनिक शब्द उच्चारले. 

कार्यक्रमाला पोळ सरांचे मित्रपरिवार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेला हा सोहळा डॉ. पोळ यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे पाटील यांनी केले तर सुयश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ यांनी आभार मानले.

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ( रजि) तर्फे महिला शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन !!

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ( रजि) तर्फे महिला शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन !!

मुंबई (मोहन कदम) :
        रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु. पो. कासार कोळवण गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, अनेक राज्य/ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ (रजि) तर्फे  गणपती उत्सवाच्या निम्मिताने महिला  शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना साई बाबा मंदिर सभागृह, मु. पो.कासार कोळवण येथे सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ठीक १० वा.शक्तिवाले शाहीर गायिका सौ.पायल प्रशांत करंबेळे.कासार कोळवण साईकृपा टिपरी न्युत्य विरुद्ध तुरेवाले गायिका कु. दक्षता लाड. श्री सोळजाई टिपरी न्युत्य पर्शरामवाडी. देवरुख यांच्यामध्ये होणार आहे.‌तरी पंचक्रोशीतील तमाम रहिवाशी यांनी या सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ( रजि) तर्फे महिला शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन !!

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ( रजि) तर्फे महिला  शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन !!

मुंबई (मोहन कदम) :
        रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु. पो. कासार कोळवण गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, अनेक राज्य/ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ (रजि) तर्फे गणपती उत्सवाच्या निम्मिताने महिला शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन करण्यातआले आहे. हा सामना साई बाबा मंदिर सभागृह, मु. पो.कासार कोळवण येथे सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ठीक १० वा.शक्तिवाले शाहीर  गायिका  सौ.पायल प्रशांत करंबेळे.कासार कोळवण साईकृपा टिपरी न्युत्य विरुद्ध तुरेवाले गायिका कु.दक्षता लाड श्री सोळजाई टिपरी न्युत्य पर्शरामवाडी देवरुख यांच्यामध्ये होणार आहे. तरी पंचक्रोशीतील तमाम रहिवाशी यांनी या सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मुरबाडचे नगराध्यक्ष संतोष ( बाबु ) चौधरी यांनी मोफत गणेश पुजनाचे साहित्य वाटप करुन नागरिकांना दिल्या शुभेच्या !!

मुरबाडचे नगराध्यक्ष संतोष ( बाबु ) चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम !!                      

** **गणेशोत्सवात मोफत गणेश पुजनाचे साहित्य वाटप करुन नागरिकांना दिल्या शुभेच्या **

मुरबाड ( मंगल डोंगरे )
मुरबाड नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी आपल्या मुरबाड नगर पंचायत हद्दीत गणेश उत्सवाचे औचित्य साधून, संपूर्ण मुरबाड शहरात घरोघरी गणपती पूजनासाठी लागणारे साहित्याचे वाटप करून शहर वासियांना गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्या !!

संतोष चौधरी हे मागील गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून, अश्या उपक्रमाने आपल्याला मानसिक समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे पत्रकांराशी बोलताना त्यांनी सांगितले. सदर साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात आज नगर पंचायत कार्यालयात उपस्थित पत्रकारांपासून सुरू करण्यात आली असून, यावेळी माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, परिवर्तन गटाचे गट नेते मोहन गडगे, माजी नगरसेवक विकास वारघडे,सागर चांबवणे, विनायक राव, नंदू जाधव, इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ऐन गणेशोत्सवात मुरबाड आगाराच्या ताफ्यात एकुण दहा नवीन बस दाखल !!

ऐन गणेशोत्सवात मुरबाड आगाराच्या ताफ्यात एकुण दहा नवीन बस दाखल !!    

**आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा**

मुरबाड, { मंगल डोंगरे } : मुरबाड आगारात यापूर्वी नवीन पाच बसेस दिल्या होत्या, आज गणेशोत्सवाच्या तोंडावरच रविवारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आतापर्यंत मुरबाड आगाराला दहा नवीन बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

यावेळी ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य उल्हासभाऊ बांगर, मुरबाड आगार प्रमुख योगेश मुसळे,  सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कविता सोनावणे, मुरबाड भाजप तालुका अध्यक्ष (पूर्व मंडल) दीपक पवार, जितेंद्र भावथे॔ मुरबाड तालुका अध्यक्ष (पश्चिम मंडल) तसेच राष्ट्रवादी  तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे, मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, अप्पा यशवंतराव, माजी नगरसेवक रवींद्र देसले, मुरबाड रिपाई तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, भाई तेळवणे, बाळा घरत, यांच्यासह मुरबाड आगारातील कर्मचारी व परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...