NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सौ. स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव !!
सदरचा कार्यक्रम हा नुकताच हॉटेल फोर सीजन मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. सौ. लंगडे या महाराष्ट्र नवउद्योजक केंदाच्या माध्यमातून गेली अठरा वर्षे कार्यरत असुन आतापर्यंत साडे तीन हजाराहून अधिक नव उद्योजक घडवले आहेत. यांच्या कामाची विशेष दखल घेवून त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे कडून कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते भारतज्योति उद्योगरत्न नारीगौरव सन्मान पुरस्कार 2022, राष्ट्रीय राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार 2022, आमदार विनय कोरे व नवोदिता समरजित घाटगे यांच्या हस्ते Business Conclave 2022 मध्ये Excellence Award ने LONDON येथे पुरस्काराने सन्मानित केले आहे. पूर्ण भारत देशातील एकाच स्त्रीला सदर पुरस्कार दिला जातो. गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार 2022 आणि वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशन तर्फे इंटरनॅशनल पुरस्कार 2022, लोकशाही सन्मान पुरस्कार 2023, मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते, इंटरनॅशनल वुमन पार्लमेंटतर्फे आयकॅानिक वुमन ॲवॅार्ड 2023 दिल्ली आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
वृत्तांत - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment